27/10/2025
आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली .
यावेळी इचलकरंजी शहर व विधानसभा परिक्षेत्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा सर्व नेते मंडळींसमोर सादर केला .
यावेळी माझ्यासह श्री व्ही. बी.पाटील , श्री. समरजीतसिंह घाटगे, श्री राजीव आवळे , श्री उदयसिंग पाटील, श्री अभिजित रवंदे यांच्या सह जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.