
07/07/2025
"जय हरि विठ्ठल ! चाळीसगावात गुंजला भक्तीचा स्वर!"
काल चाळीसगांव शहरात आषाढी एकादशीनिमित्ताने चाळीसगांव शहरातील पवार वाडीतील विठ्ठल मंदिरात भक्तीमय वातावरणात हरिनाम सप्ताह व हरीपाठाचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल मंदिर परिसरात भक्तजनांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभागी होत गेल्या अनेक वर्षांची परंपरेनुसार महाप्रसादाचे वाटत करण्यात आले. तसेच विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी व कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते.
मंदिरात कीर्तन, भजनाचा गजर आणि हरिपाठाच्या माध्यमातून भक्तांनी भक्तिमय वातावरणात "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या जयघोषांनी भक्तिरसात न्हालं.
जय हरी 🚩
- ह.भ.प. चेतन महाराज (पवार यात्रा कं.)
#विठ्ठलनाम #आषाढीएकादशी #हरिपाठ #चाळीसगाव #भक्तीमार्ग #एकतेचा_सोहळा