Mahankali News

Mahankali News �Mahankali News | महाराष्ट्रातील हक्काचे डिजिटल न्यूज नेटवर्क

• ब्रेकिंग न्यूज | गुन्हेगारी बातम्या | स्थानिक अपडेट्स विश्वासार्ह माहिती | video

04/09/2026

सांगलीत आर्या लॉजवर पोलिसांचा धडाका! बोगस ग्राहकाच्या सापळ्यात देहविक्रीचा कथित पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, एक आरोपी ताब्यात

04/09/2026

अं... हां... गुलाल आमचाच... फक्त आम्हीच सभासदांना न्याय देऊ शकतो... संदीप आबा गिड्डे पाटील

04/09/2026

कारखाना निवडणूक, खेळ जादुई आकड्यांचा, जॅकपॉट कोणाला लागणार

04/09/2026

कारखाना कर्मचाऱ्यांचा अनुभव निर्णय प्रक्रियेत आणावा : कृती समितीचे उमेदवार अशोक चंदनशिवे #

04/09/2026

मिरजेतून घरी निघालेल्या तरुणाचे अपहरण… हात-पाय बांधून बेदम मारहाण! आर्थिक वादातून सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

मिरज येथून दुचाकीवरून आपल्या गावी करगणीला निघालेल्या ३६ वर्षीय तरुणाचे आर्थिक वादातून अपहरण करून त्याला आटपाडी येथे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आटपाडी येथे या तरुणाचे हात-पाय बांधून पाइप, काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी गुरुवारी आटपाडी पोलिस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोतिराम शिवाजी गायकवाड, वय ३६ वर्षे, रा. करगणी, ता. आटपाडी, यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोतिराम गायकवाड हे सध्या मिरज येथील इंडियन ऑइल कंपनीमध्ये टँकरचालक म्हणून काम करतात. यापूर्वी ते २०१७ पासून संशयित शिवाजी भगवान पाटील यांच्या करगणी आणि भिवघाट येथील पेट्रोल पंपावर काम करत होते. २

04/09/2026

'सगळी जमीन आमची!’ म्हणत शेतात घुसले; तरुणाला काठीने मारहाण

पलूस तालुक्यातील आंधळी येथे जमिनीच्या कब्जा-वहिवाटीच्या वादातून शेतात घुसून एका तरुणाला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सात जणांसह पाच अनोळखी अशा एकूण बारा जणांविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत भुपाल सावंत, वय ३५, रा. सावंतपूर, ता. पलूस यांनी याबाबत पलूस पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत सावंत आणि संशयितांमध्ये जमिनीच्या ताबा-वहिवाटीवरून यापूर्वीपासून वाद सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास संकेत सावंत हे काही कामगारांसह आंधळी येथील गट क्रमांक ४०८ मधील शेतात उसाची वैरण काढण्यासाठी गेले होते. यावेळी संशयित शेतात आले आणि त्यांनी, "आम्हाला कोर्टाचा निकाल मान्य नाही, सगळी जमीन आमची आहे. येथे आला तर जीवे मारू," अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर स

04/09/2026

अंघोळीचा फोटो काढला, मुलांना जीवे मारण्याची धमकी; विवाहितेवर वारंवार अत्याचाराचा आरोप!

सांगली जिल्यातील मिरज तालुक्यातील माधवनगर येथे विवाहितेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंघोळ करतानाचे छायाचित्र काढून ते सार्वजनिक करण्याची धमकी… एवढंच नाही तर लहान मुलांना जीवे मारण्याची भीती दाखवत अत्याचार केल्याचा आरोप एका २४ वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पांडुरंग आडेकर, वय २४, रा. आर. के. नगर, बोरगाव, तालुका चिकोडी, याच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित महिला सध्या माधवनगर येथील बुधवार पेठ परिसरात माहेरी राहत आहे. तर तिचे सासर बोरगाव, तालुका निपाणी येथे आहे. आरोपीने महिला अंघोळ करत असताना तिच्या नकळत मोबाईलमध्ये तिचे छायाचित्र काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे छायाचित्र इतरांना दाखवून सार्वजनिक करण्याची धमक�

04/09/2026

मिरजमध्ये महिलांचा तुफान राडा! भाडेकरूच्या वादातून खुरप्याने डोक्यात वार

मिरज शहरातील वखारभाग परिसरात भाडेकरूला त्रास देण्याच्या कारणावरून महिलांच्या दोन गटांत तुफान वादावादी आणि हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. जुगाई कॉलनीमध्ये घडलेल्या या प्रकारात एका महिलेच्या डोक्यात खुरप्याने वार करून तिला जखमी करण्यात आले. तर दुसऱ्या गटातील वृद्ध महिला आणि तिच्या सुनेला घरात घुसून धक्काबुक्की, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात चार महिलांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिहाना इनायत वस्ताद या जुगाई कॉलनीतील आपल्या भाडेकरू नुरजान महेबुब सय्यद यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी रिहाना यांची आई जैबुनबी मकानदार या घराबाहेर बसल्या होत्या. रिहाना यांनी आपल्या आईला, 'माझ्या भाडेकरूंना का त्रास देतेस?’ अशी विचारणा केली. य

03/09/2026

कोल्हापूर गोव्याच्या कॅसिनोसाठी भावानेच घर लुटलं! १९ लाखांचे सोनं चोरीला

कोल्हापुरात गोव्यातील कॅसिनो आणि तीन पानी जुगाराच्या नादात एका तरुणाने चक्क आपल्या घरातील दागिन्यांवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे समोर आला आहे. विशेष म्हणजे, घरातील चोरी लक्षात न आल्याचे पाहून या तरुणाने चुलत्याच्या घरातही चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आदित्य संजय चौगुले, वय २१, रा. सूर्यनगरी, हणमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर, असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचा मोठा भाऊ आतिश संजय चौगुले हे व्यापारी आहेत. त्यांच्या घरातून ऑक्टोबर २०२५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत तब्बल १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे, सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी आतिश चौगुले यांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्�

03/09/2026

चुलत बहिणीशी प्रेम संबंध! ‘तू एकटाच ये’... फेक Instagram ID ने तरुणाला बोलावलं अन् थेट खून!

चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद हुंदळेकर याचे कीर्तीकुमार कुट्रे यांच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणातून कीर्तीकुमारच्या मनात हर्षदविषयी राग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हर्षदला जाळ्यात ओढण्यासाठी आरोपीने ‘कमल खरात’ या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. या फेक आयडीवरून आरोपीने हर्षदशी मागील आठवडाभर चॅटिंग सुरू केली होती. शनिवारी रात्रीही याच फेक आयडीवरून हर्षदला पार्ले येथे भेटण्यासाठी बोलावण्यात आले. दरम्यान, हर्षद आपल्या एका मित्राला सोबत घेऊन पार्ले येथे पोहोचला. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर हर्षदला 'तू ए�

Address

Kavathe-Mahankal
416405

Telephone

+919420680090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahankali News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share