City Varta

City Varta मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !

या जिल्ह्यांमध्ये मोठी पोलिस भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठीनोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी ...
02/11/2025

या जिल्ह्यांमध्ये मोठी पोलिस भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून सरकारी नोकरी करायची असेल तर फटाफट अर्ज करा. सर्वात विशेष बाब म्हणजे पोलीस होण्याची संधी आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. रत्नागिरीमध्ये एकून 108 पोलिस पदाची भरती होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 171 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अगोदर 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. शारीरिक चाचणीत पास झालेल्यांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाईल.

रत्नागिरी पोलीस अधीक्षक आस्थापन 2024-25 दरम्यान 108 पोलिस शिपाईपदाची रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही संकेतस्थळावर उमेदवाराला मिळेल. जळगाव पोलीस अधीक्षक आस्थापन 2024-25 मध्ये पोलिस शिपाई रिक्त 171 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेचे प्रसिद्धीपत्रक जाहिर करण्यात आलंय. 30 नोव्हेंबरपर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल.

या पोलिस भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही प्रमाणपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहेत. त्याशिवाय तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. दहावी, बारावी आणि पदवीची मार्कशीट असणे आवश्यक आहे. दहावी पास उमेदवारही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकणार आहेत. जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास तर गुणपत्रक आवश्यक आहे.

आधार कार्ड, पॅन कार्ड, डिप्लोमा किंवा आयटीआय केला असेल तर त्याची मार्कशीट, टीसी, कास्ट सर्टिफिकेट, वयाचा पुरावा, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, जर तुम्ही खेळाडू असाल तर त्याचे खेळाडू प्रमाणपत्र, वडील पोलिस विभागात असतील तर त्याचेही प्रमाणपत्र, महिलांसाठी असलेले 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र अशी अजून काही महत्वाची कागदपत्रे आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

मुंबईतील घरविक्रीत घट; गेल्या वर्षीपेक्षा मागणी १४% कमी, ग्राहकांना दिलासा मिळणार ?बड्या शहरात घराच्या किंमती गगनाला भिड...
02/11/2025

मुंबईतील घरविक्रीत घट; गेल्या वर्षीपेक्षा मागणी १४% कमी, ग्राहकांना दिलासा मिळणार ?

बड्या शहरात घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात इतर कर, महागाई याचा ताळमेळ बसत नसल्यांनी ग्राहकांनी घर खरेदीची योजना पुढे ढकलल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यंदा ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये ११ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या या प्रमाणात १४ टक्क्यांची घट नोंदवली गेली. एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलातही घट होण्याच्या रूपाने दिसून आला.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १३ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली होती. त्याद्वारे राज्य सरकारला १२०५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाच्या वर्षी महसुलात १७ टक्क्यांची घट होत १००४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यंदा ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती. वास्तविक, या सणामध्ये गृहविक्रीला चालना मिळणे अपेक्षित होते. पण सणासुदीतही घर खर्चासाठीचे बजेट जुळत नसल्याने ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

केवळ गेल्या वर्षीच्याच नव्हे, तर गेल्या महिन्याच्या अर्थात सप्टेंबर २०२५ च्या महिन्याच्या तुलनेतदेखील ऑक्टोबर २०२५ या महिन्यात मालमत्ता विक्रीमध्ये ७ टक्क्यांची घट झाली.सप्टेंबर महिन्यात मुंबईत १२ हजार ७० मालमत्तांची विक्री झाली होती. मात्र, ज्या मालमत्तांची विक्री झाली आहे. त्यामध्ये ८० टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असून, २० टक्के मालमत्ता या कार्यालयीन, तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. चालू वर्षात मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार १४१ मालमत्तांची विक्री झाली आहे.

