10/04/2024
अन् अमोल पांढरेंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. धन्य झाले जिवनं...!
समाजकार्याची तळमळ बघून आज एका शालेय विद्यार्थ्याने चक्क मला २० रुपयांची आर्थिक मदत केली. आणि हा लढा, ही सामाजिक चळवळ थांबता कामा नये...! असे सांगितले. त्याने केलेली ही मदत पाहून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याचे उपकार कसे फेडावेत ? हा माझ्यासमोर प्रश्नं आहे. पण तरीही मी त्याला सांगितले की, तुला तुझ्या संपर्ण आयुष्यात जेंव्हा कधी अडचण येईल. तेंव्हा या भावाला फोनं कर... मी, सदैव तुझ्यासोबत आहे. धनंजय रुपनवर असे या विद्यार्थ्याचे, मित्राचे, माझ्या भावाचे नावं आहे.
हे २० रुपये एका नेटक्या चळवळीच्या फाटक्या कार्यकर्त्याला दिले आहेत. त्यामुळे हे २० रुपये माझ्यासाठी २० कोटीहूनही अधिक आहेत. कारण या २० रुपयाने मला नैतिक बळं दिले आहे. लढण्यासाठी पाठबळ दिले आहे. ही माझ्या समाजकार्याची पावती आहे. असे मी मानतो. तसेच मी, आपल्या सर्वांना खात्री देतो, की यामधला एकही पैसा मी स्वतःसाठी खर्च करणार नाही. तो चळवळीसाठीच खर्च होईल. धन्यवाद...
आपला मित्र, आपला कार्यकर्ता - अमोल पांढरे