25/08/2025
जळगांव | गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे.
विघ्नहर्ता म्हटले जाणारे दैवत गणरायाचे आगमन 27 ऑगस्ट रोजी सर्वत्र धूमधडाक्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात गणरायांच्या मूर्तीची दुकाने थाटली आहेत. सजावट करण्यासाठी फुल-माळांची दुकाने लागली आहेत. तसेच विद्युत रोषणाई करण्यासाठी इलेक्ट्रीकल वस्तुची दुकाने थाटली आहेत. गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारी वस्तु जसे हार, पताके, मखर, रंगीत कागद यासारख्या अनेक वस्तूंची दुकाने लागली आहेत. तसेच लाईटींग, लाईटस या इलेक्ट्रोनिक वस्तुची दुकाने सुद्धा लागली आहेत. अंतुर्ली येथे गणपती बाप्पांच्या मूर्तीची चार ते पाच दुकाने लागलेली असून 100 रुपये, 150 रुपयापासून ते 4000 हजार रुपयापर्यंत मुर्तीच्या किंमती आहेत. असे दुकानादाराकडून सांगण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती बाजारात दाखल झालेल्या आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वी संपूर्ण बाजारपेठ गजबजली दिसून येत आहे.
लोकनायक न्यूज प्रतिनिधी किरण पाटील, मुक्ताईनगर जिल्हा जळगांव