03/04/2022
नाशिकजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रूळावरून घसरले ः वाहतूक ठप्प
भुसावळ (गणेश वाघ) ः मुंबईहून जयनगरसाठी निघालेल्या डाऊन 11061 डाऊन एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची नाशिकजवळ घडली. रविवार, 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 15 प्रवासी जखमी झाले असून त्यात तीन तिकीट निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असून या अपघातामुळे डाऊन लाईनवरील ईगतपुरी-मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या ईगतपुरी, कसारा आदी रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.