02/04/2022
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्येय मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक 2022 चे ' वंचित बहुजन आघाडी ' चे अधिकृत उमेदवार प्राध्यापक शाहिद शहाजहान शेख यांच्या प्रचारार्थ रॅली व सभा कल्याणी हॉल , तोरस्कर चौक , जुना बुधवारपेठ कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केली होती . रॅलीची सुरवात सिद्धार्थनगर प्रवेशद्वारापासून जल्लोषात करण्यात आली . यावेळी सिद्धार्थनगर मधील तरुण व महीला आणि नागरीक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .