Nanded 24 News

Nanded 24 News बातमी मागची बातमी

13/10/2025

नांदेड जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागनिहाय आरक्षणाचा तपशील

#माहूर

१-वाई बा.- सर्वसाधारण,

२-वानोळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.

#किनवट

३-सारखणी- अनुसूचित जमाती,

४-मांडवी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीा),

५-गोकुंदा- सर्वसाधारण,

६-बोधडी बु.- अनुसूचित जमाती (स्त्रीआ.),

७- जलधारा- अनुसूचित जमाती,

८-इस्लालपूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर).

#हिमायतनगर

९-सरसम (बु)- अनुसूचित जमाती (स्त्रीर),

१०-पोटा बु.- सर्वसाधारण (स्त्री्).

#हदगाव

११-निवघा (बा)- अनुसूचित जाती (स्त्रीर),

१२-रूई धा.- सर्वसाधारण (स्त्रीत),

१३-मनाठा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),

१४-पळसा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,

१५-आष्टीा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,

१६-तामसा- अनुसूचित जमाती.

#अर्धापूर

१७-लहान- सर्वसाधारण,

१८-मालेगाव- सर्वसाधारण (स्त्री्),

१९-येळेगाव- सर्वसाधारण (स्त्री्).

#नांदेड

२०-वाजेगाव- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),

२१-वाडी बु.- सर्वसाधारण,

२२-लिंबगाव- अनुसूचित जाती,

२३-धनेगाव- सर्वसाधारण (स्त्री्),

२४-बळीरामपूर- अनुसूचित जाती.

#मुदखेड

२५-बारड- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,

२६-मुगट- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.

#भोकर

२७-पाळज- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,

२८-भोसी- अनुसूचित जमाती (स्त्री्),

२९-पिंपळढव- सर्वसाधारण.

#उमरी

३०-गोरठा- सर्वसाधारण (स्त्रीत),

३१-तळेगांव- अनुसूचित जाती.

#धर्माबाद

३२-करखेली- सर्वसाधारण,

३३-येताळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.

#बिलोली

३४-आरळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,

३५-सगरोळी- सर्वसाधारण (स्त्री्),

३६-लोहगांव- सर्वसाधारण,

३७-अटकळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).

#नायगांव (खै.)

३८-बरबडा- सर्वसाधारण (स्त्री्),

३९-कुंटूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर).

४०-मांजरम- अनुसूचित जाती (स्त्रीर),

४१-नरसी- अनुसूचित जाती (स्त्रीत).

#लोहा

४२-सोनखेड- सर्वसाधारण,

४३-वडेपूरी- सर्वसाधारण (स्त्रीत),

४४-उमरा- सर्वसाधारण,

४५-सावरगांव न.- सर्वसाधारण,

४६-कलंबर बु.- सर्वसाधारण (स्त्रीर),

४७-माळाकोळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर).

#कंधार

४८-शिराढोण- सर्वसाधारण,

४९-कौठा- अनुसूचित जाती (स्त्री्),

५०-बहाद्दरपुरा- सर्वसाधारण (स्त्रीर),

५१-फुलवळ- सर्वसाधारण (स्त्रीत),

५२-पेठवडज- सर्वसाधारण,

५३-कुरूळा- सर्वसाधारण.

#मुखेड

५४- जांब बु.- अनुसूचित जाती,

५५- चांडोळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),

५६- एकलारा- सर्वसाधारण,

५७-येवती- अनुसूचित जाती,

५८-सावरगाव पि.- अनुसूचित जाती (स्त्रीत),

५९-बा-हाळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),

६०-मुक्रामाबाद- सर्वसाधारण (स्त्री्).

#देगलूर

६१-खानापूर- अनुसूचित जाती (स्त्री्),

६२-शहापूर- अनुसूचित जाती,

६३-करडखेड- अनुसूचित जाती (स्त्री्),

६४-मरखेल- सर्वसाधारण (स्त्रीा),

६५- हाणेगाव- सर्वसाधारण.

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार : नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस ...
24/09/2025

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार : नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
नांदेड : राज्यात पत्रकार संरक्षण कायदा येत्या २६ नोव्हेंबर पूर्वी म्हणजेच संविधान दिनाच्या पूर्वी लागू करावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या कक्षासमोर आत्मदहन करू असा इशारा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनाही पाठविले आहे.
राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त , महाराष्ट्राच्या तमाम पत्रकारांचे पाठीराखे एस .एम. देशमुख यांनी तब्बल 40 वर्षे संघर्ष करून पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला परंतु या कायद्याची राज्य सरकारने सन 2019 पासून अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे राज्यातील मुजोर राजकारणी , माफिया , गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत. पत्रकारांचे खून केले जात आहेत. परिणामी पत्रकार भयभीत झाला असून देशाची लोकशाहीच धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी एस.एम. देशमुख यांनी मंजूर करून घेतलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची येत्या 26 नोव्हेंबर पूर्वी म्हणजे संविधान दिनाच्या पूर्वी राज्य सरकारने अंमलबजावणी करावी अन्यथा मुख्यमंत्रीच्या दालनासमोर मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशाराही राम तरटे यांनी दिला आहे . त्यानंतर माझ्या जीवितास काही झाले तर त्यास केवळ राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे

