Dombivli Varta

Dombivli Varta Sarva Samanyachya Hakkache Vyaspith.

23/04/2025

काल जम्मू काश्मिर मध्ये भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध !!!

20/04/2025

प्रत्येक सरकारी हॉस्पिटल्सच्या पोस्ट मार्टम "रूममध्ये " कॅमेरे " लावणे सक्तीचे होणार .

07/04/2025

!! ऑडिट !!!
प्रतिनिधी. .... . सध्या महाराष्ट्रात वारंवार घडत असलेले घृणास्पद प्रकार पहाता , मुंबई, पुणे ,ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथील मोठ्या खाजगी व धर्मादाय हॉस्पिटल्स चे दरमहा ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण "" कोरोना "" च्या काळात याच डॉक्टर्स नी नुसता धुडगूस घातला होता ... शिकाऊ डॉक्टर तर त्या काळात बंगले बांधून बसले होते. ज्यांनी मानवी जीवनाचे मूळ तत्व अंगिकारण्या ऐवजी गोरगरिबांना मरण यातना दिल्या .अशा हैवान डॉक्टर्स ना भर चौकात फासांवर दिले पाहिजे .
हे प्रकार पुण्यांत हल्ली बरेच वेळा होतानां दिसतात .. आणि भिकारी राजकारणी लोकांनी सार्वजनिक क्षेत्रात हस्तक्षेप करून या पवित्र कार्याचा बाजार उठवला आहे ... .प्रत्येक वेळी घडलेली घटना त्या भागातील सर्वसामान्य नागरिकांनी च , त्याचा न्याय करून संपविणे इष्ट ठरते .उगाचच राजकीय रंग देऊन त्या घटनेचे भांडवल करू नये ...दीनानाथ मंगेशकर " हॉस्पिटल ची जागा ही एका सर्वसामान्य नागरिकाची होती व ती त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी मा.शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून एका चांगल्या सेवाभावी संस्थेला दान दिली होती .परंतु काहीं राजकारणी लोकांना हाताशी घरून तेथे हे हॉस्पिटल बांधले गेले .....आणि सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ज्यांची ही जमीन होती त्यांच्याच वारसाकडून हे हरामी डॉक्टर्स १० लाखांची अनामत् रक्कम मागतात ??
अशा डॉक्टर्स ना आणि त्यांच्या वरिष्ठाना भर चौकात फटक्यांची शिक्षा देणे उचित ठरेल ...यापुढे कोठेही असे प्रकार घडल्यास त्याचे राजकारण न करता दोषी असलेल्या लोकांना त्वरीत शासन होणे आवश्यक आहे . तरच हे अघोरी / निंदाजनक प्रकार नक्की आटोक्यात येतील ..... असे क्रोधानेच म्हणावे लागते ..
शब्दांकन. .... वसंत कशेळकर पत्रकार..

07/04/2025

"" घोटाळेबाज डोंबिवली ""
ठाणे जिल्ह्यात "" डोंबिवली "" हे तथाकथीत शहर सर्वार्थाने , " घोटाळे , गुन्हेगारी आणि बेशिस्त बांधकामे "" यांचा अड्डाच बनले आहे.
खरे तर महाराष्ट्र सरकारने या शहराची " स्मार्ट सिटी घोषित " करूनही यात काहीच सुधारणा झाली नाही . फक्त नागरिक स्मार्ट झाले प्रत्येक सोसायटीत पार्किंगसाठी जागा नसतानाही गाड्यांची गर्दी वाढली .फुटपाथ गायब झाले .."" कल्याण RTO च्या "" मेहेरबांनी मुळे वाहतूक कोंडी वाढली .... ब्युटी पार्लर च्या नावाखाली अनैतिक धंदे राजरोस घडतांना दिसतात. .शेअर बाजार, भिसी , आणि बोगस बँका / पतपेढ्या तर फसवणूक करायला बसल्या आहेतच .....
एवढे सर्व प्रकार सर्रास चालू असून सुद्धा येथील अति सुशिक्षीत / जाणकार मंडळी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून रहात आहेत याचीच लाज वाटते आणि चीड ही येते. डोंबिवलीत रोज नवीन घोटाळे होतच आहेत .आता तर आपलेच काही मराठी लोक "" क्लासेस च्या गोंडस नावाखाली "" सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना शेअर बाजारांत ओढून घेऊन त्यांची घोर फसवणूक करीत आहेत. .. याप्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना पकडले आहे .....
पण या मुलांचे पालक मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येते कारण यापूर्वी मुंबईत मोठा " टोरेस् " घोटाळा नुकताच झाला होता ..कोणत्याही फसवणुकीच्या प्रकारात डोंबिवली १ नंबर वर आहे ..... अजूनही वेळ गेली नाही . नागरिकांनी डोळे आणि कान नीट शाबूत ठेवणे फारच गरजेचे आहे . नाहीतर हे दररोज नवनवीन भूल भुलैया तुम्हाला त्यांच्या जाळ्यात ओढून घेतील .असे खेदानेच म्हणावे लागते ......
लेखक......वसंत कशेळकर . पत्रकार.

