
17/08/2022
*राष्ट्रगीताचे समूह गायन, विश्वविक्रमाची एक संधी ! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*
मुंबई, दि. १६: *दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने; ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे*.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांना निर्देश देण्यात आल्याची माहिती, राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय निर्गमित केलेला असून, राज्याचे प्रशासन हा उपक्रम लोकसहभागातून साजरा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज व आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. राज्यातील अंगणवाड्या, सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये/ सर्व प्रकारची विद्यापीठे/ खाजगी/ शासकीय सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, असेही सौरभ विजय यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या या आवाहनास राज्यातील सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा आणि आपणा सर्वांच्या सहभागातून एक नवा विश्वविक्रम व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने सदर आवाहन असल्याचे सौरभ विजय यांनी नमूद केले आहे.
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis
__________________________________
*_जाहिरात विभाग_*
__________________________________
*चिपळूण मध्ये महापूररेषेपासून अतिशय सुरक्षित अंतरावर खेंड गुहागर बायपास रोड येथील संकुल मध्ये*
🛑 *1100 चौ.फुट Spacious 2 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे*
🛑 *435 चौ.फुट दुकान गाळा भाड्याने देणे आहे*
*अधिक माहितीसाठी संपर्क :*
*श्री डेव्हलपर्स अँड असोसिएट्स, चिपळूण*
*मोबाईल : ९९७५१४७४०४ / ८२०८४२२२४८*
__________________________________
*खुशखबर... खुशखबर... खुशखबर!!!*
*SMART LED TV आकर्षक दरात उपलब्ध...*
*"रक्षाबंधन ते गणेशोत्सव" या शुभ काळात उत्तम प्रतीचा SMART LED TV आजच चिपळूण येथील आपल्या हक्काचे दालन "SMART SALES" येथे ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किमतीत स्पेशल ऑफर मध्ये तेही १ वर्ष वॉरंटी सह उपलब्ध...*😃
*२४ इंच ते ६५ इंच पर्यंत SMART LED TV निरनिराळ्या मॉडेल्स मध्ये उपलब्ध*🥳
*आजच या सुवर्णसंधी चा लाभ घ्या आणि आपला टीव्ही आजच बुक करा...*🥳🥳😃😃
* # संपूर्ण महाराष्ट्रभर डिलीव्हरी उपलब्ध**
*स्मार्ट सेल्स "SMART SALES"*
*घाणेकर हॉस्पिटल समोर, मेहता पेट्रोल पंप जवळ, मार्कंडी, मेनरोड, चिपळूण*
*संपर्क: ९४२३२९५०७८ /९९७५१४७४०४*
__________________________________
*आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आपल्या व्यवसायाची माहिती मोजक्या शब्दांत सोशल मिडीया वर अगदी माफक दरामध्ये प्रकाशित करण्यासाठी आजच आमच्याकडे संपर्क करा*
*संपर्क (व्हाट्सऍप) : ९९७५१४७४०४*
__________________________________
*महत्वाच्या ताज्या बातम्या व वस्तुस्थिती वर आधारित लेख वाचण्यासाठी अवश्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि कोणताही एक ग्रुप जॉईन व्हा*
__________________________________
*आपल्यावर अथवा सामाजिक जीवनात कोणता अन्याय होत असेल तर आम्ही निश्चितपणे त्याला वाचा फोडू आणि न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू... मनामध्ये कोणताही संभ्रम न बाळगता अवश्य हक्काने संपर्क करावा...*🙏🏻👍🏻
*साप्ताहिक गोळीबार*
*मोबाईल : ९९७५१४७४०४ / ८२०८४२२२४८*
*ईमेल : [email protected]*
✒️ *साप्ताहिक गोळीबार*📰1️⃣
https://chat.whatsapp.com/HwNcqR9bPWzLWz4gAuRfmc
✒️ *साप्ताहिक गोळीबार*📰2️⃣
https://chat.whatsapp.com/LeNFNYclwCxJzRaDkEfasn
✒️ *साप्ताहिक गोळीबार*📰3️⃣
https://chat.whatsapp.com/IY2TBO8sSWX3wLEzUAmsac
✒️ *साप्ताहिक गोळीबार*📰4️⃣
https://chat.whatsapp.com/JXd2v48EuTy3VUfcx0ssrL
✒️ *साप्ताहिक गोळीबार*📰5️⃣
https://chat.whatsapp.com/Dpsb6vTiandAJAskA6b9Jv