के बी के न्यूज कन्नड

के बी के न्यूज कन्नड a page which provides latest and updated news from overall Kannad, Aurangabad and local region

20/09/2024

प्रतिनिधी किशोर राजगुरू :-- कन्नड पंचायत समिती कार्यालय भोवती वावरणाऱ्या चिल्लरछाप राजकीय दलालांना मनसेचे कन्नड तालुकाध्यक्ष अनिल शेळके पाटील यांचा इशारा...

24/08/2024

धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, कन्नडमधील घटना_*

आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय. दादासाहेब अकोलकर (वय 67) या आरोपीविरुद्ध कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात गेल्या दहा वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आश्रम चालवण्यात येतो. या आश्रमातील मुली जवळच असलेल्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात परत येतात.

20 ऑगस्ट रोजी रात्री आश्रमचालक दादासाहेब पुंडलिक अकोलकर याने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या खोलीत बोलावून लज्जा वाटेल असेल कृत्य करत लैंगिक अत्याचार केले. शिवाय, या घटनेची वाच्यता केल्यास आश्रमातून हाकलून देण्याची धमकी दिली. पीडित मुलींकडे मोबाईल नसल्याने आणि आश्रमचालकाची दहशत असल्याने दोन दिवस त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. पीडिताच्या पालकांनी आज आश्रमात येऊन आश्रमचालक दादा महाराज अकोलकर यास जाब विचारला मात्र त्याने उडवाउडवीची उतरे दिली. याप्रकरणी पीडित मुलींच्या फिर्यादीवरून दादासाहेब पुंडलिक अकोलकर ऊर्फ दादा महाराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे

कन्नड . धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, कन्नडमधील घटना_ आध्यात्मिक शिक्षणासाठ...
24/08/2024

कन्नड . धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, कन्नडमधील घटना_

आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय. दादासाहेब अकोलकर (वय 67) या आरोपीविरुद्ध कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात गेल्या दहा वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आश्रम चालवण्यात येतो. या आश्रमातील मुली जवळच असलेल्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात परत येतात.

20 ऑगस्ट रोजी रात्री आश्रमचालक दादासाहेब पुंडलिक अकोलकर याने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या खोलीत बोलावून लज्जा वाटेल असेल कृत्य करत लैंगिक अत्याचार केले. शिवाय, या घटनेची वाच्यता केल्यास आश्रमातून हाकलून देण्याची धमकी दिली. पीडित मुलींकडे मोबाईल नसल्याने आणि आश्रमचालकाची दहशत असल्याने दोन दिवस त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. पीडिताच्या पालकांनी आज आश्रमात येऊन आश्रमचालक दादा महाराज अकोलकर यास जाब विचारला मात्र त्याने उडवाउडवीची उतरे दिली. याप्रकरणी पीडित मुलींच्या फिर्यादीवरून दादासाहेब पुंडलिक अकोलकर ऊर्फ दादा महाराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली

कन्नड :---- महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार श्री.धनंजयभाऊ मुंडे साहेब* यांच्या वाढदिवसानिमित्त *राष्ट्रवादी महिला ...
16/07/2024

कन्नड :---- महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार श्री.धनंजयभाऊ मुंडे साहेब* यांच्या वाढदिवसानिमित्त *राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस तथा मेहगाव ता.कन्नडच्या सरपंच सौ.रेखाताई गणेशराव बोंगाणे* यांनी विविध अशा जनसामान्याच्या सेवेच्या उपक्रमांचा शुभारंभ केला.
या कार्यक्रमाचा तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा शुभारंभ *राष्ट्रवादीच्या महिला काॅग्रेसच्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षा तथा मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.स्वातीताई संतोष कोल्हे* यांच्या शुभहस्ते झाला.
या कार्यक्रमास *राष्ट्रवादीचे नेते श्री.संतोषभाऊ किसनराव कोल्हे* श्री.गणेश बोंगाणे, जिल्हा सरचिटणीस तथा मा.पंचायत समीती सदस्य श्री.भास्करराव घुगे, मुख्याध्यापक श्री.अनवडे सर , कृषी अधिकारी श्री.मामिलवाड साहेब , कृषी विस्तार अधिकारी श्री.विकास चोंधे, श्री.राठोड साहेब कृषी सहायक, ग्रामसेवक श्री.मुंडे साहेब , ग्रामपंचायत सदस्य श्री.अंकुश घुगे, श्री.सुधाकर घुगे, श्री.रमेश दादा, मा.सरपंच श्री.सूर्यभान घुगे, श्री.मुकेश गायकवाड, श्री.सुरेश घुगे, श्री.पंडित घुगे, श्री.महाले सर, सौ.सगुणाताई वाघ,ताराताई घुगे, सौ.थोरात मॅडम, सौ.रंजनाताई राठोड मॅडम, सौ.मेखे मॅडम यांचेसह ग्रामस्त उपस्थीतीत होते...

