जनता - The People

जनता - The People जनता-The People is dedicated to Marginalised and unprivileged people of India. It works on the principle of Dr. Ambedkar and Constitution.

13/07/2025

🛑 "हे #जनसुरक्षेच्या नावाखालचं #तानाशाहीचं पाऊल आहे!" 🛑

महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेलं जनसुरक्षा विधेयक 2024 हे लोकशाहीच्या आणि संविधानाच्या मुळावर घाव घालणारं आहे!

👉 पोलिसांना अबाधित अधिकार!
👉 कोणत्याही व्यक्तीला "धोका" ठरवून अटक करता येणार!
👉 न्यायालयीन प्रक्रिया नाही, पुराव्यांची गरज नाही!

🧑‍⚖️ या विधेयकामुळे अनुच्छेद 21 आणि 22 म्हणजेच जीवन, स्वातंत्र्य व कायदेशीर संरक्षणाचे हक्क संपतात!

---

😶 मौनात गेलेले विरोधी पक्ष...

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव गट) – यांनी या विधेयकाला खुला विरोध केला नाही.
विरोध नाही, म्हणजे याला मूकसंमती समजायची का?

---

✊ फक्त एक ठाम आवाज – बाळासाहेब आंबेडकर!

प्रकाश आंबेडकरांनी या विधेयकाला "हिटलरी कायदा" म्हटले.
त्यांनी सांगितलं की, हा कायदा म्हणजे SC, ST, OBC आणि मुस्लिम कार्यकर्त्यांवर दडपशाहीचा कट आहे!

"हा कायदा रद्द झाला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रात लोकशाही वाचणार नाही!"

---

🔊 मित्रांनो, आता आपणच बोललो पाहिजे, कारण उद्या उशीर होईल!

#जनसुरक्षा_की_तानाशाही
#संविधान_वाचवा
#प्रकाशआंबेडकर

#लोकशाहीचा_खरा_विरोध
#मौन_विरोधक
#वंचितबहुजनआघाडी
#बेबंदशाहीविरोधात

25/05/2024

बॉलिवूडचे बहुतेक सेलिब्रिटी हे हवेत असतात यांना फक्त स्वतःच स्टारडम वैगरे याच्या पलिकडे त्यांना काहीच माहिती नसत त्यात स्टार किड्स म्हणटल तर त्यांचा आणि वैचारिक दृष्टया बुद्धीचा संबंध असल अस वाटत नाही पण जान्हवी कपुर ला लल्लनटॉप शो मध्ये विचारल जर टाईम मशीन ने भुतकाळात जाता आल तर कोणाला बघायला काय करायला आवडल तर तिने उत्तर दिले मला आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेला संवाद बघायला आवडल तिच उत्तर ऐकून आश्चर्य वाटल.

प्रबुद्ध भारतच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा !डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक ते प्रबुद्ध भारत' असा पत्रकार...
04/02/2024

प्रबुद्ध भारतच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक ते प्रबुद्ध भारत' असा पत्रकारितेचा प्रवाह निर्माण केला. तो बाबासाहेबांनी चालवला. १९३० मध्ये बाबासाहेबांनी 'जनता' पाक्षिक सुरू केले. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी 'जनता' पाक्षिकाचे रूपांतर "प्रबुद्ध भारत''मध्ये झालं.

प्रबुद्ध भारत हे नाव घेतांना भारताचे संविधान लिहले जात होतं. भारताला 'प्रबुद्ध' करणे ही गरज होती म्हणून त्यांनी 'प्रबुद्ध भारत' हे नाव ठेवले. या मागे लोकांना शहाणे करणे हा उद्देश बाबासाहेबांचा होता.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी अनेक संकटांवर मात करून प्रबुद्ध भारत सुरू ठेवले. गेली अनेक वर्षे आम्ही 'प्रबुद्ध भारत' चालवतोय. यासाठी अनेक जण मदत करतात.

वर्तमानपत्र हा चळवळीचा आरसा आहे. त्यामुळे हे वर्तमानपत्र चालविण्यासाठी सर्वांनी मदत करावी. मदत म्हणजे त्यांनी सभासद, वर्गणीदार व्हावे. ह्या दोन गोष्टी सर्वांनी केल्या, तर आंबेडकरी चळवळीचे वर्तमानपत्र चालू शकते. आज मोठ्या खेदाने म्हणावं लागतंय की, आंबेडकरी चळवळीतील माणूस हा इतिहासात जगतोय, तो वास्तवात जगत नाही. याचे सर्वात मोठे कारण की, वास्तव काय आहे? वर्तमान काय आहे? हे त्याला कोणी समजवून सांगत नाही.

'प्रबुद्ध भारत' आज वर्तमानस्थिती काय आहे? भविष्यकाळ काय आहे? हे समजावून सांगतो. म्हणून स्वतःला प्रबुद्ध करून घेण्यासाठी 'प्रबुद्ध भारत' वाचा, आपल्या समोरील आव्हाने समजून घ्या, प्रबुद्ध भारतचे वर्गणीदार व्हा, हे आवाहन आम्ही आपल्याला करतो.