घरांच्या मागणीत घसरण झाल्यावर बिल्डर्स, विकासक त्यावर एकतर बड्या ऑफर्स आणतात. अथवा घराच्या किंमती कमी करतात. अथवा इतर काही आमिषं, जॅकपॉट अशा योजना आणून घरांची विक्री करतात. गृह प्रकल्पासाठीचा खर्च निघावा आणि तोटा होऊ नये यासाठी विकासक प्रयत्न करतात. त्यात ग्राहकांचीही फायदा असतो. त्यामुळे जर गृह विक्री अशीच कमी राहिली तर ग्राहकांना भविष्यात सध्याच्या दरांपेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. रिएल इस्टेटमध्ये मंदीचे सावट आल्यावर नवीन गृह प्रकल्पांना विकासक हात घालत नाहीत. त्यांना हे प्रकल्प अंगावर पडण्याची भीती असते. त्यामुळे आहे त्या प्रकल्पांतील घरं विक्रीवर भर देण्यात येतो. त्यासाठी किंमती कमी करण्यात येतात..
➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

‘बाहुबली: द एपिक’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; अवघ्या 3 दिवसांत तगडी कमाईएस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाह...
02/11/2025

‘बाहुबली: द एपिक’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; अवघ्या 3 दिवसांत तगडी कमाई

एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात तगडी कमाई केली होती. आता निर्मात्यांनी या दोन्ही चित्रपटांना एकत्रितपणे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित केलं आहे. या नव्या व्हर्जनचं नाव आहे ‘बाहुबली: द एपिक’. बाहुबलीचे दोन्ही भाग एकत्र जोडून हा मोठा चित्रपट बनवण्यात आला आहे. यामध्ये प्रभास, राणा डग्गुबत्ती, तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नव्या व्हर्जनलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बाहुबली: द एपिक’ या चित्रपटाने शनिवारी 7 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांची कमाई 17.80 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटाने प्रीमिअरच्या दिवशी 1.15 कोटी रुपये कमावले होते. तर पहिल्या दिवशी 9.65 कोटींचं कलेक्शन जमलं होतं. यामध्ये तेलुगू भाषेतत 7.9 कोटी रुपये, हिंदीत 1.35 कोटी रुपये, कन्नडमध्ये 20 लाख रुपये, तमिळमध्ये 20 लाख रुपये आणि मल्याळम भाषेत 18 लाख रुपयांची कमाई झाली. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 20 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. कोणत्याही पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी कमाईची ही रक्कम खूप मोठी आहे.

केवळ देशभरातच नाही तर परदेशातही या चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. अमेरिकेत ‘बाहुबली : द एपिक’ने 6.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं ग्लोबल कलेक्शनसुद्धा 18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. री-रिलीज चित्रपटांच्या कलेक्शनला पाहिलं तर राजामौलींचा हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘गब्बर सिंह’लाही मागे टाकलं आहे. गब्बर सिंहने री-रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली होती.

2015 मध्ये ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि त्याच्या दोन वर्षांनंतर 2017 मध्ये ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता 31 ऑक्टोबर 2025 रोजी ‘बाहुबली : द एपिक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा केवळ एक चित्रपट नाही तर सिनेमॅटिक स्पेक्टॅकल आहे, ज्याला डॉल्बी अटमॉस साऊंड आणि हाय-एंड व्हिज्युअल इफेक्ट्ससह जगभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट सलग पाच तास थिएटरमध्ये दाखवले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा आणि अनोखा अनुभव ठरतोय.
➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

कॅप्टन हरमनप्रीत कौर फायनलआधी भावूक, टीम इंडियाला उद्देशून काय म्हणाली ?आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 फायनलसाठी आता अवघे का...
02/11/2025

कॅप्टन हरमनप्रीत कौर फायनलआधी भावूक, टीम इंडियाला उद्देशून काय म्हणाली ?

