जनता - The People

जनता - The People जनता-The People is dedicated to Marginalised and unprivileged people of India. It works on the principle of Dr. Ambedkar and Constitution.
(1)

28/09/2025

अनू. जाती आरक्षण वर्गीकरण विषयावर, मातंग समाज नेते प्रा. सुकुमार कांबळे यांचे रोखठोक विचार.
मातंग समाजाणं बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज महारांच्या पुढं असता.! संघाच्या हाती बौद्ध न लागल्यामुळे मातंग जवळ केले लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादी हा खोटा प्रचार... प्राध्यापक सुकुमार कांबळे आरक्षण वर्गीकरण स्फोटक मुलाखत #संघाच्या_हाती_बौद्ध_न_लागल्यामुळे_मातंग_जवळ_केले #लहुजी_वस्ताद_आणि_अण्णाभाऊ_साठे_हिंदुत्ववादी_हा_खोटा_प्रचार #आरक्षण_वर्गीकरण_स्फोटक_मुलाखत #प्राध्यापक_सुकुमार_कांबळे #मातंग ्की शेअर करा.

17 सप्टेंबर ...भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार ,बौद्धाचार्यांचे जनक ,भारतीय बौद्ध महासभे...
17/09/2025

17 सप्टेंबर ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार ,बौद्धाचार्यांचे जनक ,भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष,पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे ट्रस्टी,बौद्धजन पंचायत समितीचे सभापती,माजी आमदार,सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांना स्मृती दिन निमित्त विनम्र अभिवादन.🙏🙏

07/09/2025

प्रबोधनकार केशवसुत ठाकरे (बाळासाहेब ठाकरे यांचे वडील) हे सामाजिक, धार्मिक व राजकीय जागृतीसाठी अखंड लढणारे कार्यकर्ते होते. १९२०–३० च्या काळात त्यांनी गणेशोत्सवाला केवळ धार्मिक कार्यक्रम न ठेवता तो सामाजिक प्रबोधनाचे व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केला.

👉 याच काळात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवले होते.
त्याकाळी अस्पृश्यतेची भीषण परिस्थिती होती. तथाकथित उच्चवर्णीय लोक सार्वजनिक गणपतीत अस्पृश्य समाजातील नेत्यांना बोलवणंही पसंत करत नसत. पण प्रबोधनकार मात्र वेगळे विचारवंत होते.

🎤 आंबेडकरांना व्यासपीठावर बोलावून त्यांनी संदेश दिला की –
"गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रबोधन घडवायचे साधन आहे. अस्पृश्य समाजातील नेते, विचारवंत यांना यात प्रमुख्याने स्थान दिले पाहिजे."

त्या वेळी प्रबोधनकारांचा हा निर्णय खूप धाडसी मानला गेला.
कारण उच्चवर्णीय नेत्यांकडून विरोध झाला, टीका झाली. पण त्यांनी ते निमंत्रण कायम ठेवलं आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला.👉 प्रबोधनकार ठाकरे यांनी जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गणेशोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिलं, तेव्हा तो काळ अत्यंत तणावपूर्ण होता.
अस्पृश्यांना सार्वजनिक सण, व्यासपीठ, मंदिरं या ठिकाणी प्रवेश द्यायची उच्चवर्णीयांची तयारी नव्हती.

त्या वेळी बाबासाहेबांना धमक्या मिळालेल्या होत्या की –
"जर तुम्ही अशा उत्सवाला गेलात तर हल्ला होईल."
तरीही ते निमंत्रण स्वीकारून ते गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर गेले.

⚡ बाबासाहेबांनी खबरदारी म्हणून आपल्याबरोबर रिव्हॉल्व्हर नेली होती.
कारण त्यांना माहिती होतं की त्या वेळी समाजातील कट्टर लोकांकडून जीवावर बेतू शकतं.
परंतु त्यांनी भीतीला बळी न पडता कार्यक्रमात भाग घेतला आणि भाषणातून अस्पृश्यतेविरुद्ध आपला ठाम आवाज उठवला.

ही घटना दोन गोष्टी दाखवते :

1. प्रबोधनकार ठाकरे यांचा धाडसी सामाजिक दृष्टिकोन – त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध बाबासाहेबांना सन्मानाने व्यासपीठ दिलं.

2. बाबासाहेबांचा निर्धार – जीव धोक्यात घालूनही ते आपल्या लोकांच्या सन्मानासाठी पुढे सरसावले.

 100% true..Ten unknown Facts About  1. The first film ever made was "Roundhay Garden Scene" in 1888, directed by French...
21/08/2025


100% true..
Ten unknown Facts About

1. The first film ever made was "Roundhay Garden Scene" in 1888, directed by French inventor Louis Le Prince.

2. The first Hollywood film was "The Squaw Man" in 1911, directed by Oscar Apfel and Cecil B. DeMille.

3. The first 3D film was "The Power of Love" in 1922, directed by Nat G. Deverich and Harry K. Fairall.

4. The first film with sound was "The Jazz Singer" in 1927, directed by Alan Crosland.

5. The longest film ever made was "Ambian" in 2016, directed by Anders Weberg, with a runtime of 720 hours.

6. The highest-grossing film of all time is "Avengers: Endgame" in 2019, directed by Anthony and Joe Russo.

7. The most Academy Awards won by a single film is 11, achieved by "Ben-Hur" in 1959, "Titanic" in 1997, and "The Lord of the Rings: The Return of the King" in 2003.

8. The first film to featur e a computer-generated image (CGI) was "Westworld" in 1973, directed by Michael Crichton.

9. The first film to use motion capture technology was "The Lord of the Rings: The Fellowship of the Ring" in 2001, directed by Peter Jackson.

10. The highest-paid actor of all time is Keanu Reeves, with a salary of $250 million for "The Matrix" trilogy.

゚ explore.org BHIM ARMY Highlight ....

Satyam.Babu Satyam.Babu Satyam.Babu

" जनता" 🗞️📰 साप्ताहिक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक दुर्मिळ फोटो..   ❤️🌿☘️ #जयभीम       💙✊🇪🇺
19/08/2025

" जनता" 🗞️📰 साप्ताहिक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक दुर्मिळ फोटो.. ❤️🌿☘️

#जयभीम 💙✊🇪🇺

19/08/2025

आज जागतिक फोटोग़्राफी दिन
तुमच्या मोबाईलमध्ये असलेला बाबासाहेबांचा तुमचा आवडता फोटो कमेंट करा .

25/05/2024

बॉलिवूडचे बहुतेक सेलिब्रिटी हे हवेत असतात यांना फक्त स्वतःच स्टारडम वैगरे याच्या पलिकडे त्यांना काहीच माहिती नसत त्यात स्टार किड्स म्हणटल तर त्यांचा आणि वैचारिक दृष्टया बुद्धीचा संबंध असल अस वाटत नाही पण जान्हवी कपुर ला लल्लनटॉप शो मध्ये विचारल जर टाईम मशीन ने भुतकाळात जाता आल तर कोणाला बघायला काय करायला आवडल तर तिने उत्तर दिले मला आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेला संवाद बघायला आवडल तिच उत्तर ऐकून आश्चर्य वाटल.

प्रबुद्ध भारतच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा !डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक ते प्रबुद्ध भारत' असा पत्रकार...
04/02/2024

प्रबुद्ध भारतच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक ते प्रबुद्ध भारत' असा पत्रकारितेचा प्रवाह निर्माण केला. तो बाबासाहेबांनी चालवला. १९३० मध्ये बाबासाहेबांनी 'जनता' पाक्षिक सुरू केले. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी 'जनता' पाक्षिकाचे रूपांतर "प्रबुद्ध भारत''मध्ये झालं.

प्रबुद्ध भारत हे नाव घेतांना भारताचे संविधान लिहले जात होतं. भारताला 'प्रबुद्ध' करणे ही गरज होती म्हणून त्यांनी 'प्रबुद्ध भारत' हे नाव ठेवले. या मागे लोकांना शहाणे करणे हा उद्देश बाबासाहेबांचा होता.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी अनेक संकटांवर मात करून प्रबुद्ध भारत सुरू ठेवले. गेली अनेक वर्षे आम्ही 'प्रबुद्ध भारत' चालवतोय. यासाठी अनेक जण मदत करतात.

वर्तमानपत्र हा चळवळीचा आरसा आहे. त्यामुळे हे वर्तमानपत्र चालविण्यासाठी सर्वांनी मदत करावी. मदत म्हणजे त्यांनी सभासद, वर्गणीदार व्हावे. ह्या दोन गोष्टी सर्वांनी केल्या, तर आंबेडकरी चळवळीचे वर्तमानपत्र चालू शकते. आज मोठ्या खेदाने म्हणावं लागतंय की, आंबेडकरी चळवळीतील माणूस हा इतिहासात जगतोय, तो वास्तवात जगत नाही. याचे सर्वात मोठे कारण की, वास्तव काय आहे? वर्तमान काय आहे? हे त्याला कोणी समजवून सांगत नाही.