30/03/2025

ब्राम्हण सभेच्या मागील बाजूची KDMC ची मराठी शाळा गायब ?? लवकरच तेथे मोठा टॉवर उभा रहाणार ??? मराठीचे पाईक कुठे गेले ?? डोंबिवली गावाचा बट्ट्याबोळ !!!

03/03/2025

!!! शिस्त !!!
डोंबिवली शहराला खरोखरच "" स्मार्ट सिटी "" म्हणून ओळख हवी असेल तर प्रथम दोन गोष्टी करणे फारच गरजेचे वाटते , १ ) डोंबिवली आणि कल्याण मधील रिक्षांना मीटर सक्तीचे केले पाहिजेत ..२) शहरातील ४ चौकात सिग्नल यंत्रणा सदोष चालू करा ......३) RTO च्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन , रिक्षा परवाने देणे बंद केले पाहिजे ...... या शहरातील नागरिक बेपर्वाइने वागतात हे १०० % सत्य आहे. तरी ही येथील रिक्षावाले त्यांचे नाव पुढे करून मीटर ने रिक्षा चालवीत नाहीत .त्यामुळे त्यांची मुजोरी वाढली आहे ..
ठाणे शहर हे खरोखरचं शिस्तबद्ध आहे यात शंकाच नाही .त्याची तुलना करायला हवी असेल तर डोंबिवलीत अनेक वर्षे चाललेला गलथान कारभार सुधारायला लागेल ...रिक्षा मीटर प्रमाणे धावू लागल्या तर शहरात कधीही वाहतूक कोंडी होणार नाही आणि भाडे नाकारणाऱ्या मुजोरी चालकांना भरपूर चाप बसेल यावर कुणाचेही दुमत नसावे. ......
सध्या "KDMC " चे नाव मूठभर लोकांमुळे पार धुळीला मिळाले आहे ..."" कोठेही आग लागल्याशिवाय धूर येत नाही "" त्या प्रमाणे येथील बांधकामात जो मोठा भ्रष्ठचार गाजतोय तो खराच आहे .म्हणून त्याचा गाजावाजा झाल्यावर मा. आयुक्तांनी त्यावर कारवाई सुरु केली आहे ... या सुंदर शहराची येथील तथाकथीत पुढारी मंडळीनी पुरती वाट लावली आहे. आणि बाहेरून आलेल्या सर्वसामान्यांनी येथील जाणकार मंडळीचा सल्ला न घेतांच स्वस्त म्हणून घरे खरेदी केली आणि त्यांची फसगत झाली .त्यात त्यांचाही थोडा दोष आहे हे नाकारता येत नाही. .
एवढे सर्व महाभारत घडल्यामुळे आता लोकांचा डोंबिवली " तील सर्व बांधकामावरील विश्वास साफ उडाला आहे हे खरे सत्य आहे असे नाईलाजाने च नमूद करावेसे वाटते...
शब्दबोध लेखन..... वसंत कशेळकर पत्रकार संपादक साप्ताहिक "डोंबिवली वार्ता "".

