Indradhanu news

Indradhanu news News update in Kolhapur district Maharashtra

" कोल्हापूर जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान विभागाने गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृह इमारत कामात केली काम ...
24/05/2024

" कोल्हापूर जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान विभागाने गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृह इमारत कामात केली काम पूर्ण होण्या अगोदरच निधीची उचल,"

' सामाजीक कार्यकर्ते सर्जेराव खाडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली मागणी '

कोल्हापूर /प्रतिनिधी
गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह इमारत दुरुस्तीच्या कामात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारत दुरुस्ती कामाचे बील अगाऊ उचल करुन इमारत दुरुस्तीचे सुरु केले आहे,हे इमारत दुरुस्तीचे काम मनमानी पध्दतीने काम होत असलेबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव खाडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निराधार,अनाथ व समाजातील विशेष घटकातील मुलींचे किमान शिक्षण कायद्यानुसार शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी शासनाने राज्यभरात अनेक ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह सुरू केली आहेत.आज अनेक निराधार मूली या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून शिक्षण घेऊन सक्षम व स्वावलंबी बनल्या आहेत.गगनबावडा येथे ही शासनाने निराधार बालिकांसाठी कस्तुरबा गांधी विद्यालय सुरु केले आहे.मात्र हे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शासनाचा निधी लाटण्याचे कुरण बनले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गगनबावडा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण असल्यामुळे येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे वस्तीगृह दुरुस्ती करणे गरजेचे आहे,नेमका याच गोष्टीचा फायद्या घेत जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान विभागाने गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय दुरुस्तीसाठी सत्तर लाखाच्या वरती निधीची तरतुद केली आहे,जिल्हा परिषद सर्व शिक्षा विभागाने या इमारत दुरुस्ती कामाची निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदाराना इमारत दुरुस्तीचे काम देऊन प्रत्यक्ष का पूर्ण होण्या अगोदर इमारत दुरुस्तीच्या कामाचे बिल उचल केले आहे.
त्यामुळे गगनबावडा कस्तुरबा गांधी विद्यालय वस्तीगृह दुरुस्तीचे काम मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शासन नियम धाब्यावर बसवून गगनबावडा येयील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वस्तीगृह दुरुस्ती कामाचे बिल उचल केलेल्या प्रकरणाची चौकशी करून सर्व शिक्षा अभियान विभागाने सुरू केलेल्या इमारत दुरुस्तीच्या कामाचे सक्षम अधिकाऱ्यांच्या मार्फत सामाजिक लेखापरिक्षण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे सर्जेराव खाडे यांनी जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

' गगनबावडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला बळ देण्यासाठी स्वप्नील शिंदे' यांच्या नेतृत्वाची गरज 'सर्जेराव खाडे/गगनबावडा...
18/08/2023

' गगनबावडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला बळ देण्यासाठी स्वप्नील शिंदे' यांच्या नेतृत्वाची गरज '

