19/06/2026
'रिल्स'च्या नादात मृत्यूला निमंत्रण..
काही लाईक्स, फॉलोअर्स आणि व्ह्यूजसाठी तरुणाई किती बेफाम होऊ शकते, याचं धक्कादायक उदाहरण संगमनेरमधील कुरकुंडी घाटात पाहायला मिळालं. भरधाव पिकअपची जीवघेणी स्टंटबाजी करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या बेदरकार प्रकारामुळे इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात आला असून, संबंधितावर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.