25/06/2020
मुंडे साहेबा नंतर, मुंडे भगिनीचाच, हात लागला ,अन् बघा ?
बीड तेलगाव परळी रस्ता चकाचक, झाला ?
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंबाजोगाई दि.२५( राम कुलकणी )----------
बीड जिल्ह्यात आशी काही विकास कामे आहेत .जी कामे स्व .गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना झाली , त्यानंतर कोणी डांबराच एक टोपल पण टाकल नाही ?तो रस्ता बीड तेलगाव परळी , खुपच दयनिय अवस्था झाली असतांना पुन्हा मुंडेच्या लेकिना राजकारणात जन्म घ्यावा लागला ? आणि माजीमंत्री पंकजाताई यांचा मार्गदर्शनाने विद्यमान खा .डॉ सौ . प्रितमताई मुंडेनी पाठपुरावा करुन केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करत हा रस्ता पुन्हा पुर्वी सारखा चकाचक करून सोडला ? जनतेला खुप समाधान वाटत असून या भगिनीच कौतूक होत आहे .
राज्यामध्ये भाजप-सेना युतीचे सरकार 1995 सालात आलं होतं. त्यावेळी स्व . गोपीनाथरावजी मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते .त्यांनी त्याकाळात बीड तेलगाव परळी हा रस्ता हजारो कोटी रुपये खर्च करून तयार केला होता. मात्र त्यानंतर अनेक सरकारे आली, आणि गेली ?या रस्त्यावर एक डांबराचे टोपलं, पण कोणीच टाकलं नाही? शिवाय रस्त्याचा दर्जा एवढा चांगला होता की, पंधरा वर्ष शंभर किलोमीटर अंतरावर, एक खड्डा पण पडला नाही. अर्थात त्यावेळी दर्जेदार कामे होत होती? हा भाग वेगळा. मात्र तदनंतर गेल्या काही वर्षात या रस्त्याची अवस्था विचित्र झाली होती .वडवणी तेलगाव दिंद्रुड , सिरसाळा, यादरम्यान रस्ता विचित्र , संपूर्ण रस्ता उखडून पडला होता. पण योगायोग कसा असतो ते बघा, साहेबांच्या नंतर पंकजाताई प्रीतम ताईकडे जिल्ह्याचे सत्ता सूत्र आली? पंकजाताई पालकमंत्री आणि खासदार ,प्रीतम ताई. सुरुवातीला शिरसाळा ते परळी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत केंद्र सरकार कडून पाठपुरावा करत या भगिनींनी मंजूर करून आणला. आणि नंतर उर्वरित शिरसाळा ते ते वडवणी घाटसावळी पर्यंत जवळपास पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक. या रस्त्यासाठी पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला. वर्तमान स्थितीत हा रस्ता आता चक चकित झाला असून. गेल्या दोन महिन्यात वडवणी तेलगाव शिरसाळा पर्यंत या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालेल आहे . राज्यात विरोधक सत्तेवर असले तरी.? पंकजाताई सत्तेत असतानाच? या रस्त्याला मागच्या वर्षीच मंजुरी झालेली होती? खासदार प्रीतम ताई संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या या खासदारांमध्ये रांगेत जाऊन बसल्या .मात्र बीड जिल्ह्यात त्यांनी जवळपास अकरा राष्ट्रीय महामार्ग, आणून दळणवळणाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिल्ह्याला जोडला आहे. प्रीतमताई जिद्द आणि चिकाटीच्या नेते आहेत, एखदा प्रश्नहातात घेतला की मार्गी लागल्याशिवाय शिवाय राहत नाहीत, हा रस्ता मंजूर होणे अवघड बाब होती. मात्र यासाठी जिवाचं रान रान करत. भगिनी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करून आणला, आणि आज हा रस्ता शंभर टक्के पूर्ण झाला. आज बीड वरून परळी ला एका तासात जाणे शक्य झाले आहे? त्यामुळे जनतेमधून मुंडे भगिनीच कौतुक होत आहे. जिल्ह्याच्या दळणवळणासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून ,जवळपास चार तालुके या रस्त्यावर जिल्ह्याची जोडले जातात. बाकी काही असलं तरी पंकजाताई च्या विकासाची आठवण आणि बीड जिल्ह्यासाठी त्यांनी दिलेले योगदान? त्याची आठवण सतत लोकांना होत आहे. एक मात्र निश्चित आहे , मुंडे साहेबांना नंतर हा रस्ता चांगल्या करण्यासाठी पुन्हा मुंडे भगिनीचा, अर्थात लेकींचा हात लागला हे नसे थोडके?