
09/12/2024
भाजपच्या गुजराती नेत्याला
*■ 'ओरिजनल शिवसेना' का संपवायची आहे?* 🤔
ही सल आहे कुबेर नगरी हातातून निसटल्याची. ही सल आहे आंतराष्ट्रीय व्यापार उद्योग असलेल्या शहरावरील कब्जा गेल्याची. ही सल आहे आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेचा ताबा नसल्याची. १९६० ला जे जमलं नाही त्याचा बदला घेण्याची तयारी.
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत कधीही अखंड देश नव्हता. छोटी छोटी संस्थाने आणि थेट ब्रिटिश अंमलाखाली असलेले प्रांत मिळून स्वातंत्र्यानंतर आजचा 'भारत देश' अस्तित्वात आला. भारताची मूळची प्रांतीय स्वायत्तता कायम ठेवण्याचे वचन घटनेने लोकांना दिले होते. प्रांतांची निर्मिती कशी करावी यावर खूप चर्चा झाली. अखेरीस पंतप्रधान नेहरुंनी भाषावार प्रांत रचना करण्यास मान्यता दिली. त्यानुसार देशातील सगळे प्रदेश निर्माण झाले. मात्र गुजरात आणि महाराष्ट्र निर्माण करण्यावरुन मोठा वाद झाला.
मराठी भाषिक असूनही विदर्भ मध्यप्रदेशचा भाग होता, तो महाराष्ट्रात येण्यास अनुकूल नव्हता हे एक कारण. आणि मुंबई महाराष्ट्राला की गुजरातला द्यायची हे दुसरे कारण. शेवटी मराठी भाषिक विदर्भ प्रांत वगळून व गुजराथी भाषिक राजकोटच्या उत्तरेकडील प्रांत वगळून 'द्विभाषिक राज्य' निर्माण करण्यात आले. त्याची राजधानी मुंबई होती व मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई.
मराठी भाषिक जनतेला केंद्राचा हा निर्णय मान्य झाला नाही. दरम्यान यशवंतराव चव्हाण साहेबांना विदर्भातील जनतेची समजूत घालण्यात यश मिळाले. त्यांनी वैदर्भीय मराठी भाषिकांची मने जिंकली व विदर्भ महाराष्ट्रात सामील होण्यास तयार झाला. आता एकच वाद शिल्लक राहिला होता, मुंबई कोणाला द्यायची? महाराष्ट्राला की गुजरातला? दोघेही हक्क सांगत होते. त्यावेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून मोठी चळवळ सुरु झाली.
सेनापती बापट, भाई डांगे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, आण्णाभाऊ साठे, एस.एम. जोशी, अहिल्याबाई रांगणेकर आदी नेत्यांनी आंदोलन सुरु केले. तरीही गुजराथी लोक मुंबई सोडण्यास तयार नव्हते. अखेर आंदोलनाने उग्र रुप धारण केले. मुंबईत प्रचंड मोर्चे निघू लागले. एक मोर्चा फ्लोरा फाउंटन चौकात अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण मोर्चाने जोरदार मुसंडी मारली. मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला. या गोळीबारात १०५ मराठी मोर्चेकऱ्यांचे प्राण गेले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी ते हुतात्मा झाले. हाच फ्लोरा फाउंटन चौक आज 'हुतात्मा चौक' म्हणून ओळखला जातो. तेथे हुतात्म्यांचे भव्य स्मारक उभे केले आहे.
मोर्चावर झालेल्या अमानुष गोळीबाराने संपूर्ण देशात खळबळ माजली. आपल्या