Rohit R. Bhosale

Rohit R. Bhosale गडकिल्ले, लेणी तसेच विविध प्राचीन स्थळांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे.

Land GrantScript NagariLanguage: Marathi mixed with Sanskrit Provenance : Koprod, Thane District. Dated : Shaka 1222-130...
26/09/2025

Land Grant

Script Nagari
Language: Marathi mixed with Sanskrit
Provenance : Koprod, Thane District.

Dated : Shaka 1222-1300 CE

This inscription was commissioned by Jaideva who was appointed by Ramadeva to administer Kankan. Ramadeva is mentioned as 'mahamandaleshvara' under Ramachandradeva (Yadava of Devgiri). The inscription records the grant made by jaideva, of a village Supali to Vyavaharika. The boundaries of the donated village are also recorded. The Sun and the Moon depicted on top emphasizes that the grant will be valid until the Sun and the Moon lasts. The ass-curse in the text curses the violator of the grant (in old Marathi) as May your mother be deflied by a donkey. There is pictorial depiction of the same curse where only animal is visible.
_______________

भूमिदान

भाषा : संस्कृत मिश्रित मराठी
लिपी : नागरी
स्थान: कोपराड, जिल्हा ठाणे

शके १२२२ / इ.स. ११००

यादव रामचंद्रदेवाच्या कारकिर्दीतील या शिलालेखात त्याचा महामंडलेश्वर, सकल सैन्याधिपती रामदेव याने कोकण भागाची व्यवस्था पाहण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी जाईदेवाने व्यावहारिकास ' सुपली ' गावाचे दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखात गावाच्या सीमांचा निर्देश केलेला असून, सूर्य व चंद्र असे पर्यंत हे दानशासन कायम राहिल असे सूर्य चंद्राच्या कोरीव शिल्पावरून सूचित केले आहे. दानशासनावर कोरलेले गाढव मात्र शासनाच्या आज्ञेचे भंग करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या आईचा उल्लेख असलेले शापवचन स्पष्ट करते. शिलालेखातही हे शापवचन आढळते.
✍️ Rohit R. Bhosale

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू...
31/08/2025

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा संगम होतो अशी दिशा अर्थात 'क्षितिज' होय. त्याने आपल्या प्रकाशाने समस्त धरणी व्यापून टाकली. ज्या दिशेने तो प्रकाशला त्यास उगवतीची दिशा असे म्हटले जाते. उगवतीकडून निघालेला हा मैत्रीचा सूर्य हा हळूहळू अंधारी बाजू मैत्रीरुपी प्रकाशाने लक्ख करण्या जसा जसा जात राहिला तसं तसा मागे काळोख पसरायला लागला, असा समज तत्कालीन प्रकाशात न्हाऊन निघालेल्या लोकांचा होऊ लागला. यातूनच उगवती व मावळतीच्या दिशेचा लोकांचा संघर्ष सुरू झाला. यातूनच या दोघांसहित, दोनाचे चार, चाराचे आठ असे समूह वाढतच जाऊन आपआपली मानव धर्माची अर्थात मैत्रीची व्याख्या करू लागले. या विविध व्याख्येच्या विसंगतीतून त्या विविध समूहात संघर्ष वाढू लागला आणि हा संघर्षाचे लोण क्षितीजावर मोठ्या प्रमाणावर उमटले. या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा केवळ आणि केवळ आजचे विज्ञान देऊ शकते. यासाठी खरे तर सर्वांनी मैत्रीने सोबत येत याचे उत्तर शोधायला हवे. किती दिवस जुन्या मळलेल्या आणि मळून मळून खड्डे भरलेली पायवाट तुडवणार आहोत. ती वाट सोडून देऊन नवी वाट चोखाळावी व ती असल्यास त्यावर चालावे असे नाही का वाटतं?

#धर्म #मैत्री

✍️ रोहित रा. भोसले

KP WATERFALL, KHOPOLI 📍
03/08/2025

KP WATERFALL, KHOPOLI 📍

KP WATERFALL, KHOPOLI

दैनिक बहुजन सौरभ, दि. ०२ ऑगस्ट २०२५, पृष्ठ क्र. ३
02/08/2025

दैनिक बहुजन सौरभ, दि. ०२ ऑगस्ट २०२५, पृष्ठ क्र. ३

29/04/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र, ड प्रभाग समिती कार्यालय, क.डों.म.पा., कल्याण पूर्व

केवळ कल्याणच नाही तर पर्यायाने महाराष्ट्र व भारतातील नागरिकांनी भेट द्यावे असे महामानवाच्या विचाराचे ज्ञानकेंद्र...

