29/09/2025
मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले
भीषण पुरपरिस्थितीचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा कठीण समयी आपले उत्तरदायित्व म्हणून कोल्हापूर काँग्रेसने मदतीचे आवाहन केले होते. याला सामान्य नागरिकांपासून ते दानशूर व्यक्तींनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत उदारमताने जीवनावश्यक वस्तूरूपात मदत जमा केली.
आज जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले 28 वाहनांसहित काँग्रेस कार्यकर्ते कसबा बावडा येथील बहुशस्त्रधारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील , आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत मराठवाड्याकडे रवाना झाले.
यामध्ये 3200 जिवनावश्यक वस्तूंचे किट्स, 600 ब्लँकेट्स यासह प्रथोमोपचार साहित्य पाठवण्यात आले. परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये ही मदत वितरीत केली जाईल. यावेळी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, सचिन चव्हाण, राजू लाटकर, राहुल बजरंग देसाई, सरलाताई पाटील, भारतीताई पोवार, संतोष पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, गोकुळ, शेतकरी संघ, मार्केट कमिटीचे संचालक तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
सोमवार, दि. 29 सप्टेंबर, 2025 स्थळ- कसबा बावडा