सर्जेराव खाडे/गगनबावडा

कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांचा बाले किल्ला असणाऱ्या गगनबावडा तालुक्यात,तालुक्यातील इतर पक्ष व गटांचे अस्तित्व हे काँग्रेसच्या बळकटीकरणानंतर नावापूरते उरल्याचे वास्तविक चित्र पहायला मिळते.देशात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपचे अस्तित्व गगनबावडा तालुक्यात हे काही मोजक्या व्यक्तींच्या नावानेच टिकून आहे,यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते नंदकुमार पोवार, तालुका अध्यक्ष संदीप पाटील,शशांक पारगांवकर,अनिल पडवळ,अर्जून पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्या मेघाराणी जाधव व इतर नव्याने जोडलेल्या कार्यकर्त्यांपूरते मर्यादित आहे.वास्तविक तालुक्यात सतेज पाटील गट,पी.जी.शिंदे गट व माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा गट असे राजकारणाचे चित्र पहायला मिळते.
सन २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीनंतर तालुक्यातील राजकारण बदलाच्या दिशने बदललेले दिसते,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सतेज पाटील गटाची सत्ता आल्यानंतर व त्या नंतर बदलेल्या जिल्ह्यातील राजकीय समिकरणानंतर गगनबावडा तालुक्यातील राजकारणही बदलले व त्यानंतर तालुक्यातील इतर राजकीय पक्ष व गटांना उतरती कळा लागल्याचे दिसून येते.
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या सतेज पाटील गटाला शह देण्यासाठी सध्या देशातील सत्तेतील व एक नंबरचा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भारतीय जनता पार्टी पक्षाला गगनबावडा तालुक्यात आपले आस्तित्व टिकवणे महत्वाचे ठरणार आहे,मागील जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी गगनबावडा तालुक्याचे स्वाभिमानी नेतृत्व म्हणून ओळख असणारे पी.जी. शिंदे यांनी भाजप पक्षात प्रवेश करुन गगनबावडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पक्षाला बळ दिले होतो,मात्र जिल्ह्यातील बदलत्या राजकारणामुळे पी.जी.शिंदे यांना भाजप पासून फारकत घ्यावी लागली,त्यामुळे तालुक्यात नगण्य अस्तित्व असणारा भाजप पक्ष एकाकी पडल्याचे पहायला मिळते.
गगनबावडा तालुक्यात नावापूरता अस्तित्वात असणारा व काही व्यक्तींच्या व्यक्तीत्वामुळे टिकून असणाऱ्या भाजप पक्षाला उर्जित आवस्था येण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचा विरोधी गट असणाऱ्या पी.जी.शिंदे गटाशी संधान बांधणे महत्वाचे ठरणार आहे.
मोजकेच कार्यकर्ते,मजबूत संघटनेचा अभाव असणाऱ्या गगनबावडा तालुका भारतीय जनता पार्टी ला बळ येण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यता आहे,अप्रत्यक्ष पी.जी.शिंदे गटाशी सलग्न दिसून येणाऱ्या गगनबावडा भाजप पक्षाला तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांच्या तालुका अध्यक्ष पदावरुन पाय उतार झाल्यानंतर बळकटी येण्यासाठी व आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पी.जी.शिंदे गटाशी संधान बांधून पक्ष मजबूत करणे आवश्यक बनले आहे,त्यासाठी पी.जी.शिंदे गटाचे शिल्लेदार असणारे स्वप्नील शिंदे यांना गगनबावडा तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पक्ष बळकट करणे हाच गगनबावडा तालुका भाजप पुढे पर्याय उरला आहे. त्यामुळे स्वप्नील शिंदे यांना गगनबावडा तालुका भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास भाजप पक्ष बळकट होण्यास मदत मिळणार आहे.
सध्या जरी पी.जी.शिंदे गट हा भाजप पक्षाशी सलग्न नसला तरी स्वप्नील शिंदे यांच्या माध्यमातून व त्यांना भाजप पक्षाचे नेतृत्व दिल्यास भाजपाला गगनबावडा तालुका काँग्रेस पक्षास टक्कर देण्यासाठी व आपले तालुक्यात आस्तित्व टिकविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.त्यामुळे गगनबावडा तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाला बळकटी येण्यासाठी स्वप्नील शिंदे यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे दिसून येते.
जिल्हयातील भारतीय जनता पार्टी पक्षाची जिल्हा कार्यकारणीतील फेर बदला नंतर गगनबावडा तालुक्यातील भाजप पक्षाच्या नेतृत्वात बदल होणार असल्यामुळे प्रत्यक्ष भाजप पक्षाशी संबध नसणाऱ्या स्वप्नील शिंदे यांचे नाव गगनबावडा भाजपा तालुका अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये अघाडीवर आहे,त्यामुळे पक्ष बळकटीकरणासाठी गगनबावडा तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाला स्वप्नील शिंदे या सक्षम नेतृत्वाचाच पर्याय उरला आहे................................................................

प्रभावी वक्तृत्व,जनमाणसात मिसळण्याची अलौकीक प्रतिभा असणारे भाजपचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांनी आपल्या काही सवंगडयांना घेऊन गगनबावडा तालुक्यात दोन व्यक्तींपूरता मर्यादा असणारा भाजप पक्ष,भाजपचे विकासाचे धोरण व अनेक योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडत तालुक्यात भाजप पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण केली,आज स्वप्नील शिंदे सारखा मातब्बर नेता भाजपकडे ओढून अप्रत्यक्ष शिंदे गटच भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे,त्यामुळे संदीप पाटील यांना तालुकाध्यक्ष पदावरून पाय उतार झाल्यानंतर जिल्हास्तरावर नवीन जबाबदारी देऊन पाटील यांची भाजपशी असणारी बांधिलकी जपण्यासाठी व स्वप्नील शिंदे यांना गगनबावडा तालुका भाजपा अध्यक्ष करण्यासाठी जिल्हास्तरावरील नेत्यांसमोर एक महत्वाचा निर्णय व महत्त्वाची भूमिका ठरणार आहे....................................................................