आता पत्रकारांचेही  #चलो_मुंबईपत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठीराज्यातील पत्रकार संघटनांचा ‘चलो मुंबई’चा नारामुं...
24/09/2025

आता पत्रकारांचेही #चलो_मुंबई

पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी
राज्यातील पत्रकार संघटनांचा ‘चलो मुंबई’चा नारा

मुंबई : राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस राज्य सरकारला भाग पाडण्याकरिता राज्यातील पत्रकार संघटनांनी आज चलो मुंबईचा नारा दिला आहे. विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत तयार केलेल्या "पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच" च्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबई, अमरावती आदि ठिकाणी पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उद्भवत असून, या संदर्भात राज्य सरकारने २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ च्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नोटीफिकेशन तातडीने काढावे, असा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. सरकारने याची तातडीने अंमलबजावणी न केल्यास टप्प्या टप्पयानं आंदोलनाची धार वाढवत नेण्याचा निर्णय घेण्यात आला.. त्यानुसार येत्या ११ ऑक्टोबरपासून यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असून 11 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना हजारो एस.एम. एस पाठवून त्यांचे लक्ष पत्रकारांच्या मागण्यांकडे वेधले जाईल..
त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.. त्यामध्ये महाराष्ट्रातील किमान 5000 पत्रकार सहभागी होतील.. त्यासाठी ‘चलो मुंबई’चा नारा या बैठकीत देण्यात आला आहे.
या बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, विश्वस्त राही भिडे, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राजा अदाटे , शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टिवकर, ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सुजित महामुलकर, मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशनचे विशाल सिंह, डिजिटल मिडिया परिषदेचे गणेश जगताप, युवराज जगताप, सुनील ह. विश्वकर्मा, अजय मगरे, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे राजेंद्र साळसकर आदि पत्रकार उपस्थित होते.
सरकारला जाग आणण्यासाठी येत्या ११ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राज्यभरातून पत्रकार लाखोंच्या संख्येने एसएमएस पाठवून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती करणार आहेत. त्यानंतरही सरकारचे डोळे उघडले नाहीत, तर संविधान दिनाचे औचित्य साधून आझाद मैदान येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत आणि यासाठी राज्यभरातील पत्रकार मुंबईत धडकतील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

17/09/2025
https://nanded24news.com/archives/2588
16/09/2025

https://nanded24news.com/archives/2588

हिमायतनगर - तालुक्यात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु आहे. पावसाने शेतकयांची झोप उजवली असुन चिंता...

https://nanded24news.com/archives/2591
16/09/2025

https://nanded24news.com/archives/2591

हिमायतनगर - सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस धो धो कोसळला, काहीतास विज गुल...

https://nanded24news.com/archives/2588
16/09/2025

https://nanded24news.com/archives/2588

हिमायतनगर - तालुक्यात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु आहे. पावसाने शेतकयांची झोप उजवली असुन चिंता...

https://nanded24news.com/archives/2575
16/09/2025

https://nanded24news.com/archives/2575

प्रहार संघटनेच्या हक्क यात्रेला कामारीत उत्स्फूर्त प्रतिसाद हिमायतनगर - जोपर्यंत शेतकरी एकजुट होत नाहीत तोपर्य...

हिमायतनगरचे माजी सरपंच तथा माजी जि.प. सदस्य शे. चॉंद सेठ यांच वृध्दापकाळान वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाल, त्यांचेवर दि ...
14/09/2025

हिमायतनगरचे माजी सरपंच तथा माजी जि.प. सदस्य शे. चॉंद सेठ यांच वृध्दापकाळान वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाल, त्यांचेवर दि १५ सोमवारी दुपारी १:३० च्या नमाजे जनाजा नंतर दफणविधी पुर्ण केला जाणार आहे. ते राजकारणा पलीकडे जाऊन संबंध जोपासत, अनेकांशी त्यांचे मैत्रिपुर्ण संबंध राहिले आहेत.

हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमाताई नागेश पाटील यांच मुंबई येथिल जसलोक हॉस्पिटल मध्ये उपच...
10/09/2025

हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमाताई नागेश पाटील यांच मुंबई येथिल जसलोक हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान निधन झाल, त्यांचेवर दि. ११ सकाळी १०:०० वाजता त्यांचे मुळ गावी आष्टी ता. हदगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

18/08/2025

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती बाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील नदी काठच्या गावाना सावधानतेचा ईशारा दिला आहे.

 #माता_अन्नपुर्णा_देवी_वडेपुरी
03/06/2025

#माता_अन्नपुर्णा_देवी_वडेपुरी

Address

Hadgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded 24 News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nanded 24 News:

Share