
14/06/2025
अभिनंदन व शुभेच्छा 💐 💐
कु. पृथ्वी राघोजी भालेराव ( गौतम नगर, गंगाखेड ) हीने अतिशय खडतर परिस्थितीतुन जिद्द,चिकाटी व मेहनतीने तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केवळ अभ्यासाच्या जोरावर स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) मध्ये Junior Associates ( Clark ) ची परिक्षा उत्तीर्ण होऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसतांना बांधकाम कामगार म्हणून काम करणारे तिचे वडील राघोजी भालेराव यांनी मेहनतीने आपल्या मुलीला शिक्षणासाठी पाठबळ दिले.मुलीनेही कठोर परिश्रम घेत, अभ्यासाच्या जोरावर SBI सारख्या नामांकित बॅकेत उच्च प्राप्त केले आहे.
कु. पृथ्वी व तिचे वडील राघोजी भालेराव या दोघांचेही अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असेच यश तिला पुढील काळात मिळो हीच तथागता चरणी प्रार्थना.