'प्रबुद्ध भारत' आज वर्तमानस्थिती काय आहे? भविष्यकाळ काय आहे? हे समजावून सांगतो. म्हणून स्वतःला प्रबुद्ध करून घेण्यासाठी 'प्रबुद्ध भारत' वाचा, आपल्या समोरील आव्हाने समजून घ्या, प्रबुद्ध भारतचे वर्गणीदार व्हा, हे आवाहन आम्ही आपल्याला करतो.

Anjali Ambedkar ताई यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण त्यांना काय शुभेच्छा द्याल?
28/11/2023

Anjali Ambedkar ताई यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

आपण त्यांना काय शुभेच्छा द्याल?

घटनासमितीचे कामकाज ज्या प्रशस्त सभागृहात चालत असे, त्यात सभासदांना बसण्यासाठी लाकडी बेंच असत.मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकर...
26/11/2023

घटनासमितीचे कामकाज ज्या प्रशस्त सभागृहात चालत असे, त्यात सभासदांना बसण्यासाठी लाकडी बेंच असत.मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी विशेष प्रकारची खुर्ची तयार करून घेण्यात आलेली होती. त्याचे कारण असे की, बाबासाहेबांच्या बेंबीच्या खाली ओटीत एक फोड (Boil) झालेला होता.आणि आपल्याला हे माहीत आहेच की बाबासाहेबाना मधूमेहाचा त्रास होत असे.मधूमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीला जखम झाली की तर ती लवकर भरून येत नाही किंवा लवकर बरीही होत नाही.बाबासाहेबाना मधूमेहाचा जास्तच त्रास असल्याने फोडाची जखम कांही केल्या बरी होत नव्हती आणि त्या फोडाचा बाबाना इतका त्रास होत असे की,त्यांना नीटपणे बसता येत नव्हते.त्या फोडाच्या जखमेचे दररोज ड्रेसिंग करण्याचे काम माईसाहेब करीत असत.(माईसाहेबांचे एवढे तरी ऋण आंबेडकरी अनुयायानी मान्य करायलाच हवे) कापसाचा एक मोठा बोळा त्या फोडामुळे तयार झालेल्या बसत असे एवढी मोठी ती जखम होती.परंतु घटना लिहिण्याचे व ती घटना समितीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचे काम अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांच्यासाठी खास खुर्ची तयार करून घेण्यात आली होती आणि याच खुर्चीत बसून बाबासाहेबानी संविधान लिहिण्याचे काम पूर्ण करून ते डाॅ.राजेंद्रप्रसाद यांच्या हाती सुपूर्द केले.या ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार असलेली ती खुर्ची आजही आपल्याला सिम्बायोसिस संस्थेच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल व म्युझियम, सेनापती बापट रोड पुणे येथे पहावयास मिळते.

खाली फोटोत दर्शविलेली विशिष्ट खुर्ची तीच आहे ज्या खुर्चीवर बसून बाबासाहेबानी संविधान लिहिले.

#संविधान_स्वीकृती_दिन

जयभीम, जयभारत
साभार - बी.एन.साळवे सर

जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमातील नामवंत संस्था आहे. याची तुलना आय.आय...
03/11/2023

जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमातील नामवंत संस्था आहे. याची तुलना आय.आय. एम. अहमदाबाद बरोबर होते.

राखीव जागांमुळे गुणवत्ता असणाऱ्या मुलांवर अन्याय होतोय अशी ओरड करणाऱ्यांनी ही कट ऑफ पहावी.

सर्व प्रतिथयश शिक्षण संस्थांमध्ये अनारक्षित आणि राखीव उमेदवारांच्या गुणात फारसा फरक नाही.

खोटे वाटत असेल तर वैद्यकीय शिक्षणासाठी जे.जे. मेडीकल कॉलेज, जी.एस. मेडीकल कॉलेज, बी.जे. मेडीकल कॉलेज, तर अभियांत्रिकी शिक्षणासाठी व्हिजेटीआय, सीईओपी, एसपीआयटी यांची कट ऑफ तपासा.

मेरीटच्या बाता मारणाऱ्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना यांच्या आसपास काय ३०%ने कमी म्हणजे ६५-७० % पण गुण नसतात.

कट ऑफ म्हणजे ज्या गुणांवर प्रवेश बंद झालाय ते गुण!

#आरक्षण_चार

तोंडावर फेकून मारा त्यांच्या जे 35% वाला डॉक्टर होतो आणि 98% टक्के वाला त्याच्या हाताखाली काम करतो अशी वल्गना करतात.

 #पुणे_करार
24/09/2023

#पुणे_करार

Address

Dr. Babasaheb Ambedkar Nagar , Jaitane
Dhule
424305

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनता - The People posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जनता - The People:

Share