Shriram Krushi Seva Kendra

Shriram Krushi Seva  Kendra Good

बलिप्रतिपदा!अर्थात दिवाळी पाडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक..बलिप्रतिपदेच्या त...
14/11/2023

बलिप्रतिपदा!अर्थात दिवाळी पाडवा,
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक..बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा..
🪔 शुभ दीपावली 🪔

हरभरा बियाणे शासकीय अनुदानावर वाटप चालू आहे अधिक माहितीसाठी संपर्क करामो.9049049045
01/11/2023

हरभरा बियाणे शासकीय अनुदानावर वाटप चालू आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा
मो.9049049045

🎁  #शुभ_दीपावली ही दिवाळी आपणा सर्वांना आनंद, सुखसमृद्धि व वैभवप्राप्तीची जावो,हीच शुभेच्छा व मनोकामना...सर्वांना दिपावल...
23/10/2022

🎁 #शुभ_दीपावली
ही दिवाळी आपणा सर्वांना आनंद, सुखसमृद्धि व वैभवप्राप्तीची जावो,हीच शुभेच्छा व मनोकामना...
सर्वांना दिपावलीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा !💐

मालदांडी ज्वारी शासकीय अनुदानावर उपलब्ध आहेअधिक माहितीसाठी संपर्क साधामो 9049049045
08/09/2022

मालदांडी ज्वारी शासकीय अनुदानावर उपलब्ध आहे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
मो 9049049045

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी ज्वारी बियाणे वर शासकीय  अनुदान उपलब्ध त्याचा अवश्य लाभ घ्यावा.श्रीराम कृषी ...
04/09/2021

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी ज्वारी बियाणे वर शासकीय अनुदान उपलब्ध त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

श्रीराम कृषी सेवा केंद्र , भवानीनगर
मो. 9049049045
स्टॉक लिमिटेड आहे.
आज संपर्क करा

महाबीज कंपनीची 8203 बाजरी फक्त 117 रुपयात मिळेल.श्रीराम कृषी सेवा केंद्र, भवानीनगरमो- 9049049045
10/06/2021

महाबीज कंपनीची 8203 बाजरी फक्त 117 रुपयात मिळेल.
श्रीराम कृषी सेवा केंद्र, भवानीनगर
मो- 9049049045

आमच्याकडे बॅटरी पंप व  त्याचे सर्व स्पेअर पार्ट मिळतीलमो-9049049045
06/10/2020

आमच्याकडे बॅटरी पंप व त्याचे सर्व स्पेअर पार्ट मिळतील
मो-9049049045

22/07/2020

AGRICULTURE SPRAYING PUMP
AVAILABLE HERE
CONTACT NO-9049049045 / 7058155555 /8622878787

Good

वेस्ट तन नाशक भेटेल 9049049045
07/01/2020

वेस्ट तन नाशक भेटेल
9049049045

27/03/2019

पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणा-या अन्नद्रव्यांना सुक्ष्म अन्नद्रव्ये म्हणुन ओळखले जाते. या ठीकाणी या अन्नद्रव्य कमतरता ओळखण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात छायाचित्रे देत आहोत.

झिंक
फेरस (लोह)
बोरॉन
मँगनीज
कॉपर
मॉलेब्डेनियम
*मँगनीज*
मँगनीज चे पिकातील कार्य –
प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर शर्करेमध्ये होण्यात कार्य करते.
हरीत लवक निर्मितीत आणि नायट्रेट असिमिलेशन (वापर) मध्ये कार्य करते.
मँगनीज स्निग्ध पदार्थ (फॅटस्) तयार करण्याच्या प्रक्रियेत गरजेच्या एन्झाईम्स च्या अक्टिवेहशनसाठी गरजेचे आहे.
राबोफ्लॅविन, अस्कोर्बीक असिड, आणि कॅरोटीन तयार करण्यात गरजेचे आहे.
प्रकाश संश्लेषण क्रियेत ईलेक्ट्रॉन ची देवाण घेवाण करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात गरजेचे आहे.
मँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे घटक –
जमिनीचा सामु – मातीचा जास्त सामु (पीएच) मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते.
सेंद्रिय पदार्थ – जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते.
मँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह) मँगनीजची उपलब्धता कमी करते.
मँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते.
नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.
मँगनीज चे विविध स्रोत –

