20/08/2025
दलित चिमुरड्यावर अमानवीय अत्याचार!
✅ वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयात सातवीत शिकणाऱ्या चिमुरड्याला बेदम हळहळ करून मारहाण केली. शैक्षणिक क्षेत्रात समग्र आरटीई विधार्थ्यांचे अस्तिव धोक्यात आले आहे. पालक भयभीत झाले आहेत, अनुसूचित जातीच्या दलित विद्धार्थ्याला टार्गेट करण्यात आलं आहे. याचा आम्ही निषेध करत असून तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी! 7 वी मध्ये शिकणाऱ्या ऋतुराज कांबळे या विद्यार्थ्यावर शिक्षक यांनी बेदम मारहाण केली!
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा तीव्र निषेध करते व स्पष्ट मागणी करते की –
✅ निर्दयी शिक्षक शहा आणि विद्यार्थ्याला तुच्छतेने वागवणाऱ्या शाळा चालकावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा!
✅ संस्थाचालकाला सहआरोपी करा!
✅ शिक्षणाधिकारी यांनी तातडीने या संस्थेची मान्यता रद्द करावी!
✅ पोलीस आयुक्त यांनी तात्काळ शाळेला भेट द्यावी!
✅ शाळेत लावलेले सिसिटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावेत!
✅ राज्यभरातील आरटीई मध्ये शिकणाऱ्या विधार्थ्याना मानसिक बळ द्यावे.
✅ शैक्षणिक ऍट्रॉसिटी अनुसूचित जाती जमाती आयोगाने गृहमंत्र्यांनी गांभीर्याने घ्याव!
✅ खाजगी शाळा बंद करा, सरकारी शाळा सुरु करा!
ऑल इंडिया पँथर सेना गृहमंत्री, एससी, एसटी आयोगाने, सामाजिक न्याय मंत्री यांना मागणी करत आहे तात्काळ या घटनेची दखल घेऊन ठोस पावलं उचलवीत!
सर्व पालकांना आवाहन आहे, अमानवीय अत्याचार सहन करू नका.
दिपक केदार
अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना