07/09/2025
अनंत चतुर्दशी निमित्त इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मोफत मेडिकल कॅम्प
जळगाव : अनंत चतुर्दशीनिमित्त शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) रोजी इच्छादेवी चौक येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांसाठी इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मोफत मेडिकल कॅम्प व प्रथमोचार केंद्राचे आयोजन करण्यात आले.
या कॅम्पचे उद्घाटन उपअधीक्षक प्रमोद खटके, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, अब्दुल करीम सालार, मुफ्ती हारून नदवी, अजीज सालार, खालिद बागवान, इरफान सालार, ॲड. शरीफ शेख, कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी आसिफ खान, इमरान शेख, मोहसीन शेख यांच्यासह महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा दिली जात असून भक्तांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.