19/10/2025
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नागद येथे शुभम रणवीर सिंग राजपूत (वय 24 वर्ष राहणार नागद तालुका कन्नड) यास अमोल निकम याने आमच्या परिसरात तू का येतो? असे म्हणत असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादामध्ये सचिन दशरथ निकम, शंकर दर्शन निकम आणि दोन साथीदार यांनी काठीने मारहाण केली. मारहाणी मध्ये अमोल निकम याने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने शुभमवर वार केला. शुभम जखमी होऊन जागीच ठार झाला. त्यातील चारही आरोपींना गुन्हे शाखेने 24 तासात जेरबंद केले.