प्रकार मँगनीजचे प्रमाण
मँगनीज सल्फेट 23-28%
मँगनीज ऑक्साईड 41-68%
चिलेटेड मँगनीज
: *मॉलिब्डेनियम*
मॉल्बडेनियम चे पिकातील कार्य –
मॉल्बडेनियम पिकामध्ये नायट्रेटसचे रुपांतर अमिनो असिड मध्ये होण्यात कार्य करते.
सहजीवी नत्र स्थिरीकरणामध्ये गरजचे आहे.
मॉल्बडेनियम च्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
जामिनीचा सामु – मॉल्बडेनियम हे एकमेव सुक्ष्मअन्नद्रव्य आहे जे की, जास्त सामु असलेल्या मातीत सहज उपलब्ध होते.
जास्त प्रमाणात पाणी वाहुन जाणा-या जमिनीत मॉल्बडेनियम ची कमतरता जाणवते.
मॉल्बडेनियम चे विविध स्रोत –

प्रकार मॉल्बडेनियम चे प्रमाण
सोडीयम मॉलिब्डेट 39%
मॉल्बडेनियम ट्राऑक्साईड 66%
अमोनियम मॉलिब्डेट
*फेरस (लोह)*
फेरस (लोह) चे पिकातील कार्य –
हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात गरजेचे
पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी गरजेचे
काही एन्झाईम्स व प्रोटीन्सचा घटक आहे.
पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत गरजेचे आहे.
सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत गरजे आहे.
फेरस (लोह) उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
जमिनीचा सामु – जास्त सामु असलेल्या जमिनीतील कार्बोनेटस् मुळे देखिल फेरसची उपलब्धता कमी होते.
फेरस स्फुरद संबंध – जास्त प्रमाणातील स्फुरदमुळे फेरसची उपलब्धता कमी होते.
नायट्रेट नत्राच्या वापारामुळे पिकातील धन-ऋण भार (अनायन-कॅटायन) असंतुलन निर्माण होवुन फेरसची उपलब्धता कमी होते.
फेरस मँगनीज संबंध – दोन्ही मुलद्रव्य विरोधात असल्याने एकाची जास्त उपलब्धता दुस-याची उपलब्धता कमी करते.
फेरस मॉल्बडेनियम – जास्त प्रमाणातील मॉल्बडेनियम मुळे पिकाच्या मुळांवर आयर्न मॉल्बडेट चा थर तयार होतो.
फेरसचे विविध स्रोत

प्रकार फेरसचे प्रमाण
फेरस सल्फेट 20%
फेरस अमोनियम सल्फेट 14%
आयर्न डीटीपीए चिलेट 10%
आयर्न एचईडीटीए चिलेट 5-12%
*बोरॉन*
बोरॉन पिकास शर्करा आणि स्टार्च यांत संतुलन साधते.
पिकातील शर्केरेच्या आणि कर्बोदकांच्या वहनात गरजेचे आहे.
परगीभवन आणि बीज (सीड प्रोडक्शन) निर्मितीत गरजेचे आहे.
नियमित पेशी विभाजन, नत्राच्या चयापचयात आणि प्रथिनांच्या चयापचयात गरजेचे आहे.
नियमित पेशी भित्तिका तयार होण्यात गरजेचे आहे.
पिकांतर्गत जल व्यवस्थापनात गरजेचे आहे.
बोरॉनच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –
सामु – जास्त सामु बोरॉन ची कमतरता निर्माण करते.
जास्त प्रमाणात जमिनीत पाणी झाल्यास बोरॉन वाहुन जाते व बोरॉन ची कमतरता जाणवते.
बोरॉनचे विविध स्रोत –
प्रकार बोरॉन चे प्रमाण
बोरॅक्स 11%
बोरीक असिड 17%
सोडीयम टेट्राबोरेट 10-20%
सोल्युबोर
*कॉपर*
कॉपरचे पिकातील कार्य –
कॉपर पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि श्वसनाच्या क्रियेत उत्तेजक म्हणुन कार्य करते.
अमिनो असिडचे रुपांतर प्रोटीन्स (प्रथिने) मध्ये करणा-या काही एन्झाईम्स चा घटक आहे.
कॉपर कर्बोदके (कार्बोहायड्रेटस) आणि प्रथिनांच्या पचनात गरजेचे आहे.
पिकाच्या पेशीला ताकद आणि सुरक्षा प्रदान करणा-या लिग्निनच्या निर्मितीसाठी कॉपर अत्यंत गरजेचे आहे.
कॉपर फळांच्या टीकाऊ क्षमतेवर, चव आणि शर्करेच्या प्रमाणावर देखिल नियंत्रण करते.
पिकावर कॉपर युक्त बुरशीनाशकांची सतत फवारणी होत असते त्यामुले देखिल कॉपर ची गरज भागुन निघते. याशिवाय विविध स्त्रोत खाली देत आहोत.
प्रकार कॉपरचे प्रमाण
कॉपर सल्फेट मोनो हायड्रेट 35%
कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट 25%
क्युप्रिक ऑक्साईड 75%
कॉपर क्लोराईड 17%
: खत व्यवस्थापन