01/02/2024

आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

दिनांक. 30 जानेवारी 2024 रोजी आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय कसा करावा, व्यावसायिक ज्ञान वाढावे, नफा व तोटा या विषयी माहिती मिळावी म्हणून शाळेत आनंदनगरी उपक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या संचालिका सौ. स्वातीताई कोल्हे, प्रमुख उपस्थिती सौ. विद्या प्रविण काशिनंद ( नगरसेविका ), सौ. सोनम अनिल गायकवाड ( नगरसेविका ), श्री. प्रवीण स्वभावणे, गोविंद बनसोड, गीता फिरंगी, मोहिनी लोंढे, उपस्थित होते.
तसेच दिनांक - 31 जानेवारी 2024 रोजी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष - सौ सीमाताई कोल्हे व उदघाटक- ब्र. कु. अनिता दीदी ( संचालिका प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र कन्नड ) प्रमुख उपस्थिती अनिल गायकवाड (नगरसेवक ) सदाशिव कुलकर्णी, अनिल राठोड, सौ. कविता रत्नाकर पंडित( नगरसेविका ), विद्या प्रवीण काशिनंद (नगरसेविका )तसेच पालक वर्ग व शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

05/01/2024
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती संभाजीनगर सोशल मीडिया पदाधिकारी नियुक्त्या..*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्री...
05/01/2024

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती संभाजीनगर सोशल मीडिया पदाधिकारी नियुक्त्या..*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री *मा.ना श्री.अजितदादा पवार* प्रदेशाध्यक्ष *मा.श्री.सुनीलजी तटकरे* महिला प्रदेशाध्यक्ष *मा.सौ.रूपालीताई चाकणकर* मराठवाड्याचे नेते आमदार *श्री.सतीशभाऊ चव्हाण* यांच्या मार्गदर्शन व मान्यतेने मा.आमदार तथा *जिल्हाध्यक्ष श्री.कैलास पाटीलसाहेब* महिला *जिल्हाध्यक्षा सौ.स्वातीताई संतोष कोल्हे* व जिल्हा कार्याध्यक्ष *सौ.वैशालीताई साबळे* यांच्या प्रमुख उपस्थीतीत व हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची नियुक्तया जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शुभम साळवे खुलताबाद तालुका अध्यक्ष श्री.अनिल भाऊ चव्हाण जिल्हा सरचिटणीस श्री.भगवान कामटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
1) तुषार जाधव जिल्हा - उपाध्यक्ष छ. संभाजीनगर
2) अमोल भालेराव
जिल्हा - सरचिटणीस
3) बहादुर चव्हाण -तालुका अध्यक्ष सोयगाव
4) शोएब पठाण - तालुका अध्यक्ष सिल्लोड
5) विकास कचकुरे - तालुका अध्यक्ष छ.संभाजीनगर
6) योगेश नलावडे - तालुका अध्यक्ष खुलताबाद
नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थीत सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या...

कन्नड कारखान्यावर जवळ अवैध रित्या दारू वाहतूक करणारी मोटरसायकल पकडली एकावर गुन्हा दाखल ......प्रतिनिधी:किशोर राजगुरू  कन...
03/01/2024

कन्नड कारखान्यावर जवळ अवैध रित्या दारू वाहतूक करणारी मोटरसायकल पकडली एकावर गुन्हा दाखल ......
प्रतिनिधी:किशोर राजगुरू
कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथे कन्नड सहकारी साखर कारखान्याजवळ कन्नड शहर पोलिसांनी मोटरसायकलवर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पकडले असून त्याच्याकडून एक बॉक्स देशी दारूचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की काल रात्री संध्याकाळच्या सुमारास कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक भापकर, जे.पी.सोनवणे बीट अंमलदार दिनेश खेडकर यांनी अवैध रित्या दारू वाहतूक करणारा इसम अरुण जनार्दन सोनवणे याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी दारूचा बॉक्स आढळून आला त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून 4320 च्या 48 दारूच्या बाटल्या व एच एफ डिलक्स गाडी जिची किंमत 70 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक तपास कन्नड शहर पोलीस करत आहे.

30/09/2023

🌺 दिनांक 30/9/2023
कन्नड शहर पोलीस ठाणे येथील बाप्पाला वाजत गाजत विसर्जन मिरवणूक🌺

29/09/2023

*श्री.गणेश उत्सव 2023*
गणेशोत्सवा निमीत्त आज *राष्ट्रवादीचे नेते मा.नगराध्यक्ष श्री.संतोषभाऊ कोल्हे* यांनी *कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील* विविध गावात भेटि देवुन *विसर्जन मिरवणुकित* सामील झाले.

