Loknayak News

Loknayak News ‘Loknayak News’ is our official journalistic media outlet of Loknayak News and Advertising Agency.
(2)

Here u see Latest news, Todays breaking news, marathi news, news in Maharashtra, Maharashtra politics, Maharashtra state, Maharashtra government, Todays topics, crime news, accident news, politics news and etc news in Maharashtra.

19/09/2025

Dhule | भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा ⁨⁩ ​

गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात पाच कंदील भागात मनपा ने घेतलेल्या नो हॉकर्स झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाले आहे... प्रशासनाने गांधी पुतळा ते पाच कंदील परिसरात केलेला नो हॉकर्स झोन विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.. तर दुसरीकडे भाजपाचा एक गट या निर्णयाचे स्वागत करीत आहे आता यावरून चांगलेच रणकंदन पेटले आहे....
Shubhangi Patil - शुभांगी पाटील
आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालया नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती... यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामण गवळी हे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत होते... यावरून शुभांगी पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे यावेळी चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी उपजिल्हाधिकारी, खासदार व पोलीस उपाधीक्षक यांच्या समोरच शुभांगी पाटील यांच्या पतीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.... या प्रकारामुळे धुळ्यातील नो हॉकर्स झोन वरून अधिकच राजकारण तापताना पाहायला मिळत आहे.

BYTE - शुभांगी पाटील, शिवसेना उपनेत्या

19/09/2025

Jalgaon Raver Waghod News पती पत्नी शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थांचे अश्रू अनावर ! ​
वाघोड येथील जिल्हा परीषद शाळेतील पती पत्नी शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थांचे अश्रू अनावर
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या घट्ट नात्याची सर्वत्र चर्चा
रावेर तालुक्यातील वाघोड जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षिका सिंधू राठोड व त्यांचे पती विजय पवार यांची जवळच्या केऱ्हाळे बुद्रुक येथे बदली झाली. आपल्या प्रिय शिक्षिकांची बदली झाल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांनी सिंधू राठोड यांना गराडा घालत रडायला सुरवात केली. "मॅडम तुम्ही जाऊ नका" अशी विनवणी करत विद्यार्थी रडू लागले. त्याच्यां डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. हे पाहून शिक्षिका सिंधू राठोड यांनाही अश्रू अनावर झाले.
तर आज दिवसभर या प्रसंगाचीच चर्चा ऐकायला मिळाली. या पती पत्नी शिक्षकांनी विद्यार्थ्याना शिकवण्यातुन इतक आपलेसे केले होते की, त्यांची बदली झाल्यावर विद्यार्थी धाय मोकलून रडू लागले. या प्रसंगावरून शिक्षिका सिंधू राठोड व पती विजय पवार यांचे कार्य इतरांसाठी आदर्शवत ठरले आहे.

लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जळगांव

19/09/2025

🛑LIVE | बीडच्या केज शहरात ओबीसींचा महाएल्गार मोर्चा🛑

18/09/2025

Parbhani News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मॅरेथॉन स्पर्धा व महाआरोग्य शिबिराचे
⁨⁩ ​ ​
स्पर्धेत सहभागी होण्याचे व आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचे आवाहन

परभणी जिल्हा अँथेलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने देशाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा 2025 तथा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा 21 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून ही मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरुवात होऊन या स्पर्धेचा समारोप संत तुकाराम महाविद्यालय मैदान येथे होणार आहे. तरी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी व महाआरोग्य शिबिरासाठी परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी युवा पिढीने सहभागी व्हावे, असे आव्हान भाजप महानगर परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केले

लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी

18/09/2025

Nashik Krushi News | नवतरुण शेतकरी झेंडू फुल शेतीकडे वळले #नाशिक #कांदा
NASHIK | नाशिक जिल्ह्यातील नवतरुण शेतकरी झेंडू फुल शेतीकडे वळले
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या कांदा पिकाला शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च परवडत नाही. त्यामुळे नवतरुण वर्ग शेतकरी सध्या फुल शेतीकडे वळालेला दिसत आहे.
गणेश उत्सवानंतर लगेच येणाऱ्या नवरात्रासाठी झेंडूची मागणी मुंबई, अहमदाबाद, सुरत, बडोदा अशा ठिकाणी जास्त असल्याने चांदवड तालुक्यात फुल शेती आग्रसर झाली आहे.

- उत्तम नाना जाधव भरवीर
- मधुकर जाधव भरवीर (शेतकरी)
- महेंद्र शिंदे (नवतरुण फुल शेतकरी)

18/09/2025

पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारीस अडचण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांना ध्वजारोहणासाठी होणार होता उशीर

अखेर ग्रामस्थ आले धावून

18/09/2025

नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने काळी पिवळी जिपला दिली धडक

पाच ते सहा मोटरसायकलला चिरडल्या

अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती

तिघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले

18/09/2025

JALGAON | शेतकरी जन आक्रोश मोर्चा | बच्चू कडू आक्रमक
#जळगांव
JALGAON | जळगाव मध्ये शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे निवेदन घेण्यात जिल्हाधिकारी बाहेर न आल्याने बच्चू कडू आक्रमक
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी अडवले मात्र बच्चू कडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडून केला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश
- बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण
- बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षाचे नेते पदाधिकारी यांच्या सर्व शेतकऱ्यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात प्रवेश
- जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी का येऊ शकत नाही बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब

18/09/2025

Dondaicha News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचात मोतिबिंदू शिबिर ⁨⁩
भारतीय जनता पक्ष दोंडाईचा व रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरा आय हॉस्पिटल, आंनद व प्रविण आय क्लिनिक दोंडाईचा यांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक १७ सप्टेंबर बुधवार रोजी प्रविण आय क्लिनिक रोटरी मार्ग येथे संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील यांनी केले याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, माजी आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, जितु गिरासे नरेंद्र गिरासे, अनिल सिसोदिया, महेंद्र गिरासे, संजोग रामोळे, सोशल मिडियाचे प्रमुख अशोक गिरासे, रोटरी सिनियर्सचे कार्यकारी सचिव रविंद्र पाटील, सचिव डॉ अनिल धनगर, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश अहिरराव, सुनिल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिबिरात एकुण ७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली यातील ४१ रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. सर्व रुग्णांची सर्वोतोपरी व्यवस्था मोफत करण्यात आली.