द्राक्षाला खते देण्याची योग्य वेळ :

स्फुरद खरड छाटणीन
ंतर फळधारणेच्या वेळेस द्यावे. नत्राची गरज असेल तर गरजे एवढीच नत्राची मात्रा द्यावी.

पोटॅशियमचा वापर काडी पक्क होतानाच करावा. सुक्ष्म अन्नद्रव्ये यांची नव्या पानांवरती फवारणी करावी.

मायक्रो न्यूट्रिएंट्स जमिनीतुन देणे फायदेशिर ठरते. कारण ती एक ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी उपल्बध होत नाही. द्राक्षाला अंदाजे दिलेल्या खताचा उपयोग होत नाही.

मुलद्रव्यांची कार्यक्षमता

नत्र

नत्रयुक्त खते गरजेनुसार वापरुन कार्यक्षमता वाढवावी. अतिरिक्त नत्र वाया जाते.

जेणेकरून त्याची कार्यक्षमता वाढेल. आम्लयुक्त नत्र खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट ऑक्टोबर छाटणीनंतर द्यावेत. तण आणि पाणी व्यवस्थापन बरेच प्रमाणात खताची बचत करते. नत्रयुक्त खत दिल्यानंतर पाणी देवु नये किंवा पाणी दिल्यानंतर ख़त देवु नये. नत्राची पानांवरती फवारणी १- २ ग्रॅम युरिया प्रति लिटर या प्रमाणात ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस करावी. नत्र द्राक्षाला सेंद्रिय खातांद्वारेच द्यावे. कारण सेंद्रिय नत्रयुक्त खतातील नत्र द्राक्षाला हळूहळू प्रमाणात उपलब्ध होते.

स्फुरद

द्राक्षपिकास स्फुरादाचे कार्य घड निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हरीतद्रव्यांची निर्मिती, न्युक्लिक आम्लांचे संश्लेषण यासाठी स्फुरदाची गरज असते. स्फुरदयुक्त खते मातीमध्ये मिसळू नयेत. मातीमध्ये स्फुरद सेंद्रिय खताबरोबर जेथे द्राक्षवेलीची कार्यक्षम मुले असतील तेथे टाकावे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते व ते द्राक्षवेलीला योग्य प्रमाणात उपलब्ध होते. स्फुरदयुक्त खते जसे की डी. ए. पी १०० - २०० ग्रॅम प्रति १०० लिटर व फोस्फोरीक आम्ल ७० मिली/ १०० लि. या प्रमाणात पानांवरती फवारणी करावी. फोस्फोरीक आम्ल फर्टीगेशनद्वारे २ लिटर प्रति एकर या प्रमाणात आठवड्यातून दोन वेळा द्यावे.

पालाश

कांड्यांच्या पक्वतेसाठी व साखरेच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी पालाश आवश्यक असते. ज्या जमिनीची कॅटआयन विनिमय क्षमता जास्त असते, त्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी देऊन पाण्याचा निचरा करावा. पालाश मातीमध्ये मिसळून किंवा फर्टीगेशनद्वारे देता येते. तसेच पालाशची पानांवरती फवारणी करून पालाशची कमतरता दूर करता येते. पालाशचा वापर करताना सल्फेट ऑफ पोटॅश

वापरावे. क्लोराईड असणारी मिश्र खते वापरू नये.

