Jagdamba School Liha Bk

Jagdamba School Liha Bk School Students Activity, Program videos

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु!!आपल्या विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले श्री सपकाळ सर शाळा समितीचे अध्यक्ष व शिक्षक वृक्ष...
02/10/2025

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु!!
आपल्या विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले श्री सपकाळ सर शाळा समितीचे अध्यक्ष व शिक्षक वृक्षारोपण करताना...

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु. क्रिडा स्पर्धा दरवर्षी तालुका क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. त्यामधे सन.2024-25 ...
26/09/2025

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु. क्रिडा स्पर्धा

दरवर्षी तालुका क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. त्यामधे सन.2024-25 या वर्षी तालुका क्रिडा स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील 14 वर्षे वयोगटातील चि.चेतन सोपान वाघ याचा 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत तालुक्यातून दुसरा क्रमांक आला होता,तसेच 17 वर्षे वयोगटातील कु.सुहानी दिलीप मोरे हीचा 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत तालुक्यातून तिसरा क्रमांक आला होता.

25/09/2025

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु #आनंद​ मेळावा

शालेय आनंद मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रोत्साहित करणे, तसेच त्यांच्यातील आनंद आणि उत्साह वाढवणे, त्यांना व्यावहारिक व आर्थिक ज्ञान देणे, आणि विविध कलागुणांना व छंदांना प्रोत्साहन देणे हा असतो.

आनंद मेळाव्याचे मुख्य उद्देश:

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास:

मेळाव्यातून मुलांना आनंद मिळतो, ज्यामुळे त्यांचा शिकण्याचा उत्साह टिकून राहतो आणि त्यांना शैक्षणिक प्रक्रियेत समाकलित होण्यास मदत होते.

व्यावहारिक आणि आर्थिक ज्ञान:

विविध खाद्यपदार्थ आणि वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल लावल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसाय करण्याचा अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांना व्यावहारिक व आर्थिक गोष्टींची जाणीव होते.

शारीरिक व मानसिक आरोग्य:

विविध खेळ आणि क्रियाकलापांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सुधारते आणि त्यांचा मानसिक विकासही साधला जातो.

कला आणि छंदांची जोपासना:

मेळाव्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या छंदांना जोपासण्याची संधी मिळते.

सामाजिक जाणीव:

या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात एकोपा निर्माण होतो आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होतात.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी:

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना उत्पादक उपक्रमांद्वारे स्वयंरोजगाराची माहिती मिळावी, हा आनंद मेळाव्यामागील एक महत्त्वाचा उद्देश असतो.

प्रोत्साहन:

आनंदातून विद्यार्थ्यांना कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि त्यांना नव्याने शिकण्याची ऊर्जा प्राप्त होते.

#जगदंबा​ स्कूल लिहा
#जगदंबा​ विद्यालय लिहा
#लिहा​ स्कूल
#आनंद​ मेळावा
​ School Liha
​ School
​ school

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु ता. मोताळा, जि.बुलढाणाविद्यार्थ्याना स्वच्छतेचे महत्त्व पटवून,त्यांना मार्गदर्शन करताना श्र...
23/09/2025

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु
ता. मोताळा, जि.बुलढाणा
विद्यार्थ्याना स्वच्छतेचे महत्त्व पटवून,त्यांना मार्गदर्शन करताना श्री. एस.एस.गव्हारे सर आणि श्री.पी.ए.अढाव सर.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत भारत सरकारच्या सर्व विभागांमार्फत राबवण्यात येणारा एक पंधरा दिवसांचा (पखवाडा म्हणजे पंधरा दिवस) स्वच्छता अभियान उपक्रम आहे. या पखवाड्यादरम्यान श्रमदान करतात, वृक्षारोपण करतात आणि स्वच्छता अभियान राबवतात.

स्वच्छता पखवाड्याची उद्दिष्ट्ये:
स्वच्छता जागरूकता: लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे.

विशिष्ट स्वच्छता क्षेत्रे: दरवर्षी या अभियानादरम्यान विशिष्ट स्वच्छता क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते, जसे की पाणी आणि स्वच्छता.

स्वच्छतेच्या सवयींना प्रोत्साहन: दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देणे.

स्वच्छता पखवाडा कसा साजरा केला जातो?
वृक्षारोपण: पर्यावरणाची शुद्धता राखण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले जाते.
जागरूकता आणि शिक्षण: स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

12/09/2025

श्री जगदंबा विद्यालय लिहा बु येथे पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करण्यात आले

Address

At. Post. Liha Bk, TQ. Motala, Dist. Buldhana, State.
Buldana
443101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamba School Liha Bk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share