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 फायनलसाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. या महामुकाबल्यात चमचमत्या ट्रॉफीसाठी टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या 6 पैकी शेवटच्या 3 सामन्यांमध्ये भारताला पराभूत केलं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत अवघ्या काही दिवसांआधी टीम इंडियाला साखळी फेरीत पराभवाची धुळ चारली होती. मात्र असं असलं तरी अंतिम सामन्याचा दबाव हा वेगळा असतो. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघावर दबाव असणार हे मात्र निश्चित. दोन्ही संघांनी इथपर्यंत येण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस हरमनप्रीत भावूक झाली होती.

टीम इंडियाची या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची यंदाची तिसरी वेळ आहे. भारताला याआधी 2005 आणि 2017 साली अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलं होतं. भारताचा 2017 साली अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध अवघ्या 9 धावांनी पराभव झाला होता. हरमनप्रीत कौर 2017 साली अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघात होती. तर आता हरमनप्रीत कॅप्टन आहे. टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. हरमनप्रीतने या महामुकाबल्याआधी भाष्य केलं. हरमनप्रीत नक्की काय म्हणाली? हे आपण जाणून घेऊयात.

“पराभूत झाल्यानंतर कसं वाटतं हे आम्हाला माहित आहे. मात्र यंदा आम्हाला विजयी झाल्यानंतर कसं वाटतं हे जाणून घ्यायचंय. आमच्यासाठी उद्याचा (2 नोव्हेंबर) दिवस खास असेल अशी आशा आहे. आम्ही फार मेहनत केली आहे. संपूर्ण टीमसाठी उद्याचा दिवस स्वत:ला झोकून देण्याचा आहे. हा माझ्यासाठी आणि संपूर्ण संघासाठी गौरवाचा क्षण आहे. गेल्या 2 सामन्यांमधील कामगिरीनंतर संपूर्ण देश आमच्यावर गर्व करतोय हे मला माहित आहे”, असं हरमनप्रीतने म्हटलं.

हरमनप्रीतने या महाअंतिम सामन्याआधी टीम इंडियाला खास मंत्र दिला आहे. “आपण वर्ल्ड कप फायनल खेळणं, यापेक्षा मोठी प्रेरणा नाही. टीम पूर्णपणे सज्ज आहे. खेळाडू एकमेकांना सपोर्ट करत आहेत. यातून संघातील एकीचं दर्शन होतं. तसेच आम्ही सामन्यानसाठी किती तयार आहोत, हे यातून सिद्ध होतं”, असंही हरमनप्रीत कौर हीने नमूद केलं.

दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील महाअंतिम सामना हा नवी मुबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा संपन्न, वारकऱ्यांसाठी घेतला निर्णयकार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात...
02/11/2025

एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा संपन्न, वारकऱ्यांसाठी घेतला निर्णय

कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा विधीवत संपन्न झाली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यासह शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते. यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना मिळाला.

वालेगावकर दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून वारी करत आहे. या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान मिळाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. पांडुरंगाच्या कृपेमुळे आम्हाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी मानाचे वारकरी असलेल्या या दाम्पत्याला एक वर्षाचा एस.टी. बस पास भेट म्हणून दिला.

या महापूजेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक महत्त्वाचे ऑन द स्पॉट निर्णय जाहीर केले. यासोबतच एकनाथ शिंदेंनी राज्यातील शेतकऱ्यांवरील अरिष्ट दूर व्हावे, बळीराजा सुखी व्हावा आणि महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रांत देशात नंबर एक व्हावे, असे साकडे विठ्ठलाकडे घातले. तसेच एकनाथ शिंदेंनी पूजेचा मान आणि संधी चौथ्यांदा मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या ठिकाणी व्हीआयपी लोक आम्ही नाही. याठिकाणी वारकरी व्हीआयपी आहेत. मी देखील शेतकरी व वारकरी कुटुंबातून आलो आहे. एक सामान्य कार्यकर्ता आणि शाखाप्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे ही पांडुरंगाचीच कृपा आहे. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, ही वारकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.

पंढरपूरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटी रुपये तातडीने दिले. तसेच मंदिर समितीला पर्यटक निवासाची जागा ३० वर्षांसाठी करार वाढवून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी जाहीर केला. आषाढीची महापूजा करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महापूजेनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच आगामी निवडणुकीसाठी विठ्ठल एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद देईल, असेही त्या म्हणाल्या.

आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशींना महापूजा करायला मिळाली, हे आमचे भाग्य आहे. पुढील वर्षी आषाढी वारीची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावर्षी मानाच्या वारकऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शाळकरी विद्यार्थ्यांनाही महापूजेला उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली होती. या निर्णयावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पूजेचा मान द्यायचा की नाही, हा मंदिरे समितीचा निर्णय आहे. पण, उद्या कुणीही मागणी करेल. महापूजा बाबत मंदिरे समितीने योग्य निर्णय घ्यावा, असे जयकुमार गोरे म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

Today 2 November 2025 : आजचा दिवस मस्त जाणार,वाचा रविवारचं राशीभविष्य !ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या काल...
02/11/2025

Today 2 November 2025 : आजचा दिवस मस्त जाणार,वाचा रविवारचं राशीभविष्य !

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी
आज तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात यश मिळेल. सहकाऱ्यांशी आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांशी उदारतेने वागा. कोणत्याही कामात तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची नियोजित कामे आज पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तुमचा प्रवास आनंददायी असेल.

वृषभ राशी
आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरीबाबत तुम्ही सल्ला घेऊ शकता, जो फायदेशीर ठरेल.

मिथुन राशी
आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचे अडकलेली महत्वाची काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला काही चांगले लोक भेटतील जे तुम्हाला मदत करण्यास नेहमीच तयार असतील. आज तुम्ही कौटुंबिक बाबी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

कर्क राशी
आज, तुम्ही बिझनेसमध्ये नव्या करारावर सही कराल, ज्यामुळे चांगले फायदे मिळू शकतात. अविवाहित लोकांना आज लग्नाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी सुसंवाद राखावा, नाहीतर वाद होऊ शकतो.

सिंह राशी
आज, तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्याचे नवीन मार्ग सापडतील. मित्रांसोबतचे संबंध सुधारू शकतात. भौतिक सुखसोयींकडे तुमचा कल वाढू शकतो. तब्येत आधीपेक्षा चांगली असेल.

कन्या राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जाणार आहे. या राशीत जन्मलेल्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांचा आजचा दिवस चांगला जाईल. शुभ मुहूर्त पाहून काम सुरू करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुम्ही अनेक कामे हुशारीने हाताळण्याचा प्रयत्न कराल.

तुळ राशी
आज तुमच्या तब्येतीत चढ-उतार येतील. ऑफिसमध्ये तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज व्यावसायिकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. आज संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता.

वृश्चिक राशी
आज नवीन कल्पना मनात येऊ शकतात. विद्यार्थ्यांचाही दिवस चांगला जाईल. जर तुम्ही कला क्षेत्रात असाल तर तुम्हाला प्रगतीचे अनेक नवीन मार्ग दिसतील. महिला आज खरेदीला जाऊ शकतात.

धनु राशी
आज, तुमचे काम मित्राच्या मदतीने पूर्ण होईल. घरातील कामे पूर्ण करण्यासाठी वृद्धांचा सल्ला उपयुक्त ठरेल. आज तुमचा बहुतेक वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत घालवाल आणि तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता.

मकर राशी
आज संध्याकाळी तुम्ही घरी पार्टीची योजना आखाल, मित्र-मैत्रिणी भेटल्याने दिवस छान जाईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असू शकते, परंतु पैशाच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

कुंभ राशी
जर तुम्ही इंटरव्ह्यूच्या रिझल्टची वाट पहात असाल तर यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. आज आर्थिक लाभ देखील शक्य आहे. या राशीत जन्मलेल्या संगीत दिग्दर्शकांना त्यांच्या विशेष कार्यासाठी सन्मानित केले जाऊ शकते.