कॅल्शियम

कॅल्शियम या अन्नद्रव्याचा वपर फुलोऱ्याचे वेळी पानांवरती फवारणी करून किंवा डिपींगद्वारे द्यावित. कॅल्शियम हे मुलद्र्व्य द्राक्षवेलीत वहनीय नाही. द्राक्षवेळीमध्ये जी (व्हाईट रूटस) पांढरी मुळे असतात तीच फक्त केल्शियम शोषून घेऊ शकतात. मर्यादित पाणी, मर्यादित तापमान नसेल तर पांढरी मुळे कार्यक्षम राहत नाहीत. त्यामुळे जेव्हा जी. ए.ची फवारणी किंवा डिपींग करतो. त्यानंतर लगेच कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम क्लोराईडची पानांवरती फवारणी करावी. त्यामुळे घडकुज रोखता येते. अविद्राव्य स्थितीतील कैल्शियम द्राक्षास उपयोगी होत नाही. परंतु हे फक्त ऑक्टोबर छाटणीनंतरच करावे.

बोरॉन

हलक्या जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता दिसून येते. बोरॉन कमतरतेमुळे द्राक्षमणी लहान होतात. द्रक्षामण्यांची गोडी कमी होते. देठ तपासणी करून बोरॉनची कमतरता असेल तरच बोरॉनचा वापर करावा. बोरॉनचे जमिनीमध्ये स्थिरीकरण होत नाही त्यामुळे बोरॉनचा जास्त वापर टाळावा. बोरॉन गरम पाण्यामध्ये मिसळून पानांवरती फवारणी करावी.

मॉलीब्डेनम

हलक्या जमिनीमध्ये मॉलीब्डेनमची कमतरता दिसून येते. देठ परीक्षणाच्या आधारे मॉलीब्डेनमची कमतरता असेल तरच त्याचा वापर करावा.

क्लोराईड

क्लोराईड हे इतर अन्नद्रव्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचे आहे. क्लोराईडचे विपरीत परिणाम पानांवरती दिसून येतात. त्यामुळे हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी क्लोराईडयुक्त खते वापरू नयेत.
नायट्रोजन 🍇🍁🍇
जमीनीत जर नायट्रोजन जास्त झाल्यास बोरॉन , कॉपर , पोटॅश
हे घटक उचलले जात नाही..
आणि
जमीनीत नायट्रोजन वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते.
🍇🍁🍇

🍇🍁🍇 फॉस्फरस 🍇🍁🍇
जमीनीत फॉस्फरस वाढल्यास कॉपर , कॅल्शियम , पोटॅश , फेरस , झिंक हे घटक उचलले जात नाही.
आणि
जमीनीत फॉस्फरस वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते. 🍇🍁🍇

🍇🍁🍇 पोटॅश 🍇🍁🍇
जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "बोरॉन , मॅग्नेशियम" हे घटक उचलले जात नाही.
आणि
जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "मॅंगनीज , फेरस" उचललेली जाते.🍇🍁🍇

🍇🍁🍇 कॅल्शियम 🍇🍁🍇
कॅल्शियम जमीनीत जास्त झाल्यास फॉस्फरस,पोटॅश,मॅग्नेशियम,मॅंगनीज,झिंक,फेरस,बोरॉन,नायट्रोजन हे घटक उचलले जात नाही. चुनखडीयुक्त जमीनीत किंवा मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असलेल्या जमीनीत अशी स्थिती येउ शकते.🍇🍁🍇

🍇🍁🍇 मॉलिब्डेनम 🍇🍁🍇
मॉलिब्डेनम वाढल्यास कोणतेच घटक कमी होत नाही
पण मॉलिब्डेनम वाढल्यास कॉपर व नायट्रोजन वेली कडून जास्त प्रमाणात उचलल्या जातात 🍇🍁🍇

🍇🍁🍇 कॉपर 🍇🍁🍇
कॉपर वाढल्यास फेरस व मॅंगनीज जमिनीत असूनही वेलीला घेता येत नाही
आणि कॉपर वाढल्यास कोणतेच घटक वाढत

13/11/2018

Address

Baramati-indapur Rode, Bhavaningar
Indapur
413104

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 9am - 7pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 5pm
Sunday 9am - 1pm

Telephone

+919049049045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriram Krushi Seva Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shriram Krushi Seva Kendra:

Shortcuts

Share