Citizen News Marathi

Citizen News Marathi Citizen Voice – The Voice of the People. Giving ordinary citizens a platform to be heard. Your Rights. Your Voice.

24/08/2026

तीन चिमुकल्यांचा अखेरचा श्वास... रुग्णालयातच सुरक्षेचा मृत्यू!

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षात पहाटे ३.३० वाजता व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला आणि आग लागली. या भीषण आगीत तीन निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू झाला.

ज्यांच्या आयुष्याची पहाटही झाली नव्हती, त्यांचा श्वास रुग्णालयाच्या भिंतीआड कायमचा थांबला...

आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरची ही काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. उपचारासाठी आणलेल्या चिमुकल्यांना रुग्णालयातच जीव गमवावा लागणे, ही केवळ दुर्घटना नाही; रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे.

या निष्पाप जीवांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
चौकशी होईल... पण गेलेले तीन जीव परत येणार आहेत का?

#अमरावती #दुर्घटना #नवजातशिशु #रुग्णालय #सुरक्षेचा_प्रश्न Maharashtra

23/08/2026

विकासासाठी बसलेल्या खुर्चीवरूनच सवाल!

“आम्ही आदिवासींच्या प्रश्नांसाठी आदिवासी मंत्र्यांना भेटायला गेलो. पण मंत्री म्हणाले—‘सॉरी, मी काही करू शकत नाही… हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.’”

‘छत्रों की गुंज’ कार्यक्रमात एका आदिवासी मुलीने सांगितलेला हा अनुभव अस्वस्थ करणारा आहे.

आदिवासी मुलांच्या विकासासाठी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली असेल, तर प्रश्न सोडवण्याची जबाबदारीही स्वीकारावी लागेल ना?

“आमचा विकास साधू शकत नसाल, तर त्या खुर्चीवर का बसले आहात?”

या एका सवालात आदिवासी समाजाच्या अपेक्षा, वेदना आणि व्यवस्थेला विचारलेला मोठा प्रश्न दडला आहे.
#आदिवासी #आदिवासीप्रश्न

22/08/2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयफोनच्या हट्टातून मुलाने २४६ फूट उंच डोंगरावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेले वडीलही दरीत कोसळले. त्यानंतर आईनेही दरीत उडी घेतली… आणि या दुर्दैवी घटनेत अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं.

एका हट्टाने कुटुंबाचा संसारच संपवला… ही घटना प्रत्येक पालकाला हादरवून सोडणारी आहे.

#छत्रपतीसंभाजीनगर #धक्कादायकघटना #दुःखदघटना #महाराष्ट्र

17/08/2026

कर्जत कोंदिवडेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर भन्नाट ‘फिल्ड रिपोर्टिंग’ करणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनींची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.

कु. नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या दहावीतील तीन विद्यार्थिनींनी छत्रीचा माईक बनवून केलेला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. राज ठाकरे यांनी मुलींचे कौतुक करत त्यांच्या शिक्षणाची आणि भविष्यातील वाटचालीची विचारपूस केली व शुभेच्छा दिल्या.

खड्ड्यांचा प्रश्न मांडण्याची ही भन्नाट पद्धत चर्चेत!

16/08/2026

बॉलिवूडच्या बड्या स्टार्सना एफडीए ची नोटीस!

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे कर्तबगार, डॅशिंग आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या 'विमल पान मसाला/इलायची'चा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा एफडीए चा आरोप आहे.

'इलायची'च्या जाहिरातीच्या माध्यमातून पान मसाल्याची जाहिरात केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, याबाबत तिन्ही कलाकारांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. इतिहासात पहिल्यांदा आय ए एस अधिकाऱ्याने बॉलिवूडच्या बड्या स्टार्सना नोटीस बजावली आहे. गुटखा, पान मसाला आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधातील एफडीए ची मोहीम आता अधिक तीव्र!

ाठी

16/08/2026

छत्रपती संभाजीनगरसह कल्याणमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन!
परीक्षा केंद्रांवर संगणक, स्क्रीन आणि किबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.

⏳ वेळ वाया गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा दावा. हायकोर्ट लिपीक परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी!

 #महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ची मोठी कारवाई!आग्नेय आशियाई सुपारी बांगलादेशी असल्याचे खोटे दाखवून दक्षिण आशियाई मुक...
16/08/2026

#महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ची मोठी कारवाई!

आग्नेय आशियाई सुपारी बांगलादेशी असल्याचे खोटे दाखवून दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (साफ्टा) शुल्कसवलतीचा गैरफायदा घेणारे मोठे जाळे उघडकीस!

💰 ₹2,500 कोटींहून अधिक महसूल फसवणुकीचा संशय
🚔 9 जणांना अटक
📦 160 मेट्रिक टन सुपारी जप्त
💵 ₹75 लाख रोकड जप्त

कोलकाता आणि विशाखापट्टणममध्ये DRI ची मोठी कारवाई. तपास सुरू.

#सुपारी

Address

Dombivli

Telephone

+919821671737

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Citizen News Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Citizen News Marathi:

Shortcuts

Share