Anjali Ambedkar ताई यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण त्यांना काय शुभेच्छा द्याल?
28/11/2023

Anjali Ambedkar ताई यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

आपण त्यांना काय शुभेच्छा द्याल?

घटनासमितीचे कामकाज ज्या प्रशस्त सभागृहात चालत असे, त्यात सभासदांना बसण्यासाठी लाकडी बेंच असत.मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकर...
26/11/2023

घटनासमितीचे कामकाज ज्या प्रशस्त सभागृहात चालत असे, त्यात सभासदांना बसण्यासाठी लाकडी बेंच असत.मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी विशेष प्रकारची खुर्ची तयार करून घेण्यात आलेली होती. त्याचे कारण असे की, बाबासाहेबांच्या बेंबीच्या खाली ओटीत एक फोड (Boil) झालेला होता.आणि आपल्याला हे माहीत आहेच की बाबासाहेबाना मधूमेहाचा त्रास होत असे.मधूमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीला जखम झाली की तर ती लवकर भरून येत नाही किंवा लवकर बरीही होत नाही.बाबासाहेबाना मधूमेहाचा जास्तच त्रास असल्याने फोडाची जखम कांही केल्या बरी होत नव्हती आणि त्या फोडाचा बाबाना इतका त्रास होत असे की,त्यांना नीटपणे बसता येत नव्हते.त्या फोडाच्या जखमेचे दररोज ड्रेसिंग करण्याचे काम माईसाहेब करीत असत.(माईसाहेबांचे एवढे तरी ऋण आंबेडकरी अनुयायानी मान्य करायलाच हवे) कापसाचा एक मोठा बोळा त्या फोडामुळे तयार झालेल्या बसत असे एवढी मोठी ती जखम होती.परंतु घटना लिहिण्याचे व ती घटना समितीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचे काम अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांच्यासाठी खास खुर्ची तयार करून घेण्यात आली होती आणि याच खुर्चीत बसून बाबासाहेबानी संविधान लिहिण्याचे काम पूर्ण करून ते डाॅ.राजेंद्रप्रसाद यांच्या हाती सुपूर्द केले.या ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार असलेली ती खुर्ची आजही आपल्याला सिम्बायोसिस संस्थेच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल व म्युझियम, सेनापती बापट रोड पुणे येथे पहावयास मिळते.

खाली फोटोत दर्शविलेली विशिष्ट खुर्ची तीच आहे ज्या खुर्चीवर बसून बाबासाहेबानी संविधान लिहिले.

#संविधान_स्वीकृती_दिन

जयभीम, जयभारत
साभार - बी.एन.साळवे सर

जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमातील नामवंत संस्था आहे. याची तुलना आय.आय...
03/11/2023

जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमातील नामवंत संस्था आहे. याची तुलना आय.आय. एम. अहमदाबाद बरोबर होते.

राखीव जागांमुळे गुणवत्ता असणाऱ्या मुलांवर अन्याय होतोय अशी ओरड करणाऱ्यांनी ही कट ऑफ पहावी.

सर्व प्रतिथयश शिक्षण संस्थांमध्ये अनारक्षित आणि राखीव उमेदवारांच्या गुणात फारसा फरक नाही.

खोटे वाटत असेल तर वैद्यकीय शिक्षणासाठी जे.जे. मेडीकल कॉलेज, जी.एस. मेडीकल कॉलेज, बी.जे. मेडीकल कॉलेज, तर अभियांत्रिकी शिक्षणासाठी व्हिजेटीआय, सीईओपी, एसपीआयटी यांची कट ऑफ तपासा.

मेरीटच्या बाता मारणाऱ्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना यांच्या आसपास काय ३०%ने कमी म्हणजे ६५-७० % पण गुण नसतात.

कट ऑफ म्हणजे ज्या गुणांवर प्रवेश बंद झालाय ते गुण!

#आरक्षण_चार

तोंडावर फेकून मारा त्यांच्या जे 35% वाला डॉक्टर होतो आणि 98% टक्के वाला त्याच्या हाताखाली काम करतो अशी वल्गना करतात.

 #पुणे_करार
24/09/2023

#पुणे_करार

17/08/2023

❝ First time popular media platform has shown Buddhist wedding 💙😍☸️🌼 ❞

Made In Heaven 2: सिरीजच्या पाचव्या भागाने जिंकले मन, राधिका आपटेचा बौद्ध विवाह ठरला हिट झोया अख्तरची यावर्षीची बहुचर्चित वेबसिरिज 'मेड इन हेवन सीझन 2' प्रदर्शित झाली असून, या सिरिजला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या सिरिजमध्ये राधिका आपटेची भूमिका प्रेक्षकांना आवडत असून, तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे..✨
#शेअर_नक्की_करा.

Balasaheb Ambedkar
17/08/2023

Balasaheb Ambedkar

14/08/2023

धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी गदरचे दहा पार्ट आले तरी, असा एकच व्हिडिओ बस झाला..!!

७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🙏

12/08/2023

Comment करून सांगा ज्यांना ज्यांना हे गाणं कोणत आहे हे समजलं असेल त्यांनी ..!

Address

Dhule

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनता - The People posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जनता - The People:

Share