मीन राशी
विद्यार्थ्यांचा दिवस चांगला जाईल, अभ्यासात मन लागेल. दुसऱ्याचा उत्साह पाहून आज तुम्हाला प्रेरणा मिळेल. साहित्य क्षेत्रातील लोकांना आज त्यांच्या क्षमतेबद्दल सन्मानित केले जाऊ शकते. नव्या नोकरीची संधि मिळेल, थोडा संयम ठेवा.

➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

मनसे अन् महाविकास आघाडीचा न भूतो न भविष्यति मोर्चा; नेमक्या 4 मोठ्या मागण्या कोणत्या ?मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचो...
01/11/2025

मनसे अन् महाविकास आघाडीचा न भूतो न भविष्यति मोर्चा; नेमक्या 4 मोठ्या मागण्या कोणत्या ?

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे , राज ठाकरे , आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत.

निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray Mumbai Local) मोर्चात सहभागी होण्यासाठी चर्चगेटला लोकलने प्रवास करत पोहोचले आहेत. सध्या ते वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबले आहेत.

विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय ?

मतदारयाद्या अद्ययावत करा.

मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.

मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.

सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.

कसा असेल मोर्चाचा मार्ग ?

दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.

ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.

राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे… मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.

राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार.

या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.

➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी वापरा ‘हा’ फेसपॅकमुलतानी माती त्वचेसाठी एक नैसर्गिक वरदान मानली जाते. ती आपल्या चेहऱ्यावरील ...
01/11/2025

तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी वापरा ‘हा’ फेसपॅक

मुलतानी माती त्वचेसाठी एक नैसर्गिक वरदान मानली जाते. ती आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, टॅनिंग आणि डाग कमी करण्यास मदत करतं. याशिवाय मुलतानी माती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि आपला चेहरा ताजेतवाने दिसून येतो. बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा मुलतानी माती सुरक्षित असते. ती त्वचेला कोणतेही दुष्परिणाम न करता सौंदर्य टिकवून ठेवते. ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे त्यांनी गुलाबपाण्यासोबत मुलतानी माती मिसळून एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हातांनी लावून 15 मिनिटांनी धुवा. यामुळे चेहरा स्वच्छ आणि फ्रेश दिसून येतो. तेलकट त्वचेसाठी हळद आणि मुलतानी मातीचा फेसपॅकही उपयुक्त आहे. दोन चमचे मुलतानी माती आणि चिमूटभर हळद पाण्यात मिसळा. हा फेसपॅक 15 मिनिटं ठेवून नंतर धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यवरील पिंपल्स आणि दाणे कमी होतील. कोरड्या त्वचेसाठी काकडीचा रस आणि मुलतानी माती मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर 10 मिनिटं ठेवून नंतर धुवा. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये थोडी कॉफी आणि एक चमचा मध मिसळून फेसपॅक तयार करा.
➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

लोकसभेला संविधान तसचं आताही…भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मनसे, मविआच्या मोर्चावर काय म्हणाले ?“भाजप म्हणून भूमिका...
01/11/2025

लोकसभेला संविधान तसचं आताही…भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मनसे, मविआच्या मोर्चावर काय म्हणाले ?

“भाजप म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं अत्यंत गरजेच आहे. म्हणून कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये लोकशाहीत हे सर्व अधिकार प्रत्येकाला असतात. त्यामुळे मविआ एकत्र येऊन मोर्चा काढतेय.हे मोर्चा का काढतायत? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्यात. प्रत्येक निवडणूक ज्यावेळी समोर येते, त्यावेळेला एक फेक नरेटिव्ह हा कसा तयार करावा, याचं नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सगळी मंडळी वेगवेगळे एनजीओ हे नेहमीच देत असतात” असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला.

“लोकसभा निवडणुकीच्यावेळेला सुद्धा देशाबाहेरील एनजीओ काही अशा शक्ती जे हा देश अखंड राहू नये या दृष्टीकोनातून सातत्याने एनजीओ म्हणून संपूर्ण देशामधील असणारी परिस्थिती. इथली असणारी सुरक्षितता. इथला कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येतील, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत होते” असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.

