10/04/2025
विश्वाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे #भगवान_महावीर यांना विनम्र अभिवादन..!
जैन धर्माचे २४वे आणि अंतिम तीर्थंकर असलेल्या भगवान महावीरांनी १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर केवलज्ञान प्राप्त केले, त्यानंतर त्यांनी विस्तृत प्रवास करून आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या शिकवणीतून, भगवान महावीरांनी पंचमहाव्रतांचा मार्ग सांगितला – धर्म आणि काळाच्या पलीकडे असलेले अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, आणि ब्रह्मचर्य – हे तत्त्वज्ञान अनेक अनुयायांना नेहमीच प्रेरित करत राहील.
सर्वांना #भगवान_महावीर_जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.!