🔝 💙 💙🌍🙏💯

15/04/2025

बीड खुर्द, ता. खालापूर, जि. रायगड येथील अपरिचित लेणी...

कसे जाल ??

मध्य रेल्वेच्या कर्जत - खोपोली स्थानकाच्या दरम्यान येणाऱ्या केळवली अथवा डोळवली रेल्वे स्थानकावर उतरून बीड खुर्द या गावी पोहोचावे. सदर स्थानकावर उतरून दहा सीटर अथवा ऑटो रिक्षा माध्यम उपलब्ध आहेत. (वाहनांची संख्या मर्यादित असल्याने परतीच्या प्रवासासाठी येणाऱ्या गाडी वाहकाचा संपर्क क्रमांक घेतला तर उत्तम)

गावात आल्यावर छ. शिवाजी महाराज स्मारक येथून पाण्याची टाकीचा रस्ता विचारणे. पाण्याच्या टाकी येथून ट्रेक सुरु केला असता अवघ्या १५ मिनिटांत हा ट्रेक करत लेणी पर्यंत पोहोचता येईल.

टीप : सध्या उन्हाळ्याच्या दिवसात ट्रेक दरम्यान व्यक्तिपरत्वे मुबलक पाणी तसेच सुखा खाऊ बाळगणे. गावात दुकाने असल्याने छोटी मोठी व्यवस्था होऊ शकते.

धन्यवाद.

ज्या पाणवठ्यावर पशू पक्षी आपली तहान भागवीत. त्यातले पाणी पिऊन आपली तहान भागवण्यास ज्याला आपल्या पुण्यभूमीत नि मायभूमीत म...
20/03/2025

ज्या पाणवठ्यावर पशू पक्षी आपली तहान भागवीत. त्यातले पाणी पिऊन आपली तहान भागवण्यास ज्याला आपल्या पुण्यभूमीत नि मायभूमीत मज्जाव होता. बाबासाहेब यांनी प्रथम ओंजळभर पाणी प्राशन केले व त्यानंतर उपस्थित जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले. त्यांनी माणुसकीचा व समतेचा हक्क बजावला. बाबासाहेबांची ही कृती अस्पृश्य ठरविल्या गेलेल्या लोकांच्या मुक्तीच्या जाहीरनाम्यातील एक मैलाचा दगड ठरावा अशीच आहे. जे काम शेकडो ठरावांनी होत नाही ते काम अशा एका कृतीने सिद्धीस जाते. कृती हे मानवाचे खरे उद्दिष्टे होय.


सह्याद्री परिक्रमा करायची आहे ??... मग श्री. सदाशिव टेटविलकर सर लिखित  #सह्याद्री_परिक्रमा हे पुस्तक आपल्या संग्रही असले...
07/07/2024

सह्याद्री परिक्रमा करायची आहे ??... मग श्री. सदाशिव टेटविलकर सर लिखित #सह्याद्री_परिक्रमा हे पुस्तक आपल्या संग्रही असलेच पाहिजे. कारण; 👇

