17/12/2024
*व्वाह! रे , ये खाकी वर्दी.. तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती?*
विषय हा जिव्हाळ्याचा होता
फक्त परभणीच नाही तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक संविधान प्रेमींचा होता.
रक्षकांनीच केली निर्घृण हत्या
*व्वाह! रे, ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती?*
संविधान प्रतीची मोडतोड करणाऱ्याला दिली...
तू मनोरुग्णाची उपमा,
न्याय मागणाऱ्याच्या अंगावर गिरवल्या तू चाबूकाने जखमा
*व्वाह!रे, ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती?*
कोंबिंगच्या नावाने घातला तू डोळ्यावर चश्मा.
बाईमाणसाला गुरासारखं मारताना दुखला नाही का तुझा आत्मा.
*व्वाह!रे , ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती?*
हृदयविकारच षडयंत्र तू रचलं
क्रूरतेने मारलेलं सत्य समोर आलं
सोमनाथच्या अंत्यविधीच्या ज्वाळेची आग,
प्रत्येक दिवशी समाजाला देईल क्रांतीची जाग,
*व्वाह!रे ,ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती?*
रक्षक झाले भक्षक
वर्दी घालून खाकी रंगाची आले हे जातीवादी राक्षस
*व्वाह! रे, ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती ?*
जातीवादाची अवदसा जोपासलीस तू ठायीठायी.
तुझ्यावर होता तो विश्वास आता राहिला नाही
*व्वाह!रे ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती?*
जाता जाता ठणकावून सांगतो,
एक सोमनाथ तू संपवला जरी,
हजारो सोमनाथ तुला मुखी जयभिम हाती क्रांतीची मशाल घेऊन भेटतील घरोघरी
*व्वाह! रे, ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती?*
तुझ्यातली निघेल बाहेर जेव्हा ही जातीवादी चंडाळ
आम्ही ही तेव्हाच दूर करू तुझा हा इटाळ
*व्वाह! रे, ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती ?*
सोमनाथ जाता जाता देऊन गेला 'जयभिम' हा नारा
वाहत आहे प्रत्येक घरात क्रांतीचा वारा
तू एक सोमनाथ बळी घेऊन घालवलास
पण आम्हास ठाऊक प्रत्येक घरात सोमनाथ जयभिम करण्यासाठी जन्मास घातलास
*व्वाह! रे, ये खाकी वर्दी तुझ्यात ही दिसू लागली जातीवादी वृत्ती ?*
*शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे....*
आपला
*सुरेंद्र ठोके*