लोकनायक न्यूजसाठी संजय कोळी दोंडाईचा

18/09/2025

Nashik Nandgaon News | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा जन्म दिवस साजरा ​

#मराठीबातम्या
आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “स्वच्छता पंधरवडा” संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय व खाजगी आय. टी. आय.संस्थांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव निवडून तेथे स्वच्छता अभियान राबवावे याबाबतचे शासनाकडून परिपत्रक विभागास प्राप्त झाले होते.
त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानाची सुरुवात पोखरी गावचे सरपंच ॶॅड.किरण गायकवाड, उपसरपंच सौ.देवरे, ग्रामविकास अधिकारी सतिष शिंदे तसेच संस्थेचे गटनिदेशक निकुंभ सर व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण आदी उपक्रम यानिमित्त राबविण्यात आले. तसेच पोखरी गावचे सरपंच गायकवाड यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप देखील करण्यात आले.
या स्वच्छता अभियानात संस्थेचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावचे सेवानिवृत्त मेजर राजेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. याबाबत त्यांचे संस्थेचे गटनिदेशक व सरपंच यांनी विशेष आभार मानले.

लोकनायक न्यूजसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव नाशिक

18/09/2025

Parbhani Crime News | बनावट सोने विकणारे तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ​ ​ #परभणी #गंगाखेड
दैठणा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान एका गुप्त माहितीच्या आधारावर रामनगर तांडा मौजे महातपुरी या ठिकाणावरून तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा परभणी पथकाने ताब्यात घेतले. दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी
मध्य प्रदेश येथील एक इसमांकडून परभणी तालुक्यातील पोखर्णी फाट्यावर बोलावून चार लाख रुपये बनावट सोने घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे यातील आरोपी हे रामनगर तांडा महातपुरी या गावची असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे दिनांक 16 सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.पी भारती, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुग्रीव केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल परसोडे, भुजबळ, जयश्री आव्हाड, निलपत्रेवार, गायकवाड, सावंत, चालक हनवते हे सर्व एका गुन्ह्याच्या कामानिमित्त गंगाखेड या ठिकाणी आले असता मागील सात- आठ दिवसापूर्वी मंगला बाळू भोसले व तिचा मुलगा भाण्या भोसले दोन्ही राहणार रामनगर तांडा महातपुरी यांनी मध्य प्रदेश मधील इसमास सोने देतो म्हणून मौजे पोखर्णी फाटा या ठिकाणी बोलवून घेतले. त्याच्याकडून नगदी चार लाख पन्नास हजार रुपये घेतले आणि त्याला बनावट सोने दिले असल्याची खात्री लायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना कळाली असता त्यांनी सदरील आरोपीला पकडून मंगला भोसले या महिलेची विचारपूस केली असता तिने मध्य प्रदेशच्या इसमांकडून चार लाख रुपये घेऊन त्याला बनावट सोने दिल्याचे कबुल केले. “ मी हा सर्व प्रकार माझे पती बाळू उर्फ गिरम्या भोसले, भानु उर्फ भाण्या बाळू भोसले यांच्या सांगण्यावरून केल्याचे तीने सांगितले.
बनावट सोन दिल्याची उकल झाल्याने वरील तिन्हीही आरोपींना परभणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून दैठणा पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी स्वाधीन करण्यात आले आहे.

लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी

18/09/2025

Jalgaon Raver Waghod News रावेर तालुक्यातील वाघोड गावाची ग्रामसभा संपन्न ⁨⁩
#वाघोड #रावेर
विकसित ग्राम करण्यासाठी विविध विकास कामांची अंमलबजावणी
महाराष्ट्र शासनाकडून राज्य भर ग्रामविकास विकास पंचायत राज विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या‌ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत अभियानाचा कालावधी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर प्रर्यन्त महाराष्ट्र भर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची सुरुवात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजे आज पासून सुरू झाली असून या अंतर्गत राज्यभर प्रत्येक ग्रामपंचायतीने विकसित ग्राम करण्यासाठी विविध विकास कामांची अंमलबजावणी केली जाणार आहे. झालेल्या कामांची पडताळणी समिती द्वारे तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर व राज्य स्तरावर करण्यात येणार असून यासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीला बक्षीस सुध्दा देण्यात येणार आहे. यासाठी आज वाघोड गावात सुध्दा ग्रामसभा संपन्न झाली.
यावेळी रावेर पंचायत समिती कडून पर्यवेक्षक म्हणून प्रतिभा पाटील, वाघोड महसूल विभागाकडून तलाठी काजल पाटील, ग्रामपंचायत सरपंच संजय मशाने, जिल्हा परिषद मुख्याध्यापक रवींद्र तायडे सर, शिक्षक विजय पवार सर, पोलिस पाटील कौशल महाजन, कोतवाल रविंद्र श्रीनामें, अंगणवाडी सेविका आदी शासकीय कर्मचारी तसेच वाघोड ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील, रावेर, जळगांव

Address

Jalgaon

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 11am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loknayak News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share