16/12/2021
कॉलेज कट्टा आयोजित
ज्योती क्रांती कॉ- ऑप क्रेडिट सोसा.लि.
प्रायोजित
|| क्रांती ज्योती सावित्री भव्य राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा ||
( फक्त मुली आणि महिलांसाठी )
संकल्पना आमची .... कलाविष्कार तुमचा...
घरबसल्या जोपासू .... वारसा कलेचा !
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी रोजी जयंती उत्सवानिमित्ताने www.collegecatta.com आयोजित आणि ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसा.लि. प्रायोजित एक व्यक्ती बहुपात्री अर्थातच " क्रांती ज्योती सावित्री भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा " आयोजित करण्यात आली आहे.
एकपात्री अभिनय स्पर्धा नियमावली
१) एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी स्पर्धकांनी 7720019353 या व्हाटसॲप नंबरवर आपला व्हिडिओ पाठवावा. स्पर्धा मराठी भाषेत असेल आणि फक्त शालेय मुली व महिलांसाठी खुली असेल.
२) स्पर्धा इ. १ ली ते इ. ४ थी ( गट क्रमांक १ ), इ.५ वी ते इ.७ वी ( गट क्रमांक २ ), इ. ८ वी ते इ.१० वी ( गट क्रमांक 3) आणि खुला गट ( गट क्रमांक ४ ) या चार गटात होईल. खुल्या गटाला कोणतीही वयोमर्यादा नाही.
३) एकपात्री अभिनय स्पर्धेकरीता गट क्रमांक १,२ व ३साठी वेळ मर्यादा ५ + २ मिनिटे तर खुला गटा क्रमांक ४ साठी ७ + ३ मिनिटे असेल. वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणे अनिवार्य राहिल, अन्यथा स्पर्धक स्पर्धेतुन बाद करण्यात येईल. स्पर्धेत प्रवेश विनामुल्य आहे.
४) स्पर्धकांने व्हिडिओ सोबत आपले संपुर्ण नाव,विद्यालय / महाविद्यालय /व्यवसाय,शिक्षण घेत असाल तर शैक्षणिक वर्ष, संपुर्ण पत्ता, वय, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड क्रमांक, मोबाईल ( व्हाटसॲप ) क्रमांक व्यवस्थित आपला कलाविष्कार सादर करण्यापुर्वी व्हिडिओत सांगायचा आहे आणि व्हॉटस ॲपला परिचय टाईप करुन देखील व्हिडिओ सोबत पाठवायचा आहे व कलाविष्काराचा व्हिडिओ आणि परिचय एकत्रितच आयोजकांनी दिलेल्या व्हाटसॲप क्रमांकावर पाठवावा. आपला संपुर्ण परिचयानंतरचा वेळच सादरीकरण वेळ म्हणुन ग्राहय धरला जाईल.
५) एकपात्री अभिनय स्पर्धेसाठीची नाटय संहित ( स्क्रिप्ट ) स्वलिखित असल्यास उत्तमच परंतु दुसऱ्या लेखकाची असल्यास परवानगी घेण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल. एकपात्री अभिनय स्पर्धेत कलाविष्कारात जात- धर्म, समाजाच्या भावना दुखविल्या जातील असे भाष्य टाळावे. असे निदर्शनास आल्यास स्पर्धकाला स्पर्धेतुन बाद करण्यात येईल.
६) स्पर्धेतील विजेती स्पर्धकाचा व्हिडिओ www.collegecatta.com या वेबसाईटवरुन प्रदर्शित करण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांचा व्हिडिओ शेतकरी उद्योजक या युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात येईल. तसेच अन्य सोशल मिडिया माध्यमातून देखील प्रसिध्दी दिली जाईल.
७) "आम्ही लेकी सावित्रीच्या" , "मी सावित्री बोलतेय" (स्वगत ) आणि "ती" हे तीन विषय निश्चित केले आहेत, सादरीकरणात अक्षेपाहार्य संवाद नसावा अन्यथा स्पर्धकास बाद करण्यात येईल.
८) एकपात्री अभिनय स्पर्धेंच्या व्हिडिओ मधे स्पेशल ईफेक्ट नसावे परंतु बॅक ग्राउंड म्युझिक/ साउंड असल्यास हरकत नाही. तसेच व्हिडिओ एडिट केलेला नसावा. सलग व्हिडिओ शुटिंग असणे बंधनकारक असुन व्हिडिओ होरिझॅटल ( आडव्या ) स्वरुपातच कॅमेरा / मोबाईल कॅमेऱ्यात शुट करणे बंधनकारक असेल.
९) परिक्षकांचा निकाल हा अंतिम राहिल, प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.तसेच विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
१०) स्पर्धेचा निकाल दि.२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६:०० वाजता घोषित करण्यात येईल.
११) आपला व्हिडिओ दि.३१ डिसेंबर २०२१ पर्यंत दिलेल्या व्हाटस क्रमांकावर पाठविणे बंधनकारक असेल.एका स्पर्धकाची स्पर्धेसाठी फक्त एकच व्हिडिओ प्रवेशिका स्विकारली जाईल.
१२) प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय ( रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ) आणि पाच उत्तेजनार्थ पारितोषिके ( सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ) जाहीर करण्यात येतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर जाहिर केला जाईल.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी रितेश साळुंके - 9623420126 या क्रमांकावर संपर्क साधावा.
- आपला स्पर्धा व्हिडिओ 7720019353 या क्रमांकावर पाठवावा.
श्री.अभिजीत हजारे
आयोजक - कॉलेज कट्टा