“लोकसभेच्यावेळेला सुद्धा संविधानासंदर्भात असाच फेक नरेटिव्ह तयार झाला, किंबहुना पसरवला. या अशा नरेटिव्हमुळे कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच मविआने केलय. याची अनेक उदहारण ही आपण सर्वांसामोर आहेत. हे सर्व लक्षात घेता कोण कोण एनजीओ यात काम करतात? त्या सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळतेय या ,सगळ्या गोष्टी जगजाहीर झाल्या आहेत” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

“मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महायुती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येईल, या भूमिकेत काम करतात. मध्यंतरीच्या काळात आस्मानी संकट हे शेतकऱ्यांवर आलं. पण हे सरकार मायबाप म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलं. हे आपण ,सर्वांनी पाहिलं. य़ा सर्व गोष्टींबरोबर जाती, धर्म या सर्वामध्ये तिढा निर्माण करण्याचं काम सुद्धा काही मंडळी करत होती” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

“समाजातील असणारी व्यवस्था चांगली राहिली पाहिजे. यासाठी सुद्धा महायुतीच्या सरकारने एका चांगल्या पद्धतीने मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल या दोघांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये काम केलं. आता आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे एका नवीन पद्धतीने एक नवीन नरेटिव्ह हा आपल्याला तयार करता येऊ शकतो का? याची ट्रायल मोर्चाच्या माध्यमातून मविआ करतेय” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

श्रेयस अय्यरबद्दल अखेर ती चांगली बातमी आली, बीसीसीआयकडून महत्वाची अपडेटभारतीय क्रिकेट टीमचा स्टार श्रेयस अय्यरवर दुखापती...
01/11/2025

श्रेयस अय्यरबद्दल अखेर ती चांगली बातमी आली, बीसीसीआयकडून महत्वाची अपडेट

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार श्रेयस अय्यरवर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये उपचार सुरु आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसऱ्या वनडे मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियाई विकेटकीपर एलेक्स कॅरीची कॅच पकडताना अय्यर पडला होता. या दुर्घटनेत त्याला स्पिलिनची इंजरी झालेली. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता श्रेयस अय्यर बद्दल एक आनंदाची बातमी आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बीसीसीआयने अय्यर बद्दल एक मोठी अपडेट शेअर केली आहे.

श्रेयस अय्यर 25 ऑक्टोंबरपासून रुग्णालयात दाखल होता. मॅच दरम्यानच त्याला गंभीर दुखापत झाल्याच लक्षात आलं. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. सुरुवातीला त्याला आयसीयूमध्ये ठेवलं होतं. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने सिडनी आणि भारतीय तज्ज्ञांसोबत मिळून श्रेयसवर उपचार केले. सध्या त्याची हालत स्थिर आहे. तो वेगाने रिकव्हर होतोय.

बीसीसीआयने अय्यरवर अपडेट शेअर करताना सांगितलं की, श्रेयस अय्यरला 25 ऑक्टोंबर 2025 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे मॅचमध्ये फिल्डिंग करताना पोटाला दुखापत झालेली. स्पिलिनमध्ये दुखापत झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला. दुखापत कुठे झालीय, ते समजल्यानंतर लगेच छोटसं ऑपरेशन करुन ब्लीडिंग तात्काळ थांबवण्यात आलं. योग्य उपचार झाले. त्याची प्रकृती आता स्थिर असून तो रिकव्हर होतोय. बीसीसीआयची मेडीकल टीम, सिडनी आणि भारतीय तज्ज्ञ त्याच्या प्रकृतीतील सुधारणेमुळे खुश आहेत. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डॉ. कौरौश हाघीगी आणि भारतातील डॉ. दिनशॉ पारडीवाला यांचे बीसीसीआयने आभार मानले आहेत. त्यांनी श्रेयसवर चांगले उपचार होतील याची काळजी घेतली. श्रेयस पुढच्या सल्ल्यासाठी सिडनीमध्येच थांबेल. अय्यर पुढचे काही दिवस ऑस्ट्रेलियामध्येच असेल. पूर्णपणे फिट झाल्यानंतरच तो भारतात येईल असं बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.

➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेला नको – बाळासाहेब थोरात“राहुल गांधी यांनी मतचोरी होत...
01/11/2025

विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेला नको – बाळासाहेब थोरात

“राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने थातूरमातूर उत्तर दिलं. आयोगाचं उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी केली नाही. खुलासा केला नाही. महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत” असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. आज मनसे आणि महाविकास आघाडीने मतचोरीच्या मुद्यावर भव्य मोर्चा काढला आहे.

“विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरू नका, असं आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं. आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना सांगितलं. आम्ही सर्वजण होतो. लोकशाही मानणारे सर्वच आले पाहिजे, असा आमचा आग्रह होता. आम्ही गेलो. उत्तर मिळालं नाही. अनेक उदाहरणं दिली” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“नगर पालिकेसाठी मतदार याद्या जाहीर केल्या. विधानसभेच्या मतदार यादीत घोळ आहे. बोगस लोकांची नोंद आहे. ते तसेच ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, अशी आपली मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला की काय असं वाटतं” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

स्मॉलकॅप्सचा जलवा: 30 दिवसांत ‘या’ 14 शेअर्सनी दिला 78% पर्यंत परतावा !बाजारात सध्या स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूक...
01/11/2025

स्मॉलकॅप्सचा जलवा: 30 दिवसांत ‘या’ 14 शेअर्सनी दिला 78% पर्यंत परतावा !

बाजारात सध्या स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत आहेत. ऑक्टोबर महिन्यात, सेन्सेक्सने 5% ची वाढ नोंदवली, त्यावेळी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सनेही 3.6% चा मजबूत परतावा दिला. या तेजीमध्ये, जवळपास 180 स्मॉलकॅप शेअर्सने दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह परतला आहे. या रॅलीतील 14 सर्वात जास्त चमकणाऱ्या कंपन्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे, ज्यांनी केवळ एका महिन्यात 30% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे, इतकी मोठी वाढ होऊनही, यातील बहुतांश शेअर्स अजूनही त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा सुमारे 10% कमी किमतीत व्यवहार करत आहेत.

ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वाढलेले स्मॉलकॅप स्टॉक्स

जेएम ब्रेवरीज
अल्कोहोल आणि बिअर उत्पादनत असलेली GM Breweries या महिन्यात सर्वाधिक चर्चेत राहिली. तिच्या किमतीत 78% चा विक्रमी वाढ झाली, आणि शेअर 702 रुपये वरून 1,249 रुपये पर्यंत पोहोचला. तिचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,317 रुपये आहे.

इन्फोबीन्स टेक्नॉलॉजी
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स कंपनी असलेली Infobeans Technologies 35% वाढली. 473 रुपये वरून 639 रुपये पर्यंत वाढलेल्या या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 728 रुपये आहे.

स्काय गोल्ड अँड डायमंड
सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तयार करणारी कंपनी Sky Gold and Diamonds 34% ने वधारली. शेअर 263 रुपये वरून 354 रुपये झाला आणि त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 489 रुपये आहे.

तत्व चिंतन फर्मा
विशेष रसायने (Specialty Chemicals) उत्पादित करणाऱ्या Tatva Chintan Pharma Chem मध्येही 34% ची वाढ झाली. शेअर 1,015 रुपये वरून 1,357 रुपये वर पोहोचला, तर 52 आठवड्यांचा उच्चांक 1,423 रुपये आहे.

आयनॉक्स ग्रीन एनर्जी
पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्स सेवा पुरवणारी Inox Green Energy Services 33% ने वाढली. हा शेअर 201 रुपये वरून 268 रुपये झाला आणि त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 272 रुपये आहे.

एमटीएआर टेक
एरोस्पेस, संरक्षण आणि अणुऊर्जा क्षेत्रांसाठी उच्च-परिशुद्धता अभियांत्रिकी उत्पादने बनवणाऱ्या MTAR Technologies ने 33% ची रॅली नोंदवली. शेअर 1,851 रुपये वरून 2,466 रुपये झाला, तर उच्चांक 2,474 रुपये आहे.

इंद्रप्रस्त मेडिकल
दिल्ली-NCR मधील एक मोठी हॉस्पिटल साखळी चालवणाऱ्या Indraprastha Medical Corporation मध्येही 33% ची वाढ दिसून आली. शेअर 445 रुपये वरून 591 रुपये झाला, आणि त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 626 रुपये आहे.

असोशिएट अल्कोहोल
विविध प्रकारच्या अल्कोहोलयुक्त पेयांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या Associated Alcohols & Breweries ने 32% ची वाढ नोंदवली. शेअर 928 रुपये वरून 1,226 रुपये झाला, तर 52 आठवड्यांचा उच्चांक 1,496 रुपये आहे.

ओरिएंट टेक्नॉलॉजी
क्लाउड सेवा आणि सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्स देणारी IT कंपनी Orient Technologies 31% ने वधारली. शेअर 354 रुपये वरून 464 रुपये पर्यंत पोहोचला, तर 52 आठवड्यांचा उच्चांक 674 रुपये आहे.

केर्नेक्स मायक्रॉसिस्टीम
रेल्वे सुरक्षा आणि सिग्नलिंग सिस्टीमसाठी उत्पादने बनवणाऱ्या Kernex Microsystems (India) मध्येही 31% ची वाढ झाली. शेअर 1,020 रुपये वरून 1,335 रुपये झाला आणि 52 आठवड्यांचा उच्चांक 1,584 रुपये आहे.

लॅन्सर कंटेनर लाईन्स
कंटेनर फ्रेट स्टेशन आणि लॉजिस्टिक सेवा पुरवणारी Lancer Container Lines 74% वाढली. 12 रुपये वरून 20 रुपये पर्यंतचा तिचा प्रवास राहिला, तर तिचा 52 आठवड्यांचा उच्चांक 41 रुपये आहे.

शेअर इंडिया
एक प्रमुख स्टॉक ब्रोकिंग आणि आर्थिक सेवा कंपनी असलेल्या Share India Securities मध्ये 56% ची वाढ झाली आणि शेअर 128 रुपये वरून 200 रुपये झाला. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 325 रुपये आहे.

इंडो थाय सिक्युरिटीज
भांडवली बाजारात ब्रोकरेज आणि सल्लागार सेवा देणाऱ्या Indo Thai Securities ने ऑक्टोबरमध्ये 41% ची वाढ नोंदवली. शेअर 281 रुपये वरून 395 रुपये झाला आणि त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 470 रुपये आहे.

माफतलाल इंडस्ट्रीज
टेक्सटाईल क्षेत्रातील जुनी आणि मोठी कंपनी असलेल्या Mafatlal Industries नेही 41% ची तेजी अनुभवली. शेअर 136 रुपये वरून 190 रुपये पर्यंत वाढला, तर उच्चांक 210 रुपये आहे.
➖➖➖➖➖➖➖
📱 City Varta मध्ये जाहिरातीसाठी संपर्क
👉9021247247
➖➖➖➖➖➖➖
📣 मोफत बातम्या मिळवण्यासाठी सिटी वार्ताला आजच जॉईन करा !
👉 https://cityvarta.com/join/
📣किंवा आताच 9828051247 या नंबरला Missed Call द्या व जॉईन व्हा.!
➖➖➖➖➖➖➖
📍Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3, Ichalkaranji, 416115

Address

Sangli Naka, Babaso Villa Apartment, Shop No. 3
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when City Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share