13/05/2025
#महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेश या दोन राज्यात तापीखोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी १९,२४४ कोटींचा भोपाळ येथे सामंजस्य करार
#महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शनिवारी तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासंदर्भात १९ हजार २४४ कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्टयात ५ लाख ७८ हजार एकराला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक काल भोपाळ येथे पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव, तसेच दोन्ही राज्यांचे जलसंपदा उपस्थित होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील खारपाणपट्ट्यामुळे पेयजल आणि सिंचनाच्या समस्या असलेल्या भागात मोठा लाभ होणार आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील खारीया गुटीघाट येथे ८.३१ टीएमसी क्षमतेचा वळण बांध बांधण्याचा प्रस्ताव आहे. बंधाऱ्यापासून सुमारे २२१ किमी एवढ्या लांबीचा उजवा कालवा व सुमारे २६० किमी एवढ्या लांबीचा डावा कालवा प्रस्तावित आहे. या कालव्यातून स्थानिक नद्या वाहत्या राहण्यासाठी पाणी सोडून पुर्नभरण करणे प्रस्तावित आहे. या संदर्भात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पाचा आ.डॉ.संजय कुटे यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला होता सदर प्रकल्पाचा सन २०१८ मधे हेलिकॉप्टर द्वारे जळगांव जामोद येथून लिडार सर्व्हे ही करण्यात आला होता.
#निर्भिड_स्वराज्य