*वासडी ता.कन्नड* येथील विसर्जन मिरवणुकीत सरपंच श्री.कचरूभाऊ विभुते राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भास्करराव घुगे नगरसेवक श्री.रत्नाकर पंडित गणप्रमुख श्री.दिलीप सोनवणे श्री.संजयभाऊ मुगले श्री.सागरभैया जैस्वाल यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

*करंजखेड ता.कन्नड* येथील विसर्जन मिरवणुकीत नगरसेवक श्री.रत्नाकर पंडित,ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रशांत वाघ,मा.ग्रामपंचायत सदस्य श्री.राहुल चौथमल,श्री.ऋषी वळवळे,श्री.रामु गाढवे यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

*चिंचोली ता.कन्नड* येथील विसर्जन मिरवणुकित नगरसेवक श्री.रत्नाकर पंडीत श्री.नितीन जैस्वाल श्री.महेश काथार श्री.अजय जंगले श्री.मनोज काथार श्री.नाना पवार यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

*बोरमळी(जंगलीतांडा) ता.सोयगाव* येथील विसर्जन मिरवणुकित नगरसेवक श्री रत्नाकर पंडित श्री दामू राठोड श्री नामदेव राठोड यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

*वाडी ता.सोयगाव* येथील विसर्जन मिरवणुकीत श्री.सुदामनाना बोरसे नगरसेवक श्री रत्नाकर पंडित श्री.विकी बोरसे यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

*बनोटी ता.सोयगाव* येथील विसर्जन मिरवणुकित श्री.धनंजय ऊर्फ नानाभाऊ भास्करराव पाटिल श्री.अंकुशभाऊ धौंडकर श्री.रत्नाकर पंडीत श्री.अतुल पाटिल श्री.राजुनाना यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

*खांडसरी* येथील विसर्जन मिरवणुकित ॲड.श्री.संजीवन मेन,श्री.रोहिदास पाटिल श्री.आबा चौधरी श्री.भगवान मोरे श्री.शुभम पाटिल चि.प्रशांत कनके यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

*बालाजी मंदिर पिरथानी गल्ली* येथील विसर्जन मिरवणुकित श्री.राजेश भारूका नगरसेवक श्री.युवराज बनकर नगरसेवक श्री.रत्नाकर पंडीत श्री.धिरज पिरथानी श्री.अल्केश पिरथानी,श्री.सुनिलकुमार गंगवाल यांच्यासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

सौ.देवयानीताई व मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक श्री.विनोदभाऊ पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी निवासस्थानी अज...
28/09/2023

सौ.देवयानीताई व मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक श्री.विनोदभाऊ पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी निवासस्थानी अजिंक्य देवगिरी गणेशोत्सवा निमित्त राष्ट्रवादीचे नेते मा.नगराध्यक्ष श्री.संतोषभाऊ कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष(महिला) तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.स्वातीताई संतोष कोल्हे यांच्यासह सपत्नी भेट दिली व गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वत्र सुख-समृद्धी नांदू दे, बळीराजाला सुगीचे दिवस येवो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.

27/09/2023

*श्री.गणेश उत्सव 2023*
यावर्षी *सावता गणेश मंडळ चिकलठाणा(विमानतळ)* या मंडळांने *केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा* तयार केला आहे. साक्षात *केदारनाथ धामची आठवण* करून देणारा हा देखावा पाहुन मन प्रसन्नतेने प्रफुल्लित होते. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून हजारो भावीक हा सजीव मनमोहक देखावा पाहण्यासाठी मंडळात दररोज प्रचंड संख्येने येत आहे.

*राष्ट्रवादीचे नेते मा.नगराध्यक्ष श्री.संतोषभाऊ कोल्हे* यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या *जिल्हाध्यक्ष(महिला) तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.स्वातीताई संतोष कोल्हे* यांच्यासह सपत्नीक तसेच फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या *सभापती सौ.अनुराधाताई चव्हाण* व छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या *तालुकाअध्यक्ष(महिला) सौ.कांताबाई व श्री अशोकभाऊ तारो* यांच्या सोबत
*सावता गणेश मंडळाचे* अध्यक्ष *श्री.शुभम सुभाषराव गाजरे* नगरसेवक *श्री.रवीभाऊ कावडे श्री.योगेशभाऊ धोत्रे श्री.रावसाहेब गाजरे* यांच्या निमंत्रणा वरून मंडळास भेट घेऊन श्री.गणेशाची आरती केली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व माता भगिनी व भावीक संख्येने उपस्थित होते.

Address

Kannad
431103

Telephone

+919665591761

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when के बी के न्यूज कन्नड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share