27/10/2025
धुळे : उत्तर महाराष्ट्रात अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा — खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या पुढाकाराला मुख्यमंत्री फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद
-
उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना कर्करोग उपचारासाठी नाशिक, पुणे किंवा मुंबई गाठावी लागते, अशा परिस्थितीत धुळे येथे अत्याधुनिक कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्याची मागणी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी संसदेत आणि राज्य शासनाकडे सातत्याने केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळालं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहरात कॅन्सर हॉस्पिटल मंजूर करण्याचा आश्वासक शब्द दिला आहे. या निर्णयामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.