
21/08/2025
महाराष्ट्रात प्रथमच भव्य दिव्य व आगळावेगळा कार्यक्रम
नव स्वराज्य न्युज व युवा ग्रामीण पत्रकार संघ प्रथम वर्धापन दिनानिमित्त तब्बल 70 जणांचा गुणगौरव साजरा
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा , पत्रकारांचा सत्कार , गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव , वकृत्व स्पर्धेचा निकालात तीन मुलींची बाजी
वर्धा : नव स्वराज्य न्युज व युवा ग्रामीण पत्रकार संघ द्वारा प्रथम वर्धापन दिन भव्य दिव्य उत्साहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण पार पडला हा सोहळा देवळी शहरातील नगर परिषद लागून असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक 20 /8 /2025 रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक राजेश बकाने आमदार देवळी पुलगाव विधानसभा, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ , प्रमुख अतिथी मोहनबाबूजी अग्रवाल ज्येष्ठ समाजसेवक , नितेश कराळे प्रवक्ता , गोविंद पोलाड विद्रोही कवी , व्याख्याता , उमेश म्हैसकरअभिनेता ,विजयकुमार खंडारे अभिनेता , श्रीपा तेलंगे अभिनेत्री , संतोष भोयर , आर्यन कांबळे , रोहिणी बाबर तसेच देवळी शहरातील सर्व शिक्षकवृंद , पत्रकार यांच्या उपस्थितीत दोन महिन्यापासून अनेकांनी जवळपास 150 प्रस्ताव सादर करण्यात आले होते त्यातून निवड झालेले प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय 2025 महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार 2 , समाज रत्न पुरस्कार 4 , चौथा आधारस्तंभ पत्रकार पुरस्कार 3 , आदर्श शिक्षक पुरस्कार 2 , क्रीडारत्न पुरस्कार 2 , उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 15 , सन्मान चिन्ह 15 , गुणवंत विद्यार्थी 20 , वकृत्व स्पर्धक प्रथम , तृतीया , तृतीय , आंतरराष्ट्रीय खेळाडू 7 व ईतर राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरव व सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वकृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. उर्वरित मुलांना राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरव झाला व बिहाली चित्रपटाचे विमोचन करीत मान्यवरांनी व्यासपीठावर विचार व्यक्त केले आणि सदर कार्यक्रमाचे आयोजन सचिन वैद्य व नव स्वराज्य न्युज व युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धा पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्याचप्रमाणे मान्यवरांनी व इतर सजक महिला, नागरिकांनी सचिन वैद्य चे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या व देवळी तालुक्यातील पत्रकार , शिक्षक , नागरिक , महिला , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेत सर्वत्र आनंदाचे वातावर निर्माण झाले होते.
Maharashtra Wardha / वर्धा वर्धा नवरात्री उत्सव 2022 युवा ग्रामीण पत्रकार संघ Rajesh Bakane Nav Swarajya News विदर्भ - Vidarbha Nitesh Karale Khad Khad कराळे सर Nitesh Karale Ganesh Kachkalwar Sachin Vaidya Sachin Vaidya #उमेश_म्हैसकर #गोविंद_पोलाड #भीमजयंती #गौरव #गुणगौरव #सत्कार