Batmidar

Batmidar Batmidar covers Marathi news from India and Maharashtra.

Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos and photos.

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असतानाच…मुंबईच्या टाटा हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलल...
09/05/2025

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असतानाच…
मुंबईच्या टाटा हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक रुग्णालयात दाखल झाले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाकडून अधिकृत तपास सुरू आहे.


चंदीगडमध्ये पाकिस्तानकडून संभाव्य हवाई हल्ल्याचा इशारा; वायुदल स्टेशनवर सायरनचा गजर!परिसरात भीतीचं वातावरण, सुरक्षेत वाढ...
09/05/2025

चंदीगडमध्ये पाकिस्तानकडून संभाव्य हवाई हल्ल्याचा इशारा; वायुदल स्टेशनवर सायरनचा गजर!
परिसरात भीतीचं वातावरण, सुरक्षेत वाढ. प्रशासनाचं नागरिकांना आवाहन – “शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका!”

,

देश सज्ज! जम्मूतील अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद; सीमेवर लष्कर सतर्क – हवाई संरक्षण युनिट्स तैनातदेशाच्या सुरक्षेसाठी महत्...
08/05/2025

देश सज्ज! जम्मूतील अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद; सीमेवर लष्कर सतर्क – हवाई संरक्षण युनिट्स तैनात
देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू, लष्कर आणि हवाई दल युद्धसज्ज स्थितीत!

, , , , , , , , ,

गंगोत्रीकडे जाणारे हेलिपॅडवरचे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले; पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यूउत्तराखंडच्या उत्तर...
08/05/2025

गंगोत्रीकडे जाणारे हेलिपॅडवरचे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले; पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना.

, , , , , , , #भाविकांचेदु:खदनिधन,

जय हिंद!भारतीय सैन्याच्या “ऑपरेशन सीनधार” अंतर्गत पहलगाम हल्ल्यानंतर जोरदार कारवाई सुरू असून, संभाव्य दहशतवादी ठिकाणांवर...
07/05/2025

जय हिंद!

भारतीय सैन्याच्या “ऑपरेशन सीनधार” अंतर्गत पहलगाम हल्ल्यानंतर जोरदार कारवाई सुरू असून, संभाव्य दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईकसह सर्च ऑपरेशन्सही सुरू आहेत. राफेल, मिराज आणि ड्रोनच्या सहाय्याने भारताने शक्तिप्रदर्शन करत मजबूत पावलं उचलली आहेत. जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील भागात भारतीय लष्कर पूर्ण सज्ज अवस्थेत तैनात आहे.







िंद

राज्यात नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसीला मंत्रिमंडळाची मंजुरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल...
29/04/2025

राज्यात नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसीला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणाला मंजुरी दिली आहे. या नव्या धोरणाअंतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना विशिष्ट रस्त्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच ई-वाहन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी गंभीर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देशपुणे शहरासह उपनगरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी ही गंभीर ...
29/04/2025

पुण्यातील वाहतूक कोंडी गंभीर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे शहरासह उपनगरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली असून, ती सोडवण्यासाठी प्राधान्याने पावले उचलावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना दिले.

पुणे रिंग रोड, मेट्रो, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचा कामाचा वेग वाढवावा, तसेच योग्य समन्वय व ताळमेळ राखत पुणेकरांना कोंडीतून मुक्त करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रेमविवाहाचा राग; पित्यानेच कन्येला ठार केले, जावई जखमीप्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आल्याने एका ...
28/04/2025

प्रेमविवाहाचा राग; पित्यानेच कन्येला ठार केले, जावई जखमी

प्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आल्याने एका पित्याने आपल्या मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. या गोळीबारात दोन गोळ्या जावयालाही लागल्या असून, तो थोडक्यात बचावला आहे.

जखमी जावयावर पुण्यात, तर पित्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या धक्कादायक प्रकारानंतर बाप आणि मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

भारत-पाक सीमा: बीएसएफचा शेतकऱ्यांना आदेश, दोन दिवसांत पीक काढणी करा!पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमाव...
28/04/2025

भारत-पाक सीमा: बीएसएफचा शेतकऱ्यांना आदेश, दोन दिवसांत पीक काढणी करा!

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागात तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) शेतकऱ्यांना २ दिवसांत पीक काढणी करून शेत रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेषतः पंजाब राज्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर ५३० किमी अंतर आहे आणि या भागात ४५,००० एकरांवर शेती केली जाते.
अमृतसर, तरणतारण, फिरोजपूर आणि फाल्जिका जिल्ह्यांमध्ये बीएसएफकडून विशेष घोषणाद्वारे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सीमेवर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

28/04/2025
बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल न केल्याने उच्च न्यायालयाचा संता...
26/04/2025

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल न केल्याने उच्च न्यायालयाचा संताप!

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“समाजात चुकीचा संदेश गेला आहे, हे धक्कादायक आहे,” असे मत न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.

न्यायालयाने स्पष्ट केले की, “राज्य सरकारने कोर्टाच्या आदेशाचे पालन न करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला आहे.”

यापूर्वी कोर्टाने ७ एप्रिल रोजी सह पोलिस आयुक्त लखामी गौतम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा आदेश दिला होता आणि दोन दिवसांत सर्व कागदपत्रे तपासासाठी सोपवण्याचे निर्देशही दिले होते.

छत्तीसगडमध्ये लग्नाचं जेवण ठरलं जिवावर – ५१ जणांना अन्नातून विषबाधा, ३७ मुलांचा समावेश!छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील एक...
26/04/2025

छत्तीसगडमध्ये लग्नाचं जेवण ठरलं जिवावर – ५१ जणांना अन्नातून विषबाधा, ३७ मुलांचा समावेश!

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील एका लग्नसमारंभात मोठी दुर्घटना घडली आहे. लग्नातील जेवण घेतल्यानंतर तब्बल ५१ जणांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यात ३७ लहान मुलांचाही समावेश आहे.
सर्व रुग्णांना तातडीने कोरबा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हा प्रकार घडल्यामुळे स्थानिकांत खळबळ उडाली असून, अन्नाची तपासणी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.

Address

E Wing 12-13 3rd Floor, Golani Market Jalgaon
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Batmidar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Batmidar:

Share