The News Kida

The News Kida All News Will provide you

01/09/2026

द न्यूज किडा- जीवन चव्हाण | कै. वसंतराव नाईक यांचा अर्धाकृती पुतळा व्हावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून स्वतःला वाहून घेतलेले सेवानिवृत्त वाहक वसराम जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तालुक्यातील राजदेहरे तांड्यात नाईक यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत वसंत विकास समितीचे पंचक्रोशीतून आभार व्यक्त होत असून जाधव यांनी पुतळ्याच्या मागणीपासून तर अनावरणापर्यंत आपले अनुभव कथन केले आहे. पाहा याबाबत ते नेमके काय म्हणालेत
#अर्धाकृतीपुतळा #अनावरण #पाठपुरावा

31/08/2026

द न्यूज किडा- जीवन चव्हाण | खरंतर "संत सेवालाल महाराज' यांच्या नावाने राजकारण न करता वस्तुस्थिती तपासा मागील पंचवीस वर्षांत महाराजांचा फोटोला दाखवायला, एक तरी भवन दाखवा असे थेट सवाल करून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपण गेल्या सात वर्षांत बंजारा तांड्यात २९ भवन पूर्ण करत आहोत. तसेच गत अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अर्थातच सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचा लवकरच "श्रीगणेशा' करण्यात येईल असे आश्वासित करून तुम्ही फक्त उणिवा शोधा, मी काम करीतच राहील असे सुतोवाच करीत सेवालाल महाराज हे विरोधकांनाही उदंड आयुष्य देवो म्हणत जोरदार पलटवार केले आहे. ते राजदेहरे येथील कै. वसंतराव नाईक यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण प्रसंगी बोलत होते. पाहा याबाबत ते नेमके काय म्हणालेत
#पुतळा #अनावरण

29/08/2026

द न्यूज किडा- वृत्तसेवा-सांगवी| खरंतर गावाचा विकास करण्यासाठी आरोपप्रत्यारोप, द्वेष बाजूला ठेवून काम करावा लागतो. म्हणून आपण सांगवी गावाचा विकास साधण्यासाठी सरपंच यांना साथ द्या असे आवाहन लोकनियुक्त सरपंच कविता संतोष राठोड पती तथा ग्रामसभा सचिव संतोष राठोड यांनी केले आहे. आज गावात आयोजित ग्रामसभेत त्यांची सचिव म्हणून निवड केल्यानंतर बोलत होते. पाहा याबाबत ते नेमके काय म्हणालेत

29/08/2026

द न्यूज किडा- जीवन चव्हाण| चाळीसगाव तालुक्यातील सांगवी गावात लोकनियुक्त सरपंच कविता संतोष राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका गैरहजर का? असे सवाल करत ग्रामस्थांसह युवक आक्रमक झाले. व ग्रामसेविका यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा पून्हा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान यावेळी सचिव म्हणून संतोष राठोड यांची निवड केल्याने त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिले. परंतू ते समाधानकारक नसल्याने काही क्षणासाठी गदारोळ बघायला मिळाले. पाहा याबाबत विशेष वृत्तांत

28/08/2026

द न्यूज किडा- जीवन चव्हाण | राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील माध्यमिक विद्यालयात एका शिक्षकांकडून विद्यार्थ्यां'ना व्यवस्थित शिकविण्यात येत नसल्याबाबत पालकांनी आरोप केले आहे. व सदर शिक्षकाची बदली करण्याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याची माहिती देऊन बदली न झाल्यास विद्यालयाला कुलूप लावा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आले आहे. पाहा याबाबत विशेष वृत्तांत

28/08/2026

द न्यूज किडा- वृत्तसेवा-चाळीसगाव| "बहिण-भावा'चा नातं अधिक दृढ व्हावे या उदात्त भावनेतून शिवनेरी फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून हजारों भावांना पोस्टाद्वारे राखी पाठवून अनोख्या पद्धतीने "रक्षाबंधन' साजरे करीत आहे. याही वर्षी तब्बल सात हजारांहून अधिक बांधवांना राखी पाठवण्यात आली आहे. दरम्यान तमाम बांधवांना शुभेच्छा देत नगराध्यक्षा तथा शिवनेरी फाऊंडेशन अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची घौडदौड सुरू आहे. म्हणून येणाऱ्या काळात द बेस्ट चाळीसगाव घडविण्यासाठी या बहिणीला आपण साथ द्या अशी साद घातली आहे. पाहा याबाबत विशेष वृत्तांत # #2026

19/08/2026

द न्यूज किडा- जीवन चव्हाण | नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून सकल मराठा समाज आक्रमक होत आज चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. व असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिले आहे. दरम्यान समाजासाठी मनोज जरांगेंनी जे आंदोलन पेटवले आहे. ते याच स्वयंघोषित नेत्याच्या डोळ्यात खूपसत आहे. म्हणून तो बेताल वक्तव्य करत आहे. परंतू समाजाने आता ठरवलंय की, यापुढे कोणी असा आक्षेपार्ह विधान करेल त्याला जागीच ठेचू असे सुतोवाच करून सकल मराठ्यां'नी हल्लाबोल केले आहे. पाहा याबाबत विशेष वृत्तांत

18/08/2026

द न्यूज किडा- जीवन चव्हाण | नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला वा मुलींविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या कारणावरून चाळीसगावात मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहर पोलीस स्थानक गाठून सकल मराठा बांधवाकडून वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन छेडू असा थेट इशारा पदाधिकारी प्रशांत गायकवाड यांच्यासह समाज बांधवांनी दिले आहे. पाहा याबाबत विशेष वृत्तांत

17/08/2026

द न्यूज किडा- जीवन चव्हाण | खरंतर आजचा यश हे सर्वच सभासद व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे मिळाले असून उर्वरित आमचे चार उमेदवार जे पराजय झाले आहे. ते फक्त १३३ बोगस मतदानांमुळे असे सांगून सहकार पॅनेलप्रमुख विकास तात्या पाटील यांनी हल्लाबोल करत "हुकुमशाही'ला कंटाळून आम्हाला सभासदांनी विजयी केले आहे. असे सुतोवाच केले आहे. ते सर्वोदय शिक्षण प्रसारक को-ऑप समाज लिमिटेड निवडणूक विजयी झाल्यानंतर उंबरखेड येथे बोलत होते. पाहा याबाबत एक्सक्लुझिव्ह वृत्तांत
#
#

16/08/2026

द न्यूज किडा- वृत्तसेवा- छ. संभाजीनगर | समाजाने अनेक यशस्वी आंदोलने करून देखील ते न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळत नाही म्हणून मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक "राजेंद्र दाते पाटील' यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अन्नत्याग उपोषणास सुरूवात आहे. या उपोषणास सात दिवस उजाडले असून सरकारणे तात्काळ दखल घेऊन आमच्या सर्व मागण्या मान्य करा अन्यथा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. असा थेट इशारा "मराठा क्रांती मोर्चा' समन्वयक लक्ष्मण शिरसाठ यांनी दिले आहे. पाहा याबाबत विशेष वृत्तांत

Address

Chalisgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when The News Kida posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share