
25/06/2025
अभिनंदन बेटा फाल्गुनी ताई!
खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील उर्फ फाल्गुनी पवार हिने एक राष्ट्रीय विक्रम नोंदवीला आहे. फाल्गुनी हिची निवड भारत सरकाराच्या परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. यां निवडीचे विशेष महत्व म्हणजे यां जागेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत फाल्गुनी हीं भारतात, महाराष्ट्रात नव्हे तर भारतात देश पातळीवर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. याचा सर्व खान्देशी बांधवाना गर्व आहे.
खरं तर फाल्गुनी यां खान्देश कान्येच नांव *फारगुणी* असायला हवं होतं. ती फार गुणी आहे. तीच माहेर टाकळी प्र दे ता चाळीसगाव येथील पवार कुटुंबातील आहे. माहेरच नांव फाल्गुनी संजय पवार आहे तर, सासरच ना सौं फाल्गुनी गणेश पाटील शिरूड ता अंमळनेर येथील आहे. तीचे यजमान गणेश पाटील हे सुद्धा याच विषयांतील अभियंता आहेत.
फाल्गुनीचे वडील मा संजय पवार हे आपलें मित्र टाकळीचे असले तरी नोकरी निमित्त तें मुंबईत वास्तव्याला आहेत. तें कांदिवली उपनगरात राहतात. त्यांचं संपूर्ण कुटुंबचं उच्चं शिक्षित आहे. श्री संजय पवार सर प्राध्यापक आहेत. त्यांचं शिक्षण एम ए बी एड (इंग्रजी) एल एल बी आहे. त्यांच्या सौभाग्यवती सौं शर्मिला पवार यां संस्कृत विषययातील एम ए आहेत. त्या माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचे चिरंजीव ऋषिकेश पवार हा बी ई मेकनिकल एम बी ए असून बँक मॅनेजर आहे. सून प्राध्यापिका समृद्धी ऋषिकेश पवार एम फॉर्म आहे. असं यां उच्चं विद्याविभुशीत कुटुंबात फाल्गुनीचा जन्म झाला.
मुळात फारगुणी असणाऱ्या फाल्गुनीला असं चांगलं कुटुंबातील मिळालं. कांदिवतील, सरदार वल्लभभाई पटेल विविधलक्षी विद्यालयातून सुरवातीचे शिक्षण तीने घेतले. नंतर तिने व्हीजेटीआय माटुंगा येथून DEE(डिप्लोमा) केला. त्यांत फाल्गुनीला 89.97 गुण मिळाले. नंतर स्वामी विवेकानंद महाविद्यालय चेंबूर यां नामांकित महाविद्यालयातून पदवी मिळविली. तीचे यजमान आणि सासू एवढं तीच कुटुंब आहे. तें सध्या डोंबिवलीत वास्तव्य करून आहेत.
फाल्गुनीने मिळेवलेंले यश हे तिची प्रखर बुद्धिमत्ता आणि कडवी मेहनत याला जात असले तरी तिच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनाही त्याच श्रेय दिलं पाहिजे. यां मंडळींनी तीच ध्येय जपलं. तीला करियर घडविण्यासाठीच संपूर्ण स्वातंत्र्य दिलं, यांमुळे फाल्गुनी हीं फारगुणी होऊन देश पातळीवर लौकिक मिळावीला आहे. तिची निवड परमाणू ऊर्जा तंत्रज्ञान विभागात योग्य ठिकाणी झाली. तीच खूप खूप कौतुक अभिनंदन!
बेटा फाल्गुनी अशीच मोठी हॊ पुढे पुढे जातं रहा अवघ्या खान्देशाला तुझा गर्व वाटतो. परत एकदा तुझं, तुझ्या माहेरच आणि सासराच अभिनंदन!
बापू हटकर