27/07/2024
पाऊस म्हंटल की,आठवतात ते आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ आणि निसर्गरम्य ठिकाणे.पण एकदा काय पावसाने थैमान मांडायला सुरवात केली की आजुबाजुच्या परिस्थितीचा आढावा बघत असताना मन असं कासाविस होतयं..
महापुरासारखी बिकट अवस्था ही आपल्या दारापर्यंत येऊ नये म्हणुन प्रत्येकवर्षी विचार करणारा हा आपला पुरग्रस्त व्यक्ती..व काही पुर फक्त आमच्यासाठी एक मजा म्हणुन ठिकाण आहे,एवढाच काय तो फरक..
कारण स्वतःच्या उंबऱ्याला पाणी लागत नाही तोपर्यंत तर काय कळत नाही..
दाराला पाणी येणार या भितीने ती वाट बघत होती..आत्ता काय होणार माझ्या संसाराचं या विचाराने ती आवंडा गिळत होती..तिची परिस्थिती फक्त तिला माहित होती..कारण शेवटी पोटावरचं हात होतं,संसाराचा गाडा तिच्या हातात होता…सरकारचा आदेश आला स्थलांतराचा..आत्ता या वर्षी पोराला घेऊन कुठल्या जिल्हापरिषद शाळेत जाऊन रहायचं हाच विचार ती करत होती…उद्या पाणी वाढणार,सामान सगळं भरुन जायचं आत्ता..जे लागणारं नव्हतं ते सामान घराच्या माळावर टाकुन एक गोठडी पाटीला बांघुन पोराला घेऊन बाहेर पडली…घराचा कडीकोंयडा लावताना डोळ्यासमोर दिसणार पाणी आणि डोळ्यात भरलेलं पाणी काय वेगळं नव्हतं…कोण महापुराची चौकशी करत होतं…तर पाणी हे कधी जाणार ? याच विचाराने बाहेर पडत होता…रोज राबणार रोज खाणार मग आत्ता या महापुरातनं कसं सावरणार हाच विचार ती करत होती…
पै पै साठवुन तिने संसार उभा केला होता…तिचं लहान मुल नुकत्याचं जुन महिन्यात मिळाल्याला पुस्तक-पाट्या जाणार या विचाराने रडत होतं…बघता बघता दुसऱ्या दिवशी पाणी वाढलं घर पुर्ण महापुरात गेलं…
ते बघुन असचं वाटत होतं की आपल्या अडचणी या काहीच नाहीत..आपण या जगात सुखी आहोत.पण या पुरग्रस्त लोकांच काय..? पावसाचे दिवस यांना चांगले की वाईट ?
प्रत्येकवर्षी सरकार काय आव्हान देणार आहे हे काय दुसरं सांगायला नको…!!
पण महापुर का येतो धरणातील साचलेला गाळ,नद्यांची खोली,नदी पात्रातील अतिक्रमण,या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे…!
पण तीचा विचार थांबला नाही..ती प्रत्येकवर्षी एका वाघिणीसारखं उभी आहे..आपला संसार नीट आणि नेटका थाटात उभा रहायला..!!
✍️ बघा आबा