The India News

The India News � *द इंडिया न्यूज* संपूर्ण भारतातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या आता मराठीत – एका ठिकाणी!

27/08/2026

ग्लेशियर कोसळल्याने नेपाळमध्ये हाहाकार; १६० हून अधिक लोकांचा मृत्यू, १,३०० जण बेपत्ता!

नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात ग्लेशियर (बर्फाचा डोंगर) कोसळल्यामुळे भोटे कोशी आणि त्रिशूली नद्यांना भीषण महापूर आला आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे (Flash Flood) आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, १,३०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या सुमारे ३०० भारतीय भाविकांचा आणि अनेक परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. पुराच्या प्रचंड वेगामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यातील संपूर्ण गावे, रस्ते आणि पूल वाहून गेले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या नेपाळ लष्कराकडून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने दुर्गम भागात युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Marathi Lokmat Nepal Nepal Tourism Board Nepal Tourism Board Nepalkhabar

अमरावतीत रुग्णालयात भीषण आग; ३ नवजात बालकांचा मृत्यू, ३६ बालकांची सुखरूप सुटका!द इंडिया न्यूज, जिल्हा प्रतिनिधी I अमरावत...
25/08/2026

अमरावतीत रुग्णालयात भीषण आग; ३ नवजात बालकांचा मृत्यू, ३६ बालकांची सुखरूप सुटका!

द इंडिया न्यूज, जिल्हा प्रतिनिधी I अमरावती येथील एका रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (ICU) पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत ३ निष्पाप नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, डॉक्टर आणि परिचारिकांनी तातडीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

AMRAVATI CITY NEWS AMRAVATI JUNCTION - अमरावती जंक्शन Amravati Collector

24/08/2026

मोठी बातमी I जळगावात कावड यात्रेत सहभागी १० वर्षीय मुलाचा भीषण अपघातात मृत्यू; संतप्त जमावाने आयशर पेटवले

द इंडिया न्यूज, जळगाव जिल्हा प्रतिनिधी : जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ कावड यात्रेत सहभागी असलेल्या १० वर्षीय मुलाला आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.

अपघातानंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्ता अडवत चालकावर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, संतप्त जमावातील काही जणांनी संबंधित आयशर वाहनाला आग लावली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. सुमारे अडीच तास जळगाव–ममुराबाद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

आयशर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

24/08/2026

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; ४ महिलांची सुटका, चालवणाऱ्या महिलेवर कारवाई

यावल : फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या दुमजली घरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर, यावल आणि निंभोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी कारवाईदरम्यान वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचे सांगितलेल्या चार महिलांची सुटका केली असून, कुंटणखाना चालवणारी मनीषा प्रकाश झोपे (वय ४५, रा. अकलूद) हिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत आधी पंटर पाठवला होता. संबंधित घरामध्ये अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी तीन महिला पश्चिम बंगालमधील असून भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची, तर एक महिला भुसावळ येथील स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ुसावळ

24/08/2026

*एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त दिग्गज नेत्यांची मांदियाळी; मुख्यमंत्री व शरद पवारांची उपस्थिती*

18/08/2026

"'वंदे मातरम्'च्या सन्मानासाठी १०० वेळा पागल व्हायला तयार!" — चित्रा वाघ

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी 'वंदे मातरम्'च्या सन्मानाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रीय गीताचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत, सोनिया गांधी यांना 'वंदे मातरम्'वरील पुस्तक पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोर्टातून निर्दोष मुक्त झालेल्या प्रकरणाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी खोटे बोलून आपली वैचारिक कंगाली दाखवू नये, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

17/08/2026

पेट्रोल पंपासमोर आलिशान मर्सिडीजने घेतला पेट; आगीत कार जळून खाक!

पिंपरी-चिंचवड | मोशी-चिखली परिसरातील शिव रोडवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर एका आलिशान मर्सिडीज कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. कारच्या इंजिन आणि बोनटच्या भागातून अचानक धूर व ज्वाळा उठू लागल्या. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत कारला लागलेली आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आलिशान कार पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

-Chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये सराईत दुचाकी चोराला बेड्या; २२ गुन्हे उघड, १२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त!पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युन...
17/08/2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सराईत दुचाकी चोराला बेड्या; २२ गुन्हे उघड, १२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त!

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-१ने मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाने आरोपी मोटारसायकली चोरून विविध जिल्ह्यांत विकत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

पोलिसांनी आरोपीकडून २२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत तब्बल १२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणाऱ्या सहा जणांचीही चौकशी सुरू असून, या टोळीतील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

-Chinchwad

17/08/2026

बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार; ऑनलाइन विक्रीलाही प्रोत्साहन — सुनेत्रा पवार

बचतगटांच्या उत्पादनांची विक्री ही प्रमुख समस्या असून, त्यांना सहज बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बचतगटांना आता ऑनलाइन माध्यमातूनही उत्पादनांची विक्री करता येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

यावेळी त्यांनी बीड येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा उल्लेख करत, या संस्थेचा परिसरातील नागरिक व पशुपालकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. तसेच ऊसतोड कामगारांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

#सुनेत्रा_पवार #उपमुख्यमंत्री #बचतगट #महिला_बचतगट #महिला_सक्षमीकरण #ऑनलाइन_विक्री ्पादने #बाजारपेठ #ऊसतोड_कामगार #बीड #पशुवैद्यकीय_महाविद्यालय #महाराष्ट्र

16/08/2026

चित्रा वाघ जळगावात आमदार राजूमामा भोळेंच्या निवासस्थानी दाखल; सोनिया गांधींना ‘वंदे मातरम्’ पुस्तक पोस्टाने पाठवले!

जळगाव : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांसह जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली. यानंतर 'वंदे मातरम्' संदर्भातील पुस्तक काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पोस्टाने पाठवण्यात आले.

'वंदे मातरम्' सुरू असताना काही नेते आपसात बोलत असल्याच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे पुस्तक पाठवले आहे.

Address

Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The India News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share