BJP Chandrapur

BJP Chandrapur भारतीय जनता पार्टी ( जिल्हा चंद्रपूर )

वंदे मातरम् !
09/12/2025

वंदे मातरम् !

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींची मान्यताआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या...
04/12/2025

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींची मान्यता

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली मंजुरी

मोरवा विमानतळ आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा

चंद्रपूर, दि.०३- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरण, सुरक्षाविषयक सुविधांच्या उभारणी आणि नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला ₹१७ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तत्काळ मंजूर केला आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या भेटीत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विमानतळाच्या सुरक्षाविषयक अडचणी आणि उडान क्लबच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधांबाबत सविस्तर माहिती देत निधीची मागणी केली. आ.मुनगंटीवार यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित मंजुरी दर्शवली आहे.

मोरवा विमानतळ परिसरात वैमानिक प्रशिक्षण संस्था म्हणून नागपूर उडान क्लब, भारत सरकारच्या नागरी विमान संचालनालयाच्या (DGCA) मान्यतेनुसार कार्यरत आहे. या ठिकाणी सुरक्षित, आधुनिक आणि नियमांनुसार विमान संचालनासाठी सुरक्षाविषयक व मूलभूत सुविधांची उभारणी अनिवार्य आहे. यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण कामांबाबत आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर केले.

DGCA च्या नियमांनुसार पुढील अत्यावश्यक सुविधांची उभारणी आवश्यक असून परिमिती तपासणी मार्गाचे बांधकाम,विमानतळाभोवती उपलब्ध संरक्षण भिंतीची उंची वाढविणे, हँगर व फ्युएल स्टोरेजपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित संपर्क मार्ग,विमानतळाच्या चारही दिशांना सुरक्षा देखरेख टॉवरचे बांधकाम,मुख्य इमारतीसमोरील भागात हाय-मास्ट प्रकाशयोजना,स्वागत द्वार, गार्ड रूम, पार्किंग व्यवस्था आणि रेस्ट हाऊस उभारणी या सर्व कामांसाठी एकूण ₹१७ कोटी निधीची मागणी केली. विमान सुरक्षेचे महत्त्व आणि उडान क्लबच्या प्रशिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे तातडीची असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रस्तावाला संपूर्ण सकारात्मकता दाखवत ₹१७ कोटींच्या निधीस त्वरित मंजूरी दिली.
mungantiwar

!! जय श्री राम !! 🚩गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण परतागली जीवोत्तम मठाच्या ५५० वर्षांच्या मैलाचा दगडी वर्धापन दि...
30/11/2025

!! जय श्री राम !! 🚩
गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण परतागली जीवोत्तम मठाच्या ५५० वर्षांच्या मैलाचा दगडी वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी येथे भगवान रामाच्या ७७ फूट कांस्य पुतळ्याचे अनावरण केले.

🚩

आमदार राजुरा विधानसभा मतदारसंघ तथा माजी जि.प. अध्यक्ष, चंद्रपूर मा. श्री. देवरावदादा भोंगळे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्व...
21/11/2025

आमदार राजुरा विधानसभा मतदारसंघ तथा माजी जि.प. अध्यक्ष, चंद्रपूर मा. श्री. देवरावदादा भोंगळे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!💐💐
bhongle

"Five more to go"
14/11/2025

"Five more to go"

आमचा नगरसेवक फक्त कमळ 🪷
13/11/2025

आमचा नगरसेवक फक्त कमळ 🪷

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराजजी अहिर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभे...
11/11/2025

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराजजी अहिर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐



08/11/2025

कॅन्सरवरची लढाई, आता चंद्रपूर जिंकेल..!

चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ रुग्णालय नसून, हजारो रुग्णांच्या डोळ्यात नवी आशा पल्लवीत करणारे जीवनदायी केंद्र ठरणार आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला टाटा ट्रस्टने दिलेल्या सहकार्यामुळे तब्बल ₹२८० कोटींच्या खर्चाने हे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभं राहिलं आहे. आधुनिक निदान आणि उपचारसुविधांनी सज्ज असलेले हे केंद्र पूर्वविदर्भातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

२२ डिसेंबर २०२५ रोजी सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. कॅन्सरविरुद्धच्या लढाईत चंद्रपूर आणि परिसरासाठी हे केंद्र एक प्रभावी शक्तिस्थान ठरेल ,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
mungantiwar

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या 280 कोटी रु. किंमतीच्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा 2...
04/11/2025

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या 280 कोटी रु. किंमतीच्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा 22 डिसेंबर रोजी*

*सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार लोकार्पण*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती*

राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला लाभणार आहे.
अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आ. मुनगंटीवार यांनी कार्यशील दृष्टिकोन आणि विकासनिष्ठ सेवाव्रत यांच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली. “विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या धोरणातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला. या वाटचालीत चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे 280 कोटी रु. किंमतीचे टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय.

2014 मध्ये अर्थमंत्री झाल्या पासून आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला. दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. दि. 26 जून 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला. जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने 280 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे. पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे.
mungantiwar


Address

Chandrapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share