26/02/2025

!! दुर्दैव !!
गेल्या ४ /५ वर्षात महाराष्ट्रात "खून ,बलात्कार , अपहरण / खंडणी आणि हिट रन " यासारखे गुन्हे राजरोस घडतांना दिसतात . परंतु आपले भारतीय कायदे फारच लवचिक असल्याने त्यांच्यामध्ये पळवाटा च जास्त आहेत ... आणि त्याचाच फायदा हे गुन्हेगार आणि त्यांना वाचवणारे वकील ( चोराचे साथीदार ) नेहमीच घेत असतात ...
आणि त्यामुळेच काळ सोकावतो. सध्या राज्यात तेच चालू आहे ... आणि हे राजकारणी लोक , राज्यातील वातावरण दूषित करण्यात दंग आहेत ... या राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्ठाचार बंद केला तर हे चोर नेतेच उपाशी मरतील हे सत्य आहे ... यासाठी प्रथम देशाचे कायदे फारच कडक करणे अत्यंत गरजेचे आहे .... एका .. बलात्कारी माणसाला नपुसंक केला तरच दुसरा घाबरून जाईल ..... रस्त्यावरच्या कुत्र्यांना जशी इंजक्शने देतात त्याहून भारी अशा लोकांना द्या म्हणजे राज्यातील या घटनांना आपोआप आळा बसेल ...... खंडणी / खून आणि अनधिकृत बांधकामासाठी वेगळे कायदे बनवायला हवेत .पण प्रत्यक्षात मात्र तसे घडतांना दिसत नाही हेच खरे दुर्दैव आहे. ...
कल्याण / डोंबिवली तील अनधिकृत टॉवर च्या प्रकरणात खरे पाहिले तर KDMC बरोबरच इतरही बरेच जण या भ्रष्ठचारात बरबटले आहेत .. परंतु स्वस्त मिळाली म्हणून घरे खरेदी करणारे सर्वसामान्य लोक मात्र यांत फुकटचे भरडले गेले . यावर दोषी / चोर लोकांना पकडण्यापेक्षा सर्व पक्षांचे लोक फक्त त्याचे राजकारण करीत बसलेत याचाच राग येतो . ..... आणि या सर्वांमुळे चांगल्या गोष्टींवरचा विश्वासच उडत चालला आहे .त्यामुळेच डोंबिवली शहराचा पुरता बाजार उठला आहे ..... चार रस्त्यावरील लावलेले सिग्नल ( लाखों रुपये खर्च करून ) गेल्या १० वर्षांपासून मयत झाले आहेत ...हे एकाही नागरिकाला दिसत नाही का ?? पण डोंबिवली म्हणजे फक्त "" लॉजिंग बोर्डिंग "" शहर झाले आहे याचीच लाज वाटते ...
उपरोध लेखन....... वसंत कशेळकर .(डोंबिवलीकर सुज्ञ नागरिक)

17/02/2025

डोंबिवलीतील , त्या ६५ "" अनधिकृत टॉवरचे बिंग फुटले 👍👍.... प्लम्बर , इलेक्ट्रीशियन , इन्व्हर्टर बॅटरी विकणारे बिल्डर बनले ..... NDTV च्या बातमीने डोंबिवली ची पोल खोल केली ..... यामागील खरे चोर लवकरच जाळ्यात येणार .... निरपराध नागरिकांना योग्य न्याय मिळण्याची आशा आता जोर धरू लागली आहे
पोलीसांनी अशा चोरांना पकडून त्यांची नावे जगजाहीर करावीत म्हणजे बाकीच्यांना त्याची जरब बसेल ..... यावर आता KDMC चे आयुक्त डॉ इंदुमती जाखड यांनी दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून त्या निरपराध नागरिकांना योग्य तो न्याय देणे फारच गरजेचे आहे........
या साठी "" साप्ता. डोंबिवली वार्ता "" चे मालक / संपादक श्री . वसंत कशेळकर हे पाठपुरावा चालूच ठेवणार आहेत ....

10/01/2025

डोंबिवली पूर्वेला , टिळकनगर येथे पोस्ट ऑफिस शेजारी ,सुदर्शन "लीगल टॉवर "" मध्ये ....२ BHK चे ब्लॉक्स विक्रीसाठी थोडेच शिल्लक. Sample Flat तयार आहे. ........संक्रांतीला फ्लॅट खरेदी . करणाऱ्यास सवलत दिली जाईल...... ७ मजली टॉवर असून येत्या जुलै २०२५ ला ताबा मिळेल...... सर्व बँकांची लोन्स उपलब्ध. ...... त्वरा करा ...बुकींग साठी संपर्क..... 9820521308 . वसंत कशेळकर.

27/12/2024

महिला अत्याचाराचे गुन्हे ,प्रख्यात वकील श्री उज्ज्वल निकम साहेबांकडे सोपवा. नक्की न्याय मिळेल.

Address

Dombivili

Telephone

+919820521308

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dombivli Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dombivli Varta:

Share

Category