गडकिल्ले भटकंती करायला लागल्यावर प्रत्येक सह्यभटक्यांच्या मनात एकदा तरी एक विचार नक्की दाटून येतो, तो म्हणजे एकदा तरी सह्याद्री परिक्रमा केली पाहिजे गड्या... दख्खनच्या या मुळपुरूषाची एकदा तरी संपूर्ण परिक्रमा करून तो पायी पालथा घालावा, अशी इच्छा या आधुनिक जगात आज अनेक सह्यभटके मनाशी बाळगून आहेत. आजच्या आधुनिक साधनांच्या साहाय्याने ही परिक्रमा त्यामानाने थोडीबहुत सुकर होईल सुद्धा... परंतु; आजपासून ४० वर्षापूर्वी उपलब्ध अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने ही सह्याद्री परिक्रमा करावी असे पाच मित्रांच्या साथीने ठरले आणि केवळ ठरलेच नव्हे तर त्यांनी ती परिक्रमा पूर्ण सुद्धा केली. ही त्याचीच कथा...
..या मोहिमेतील ते पाच साथीदार म्हणजे रवी कांबळे, आनंद सावंत, जयंत गमरे, सुभाष मांडले आणि त्या सर्वांचे भाऊ म्हणजे अर्थात सदाशिव टेटविलकर होय. या सह्याद्रीभ्रमण मोहिमेत ब्रम्हगिरी ते तेरेखोल किल्ल्यापर्यंत जाण्याचे निश्चित केले. सह्याद्री परिक्रमेला ५ मे १९८३ या दिवशी ब्रम्हगिरीच्या कोंदणात बसविलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाने सुरुवात झाली. ही परिक्रमा करत असताना सह्याद्रीत असणारे गडकिल्ले, लेण्या, मंदिरे, घाटवाटा, गावं, तिथली माणसे, त्यांचे जीवन या सर्वांचा थोडा बहुत अभ्यास करता यावा हा मूळ उद्देश त्या सवंगड्यांचा होता. या संपूर्ण परिक्रमेत इगतपुरीचे देशमुख, भराडे, खडकेद चे रोहिदास कथले आणि प्रेमळ गावकरी, पांझर गावचे लक्ष्मण खडके, कुमशेतचे दत्तू असावले, इ. सारख्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या माणसांनी केलेल्या सहकार्यामुळे सुसह्य झाला. तर कधी भर उन्हात जंगलाला लागलेल्या वणव्यातून हा प्रवास करावा लागला. साक्षात रायगडावर झालेली गो. नि. दांडेकरांची (आप्पा) भेट ही या परीक्रमेतील साथीदारांना ऊर्जा देणारा क्षण होता. चिखली गावाच्या लोकांना सांगितलेली सुधागडच्या गड पुरुषाची कथा अत्यंत अंगावर शहारे आणणारी अशीच होती, असे एक ना अनेक प्रसंगांनी युक्त अशी सह्याद्री परिक्रमा परिपूर्ण आहे. हा सर्व प्रसंग आता पुस्तकाच्या साहाय्याने लिखित रुपात शब्दबध्द झालेला असून, आपल्या संग्रही असला पाहिजे असाच आहे.

पुस्तकाचे नाव :- सह्याद्री परिक्रमा
लेखक :- सदाशिव टेटविलकर
ISBN :- 9789391621940
पृष्ठ :- १९२ (संपूर्ण रंगीत)
मूल्य :- ₹५००/-

पुस्तक मागविण्यासाठी कृपया केवळ 9769428306 या अधिकृत भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

सातवाहनकालीन जुन्नर नगरीच्या प्राचीन स्थलनामाचा पुरातत्वीय पुरावे व समकालिन संदर्भाच्या आधारे मिळविलेल्या मजतर्फे लिखित ...
25/05/2024

सातवाहनकालीन जुन्नर नगरीच्या प्राचीन स्थलनामाचा पुरातत्वीय पुरावे व समकालिन संदर्भाच्या आधारे मिळविलेल्या मजतर्फे लिखित आणि संशोधित शोधनिबंधावर आधारित "शोध जुन्नरच्या प्राचीन स्थलनामाचा..." हे पुस्तक लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 9892400546 या क्रमांकावर पुस्तक मूल्य ₹75 + स्पीड पोस्ट खर्च ₹50 अधिकचे पाठवून त्याच क्रमांकावर आपले नाव व पत्ता WhatsApp करावा.

अधिक माहितीसाठी थेट संपर्क करा.

रोहित भोसले 9892400546

30/04/2024

Thank you so much !! ❤️🙏
1000+ Followers & Growing

http://rohitrbhosale.blogspot.com/2024/03/blog-post.htmlनक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया ब्लॉगच्या कमेंट सेक्शन मध्ये ज...
17/03/2024

http://rohitrbhosale.blogspot.com/2024/03/blog-post.html

नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया ब्लॉगच्या कमेंट सेक्शन मध्ये जरूर नोंदवा.

#अपरान्ताचे_लेणे

Rohit Bhosale, Forts, Trekking, Traveling, Caves, Buddhist Caves, Adventure, Trek, Rohit Bhosale Blog

Address

Kalyan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohit R. Bhosale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category