
15/08/2025
डोंबिवली वैदिक सेंटर तर्फे स्वातंत्र्य दिवसानिमित्त रुद्र एकादशणि चा कर्यक्रम संपन्न
गेली 18 वर्षे डोंबिवली वैदिक सेंटर तर्फे, भारतीय नागरिकांच्या आरोग्यासाठी, आणि देशाच्या हितासाठी संकल्प करून, रुद्र एकादशणि चा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी, संपन्न होतं असून, यंदाही अयोध्या नगरी मधील अग्रवाल हॉल मध्ये, 15 ऑगस्ट शुक्रवारी , सकाळी सहा ते दुपारी दीड या कालावधीत, वैदिक मंत्राच्या गजरात, भगवान शंकरावर,अभिषेक करून, रुद्र एकादशणि चा कार्यक्रम डोंबिवली परिसरातील, 80 गुरुजी आणि वैदिक अभ्यासक, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश पुजानाने झाली, त्यानंतर, देश हितासाठी,संकल्प आणि प्रार्थना करून, सामूहिक जन गण मन, झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रत्येकाची सीमेवर जाऊन लढायची, क्षमता नसते, पण आपण जे काही करू शकतो ते, म्हंटजे, देश हिताचं कामं करणाऱ्यांसाठी, नागरिकांसाठी प्रार्थना, आणि या मातृभूमी बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. याच भावनेने हा संकल्प करून हा कार्यक्रम आम्ही करतो, असे विचार कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि मुख्य आयोजक श्री रामचंद्रन (मामा) यांनी यावेळी व्यक्त केलें.
विभागीय कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश गोवर्धन मोरे, यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून, भगवान शिवाचे दर्शन घेतले.