10/09/2025
बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे. ते जिथं जिथं भिंतीला हात लावत त्या ठिकाणाचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होई. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो.
त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं, म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला कोणते तरी तेल लावले होते. त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्याने, हाताचे ठसे भिंतीवर उमटले. ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं कुणास ठाऊक मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो "बाबा, भिंतीला हात न लावता चाला ना जरा. तुमचे हात लागून त्या किती घाण होतात !" 😭😭😭😭😭
माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटलं.
ऐंशी वर्षाचे बाबा, एखादा लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करुन मान खाली घालून गप्प बसले.
छे! 'हे मी काय केले! मी असं नको म्हणायचं होतं असं वाटायला लागलं
माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले. त्यानी भिंतीला धरुन चालणं सोडून दिले.😔😔😔😔😔
पुढे चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले. त्यानी अंथरुनच धरले. पुढे दोन दिवसांनी त्यांनी इहलोक यात्रा संपविली.🥶🥶🥶🥶
भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काही तरी अडकल्या सारखं वाटत राही.
दिवस ऊलटत राहिले. माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावे असे वाटू लागले. पेंटर आले सुद्धा. माझा मुलगा "जितूला आजोबा म्हणजे प्राण प्रिय. भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगविण्याचा हट्टच धरला त्याने.
शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, सर, काही काळजी करू नका. त्या ठशाच्या भोवती गोल करून छान डिजाईन काढून देतो. तुम्हालाही ते आवडेल. शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही.
पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिजाईन करून दिले.
पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणार्या पाहुणे, मित्रमंडळींना पण आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले.
आता पुढे जेव्हां भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हां त्या हाताच्या ठशाभोवतीचे डिजाईन बनविले जाऊ लागले.
सुरुवातीला मुलाच्या हट्टा पायी हे करत राहिलो तरी आमचंही समाधान होई...... 🔥🔥🔥🔥🔥
2
दिवस, महिना, वर्ष पुढे सरकत चालले. मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहचलो. बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊन लागलो. मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वाटू लागलं व मला आठवू लागलं, किती चिडून बोललो होतो बाबांना!
म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो.
त्या दिवशी रूम मधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचे जाणवलं".
अहो बाबा! बाहेर येताना भिंतीला धरून यायचं? आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला ! " मुलाचे वाक्य कानावर पडले.🙂🙂🙂🙂🙂
मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता. जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढं बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले.आपोआप डोळ्यात पाणी साचले. तेवढ्यात आठ वर्षाची नात धावत आली.🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
आजोबा, आजोबा! तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉईंगबुक दाखवत, आजोबा! आज क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईझ मिळालं असे म्हणाली.
हो का? अरे व्वा! दाखव बघू कोणतं ड्रॉईंग आहे? म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखविलं. भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसं काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती.
आणि म्हणाली, टीचरनी हे काय आहे म्हणून विचारले.
मी सांगितले माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय.
टीचर म्हणाल्या, मुले लहान असताना भिंतीभर रेघोट्या, हातापायाचे चित्र काढत राहतात. मुलांच्या आईबाबाना त्यांचं कौतुक वाटतं. त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण वयस्कर आई वडील, आजी आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे. त्यानी व्हेरी गुड श्रिया असे म्हणून माझे कौतुक केले.
श्रिया (आमची नात ) गोड गोड बोलत राहिली तेव्हां माझ्या नाती पुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं.
मी माझ्या रूममध्ये आलो. दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन "मला क्षमा करा बाबा" असे म्हणत मन हलकं होई वरचेवर रडत बाबांची क्षमा मागत राहिलो ...... !🙏🙏🙏🙏🙏
*आई-बाबांना जपा एक दिवस आपण ही त्यांच्या जागी असणार आहे ❤️❤️❤️❤️
पोस्ट क्रेडिट : धनंजय माने इथेच राहतात का?