' जिल्हयातील भूस्खलनग्रस्त गावांच्या यादीतून टेकवाडीला वगळले, प्रशासनाच्या या भूमिकेविषयी टेकवाडी गावच्या ग्रामस्थांत ना...
27/07/2023

' जिल्हयातील भूस्खलनग्रस्त गावांच्या यादीतून टेकवाडीला वगळले, प्रशासनाच्या या भूमिकेविषयी टेकवाडी गावच्या ग्रामस्थांत नाराजी '

सर्जेराव खाडे/ गगनबावडा

पूणे जिल्हयातील माळीण दुर्घटनेनंतर शासनाने डोंगर खपारीच्या पायथ्याशी वसलेल्या आणि भुस्खलनाचा धोका असणाऱ्या राज्यातील अनेक गावांचे सर्व्हेशन करुन धोका असणाऱ्या गावांचे पूनर्वसन करण्याचा निर्णय घेऊन तशी अमंलबजावणी केल्याचे दिसून येते,मागील आठवडयामध्ये रायगड जिल्हयातील इर्शाळवाडी गावात माळीण सारखी दुर्घटना घडून अनेक लोक मृत्युमुखी पडले तर आणखीन काहींचा शोध लागलाच नाही,त्यामुळे पून्हा राज्यामध्ये माळीण,इर्शाळवाडी सारखी दुर्घटनेची पूनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासन जागे झाले आहे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील संभाव्य धोका असणाऱ्या गावांची यादी करून खबरीदारी घेण्यासाठी धोकादायक गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु असून तशी कार्यवाही झाल्याचे चित्र दिसून येते.
कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ७६ गावांची यादी नुकतीच प्रशासनाकडून जाहीर करुन अशा संभाव्य धोकादायक गावांच्या बाबतीत खबरदारी घेण्यासाठी यंत्रणा निर्माण केली आहे,यामध्ये तहसिलदार,मंडलअधिकारी,तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांचा समावेश करून धोकादायक गावांवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर जिल्हयातील डोंगर खचून धोका उदभवू शकतो अशा ७६ गावांची यादी करून स्थानिक प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
दरवर्षी महापूरासारख्या आपत्तीचा सामना करणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील भूस्खलनग्रस्त टेकवाडी गावच्या सुरक्षेकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे,प्रशासनाने गगनबावडा तालुक्यातील भुस्खलनाचा फटका बसलेल्या अणदुर रस्ता,कडवे रस्ता,मांडूकली,शेळोशी रस्ता यांचा संभाव धोकादायक गावांच्या यादीमध्ये समावेश केला आहे,परंतु दरवर्षी हळूहळू भुस्खलन सुरु असणाऱ्या टेकवाडी गावाला मात्र शासनाच्या संभाव्य धोका असणाऱ्या यादीतून वगळले आहे,वास्तविक पाहता टेकवाडी गाव ज्या टेकडीवर वसले आहे,त्या टेकडीच्या नैसर्गीक दरडींचे दरवर्षी पावसाळ्यात भूस्खलन होत आहे, त्यामुळे साधारणतः अडीशे लोकसंख्या असणाऱ्या या टेकवाडी गावचे अस्तित्व धोक्यात आले आहे,त्यामुळे शासनाने टेकवाडी गावच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात टेकवाडी गावाला पूराचा वेडा पडून बेटाचे स्वरुप प्राप्त होते,गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर गावचा इतरांशी संपर्क तुटतो,त्यामुळे टेकवाडी गाव हे महापूराच्या काळात बेटाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे अडचणीत सापडते. गावाभोवती पूराचे पाणी ही परिस्थिती प्रत्येक वर्षी साधारणतः तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ राहते,अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात गावच्या दक्षिण व पश्चिम बाजूने भूस्खलन झाल्यास टेकवाडी गाव मोठ्या अडचणीत सापडण्याची भिती ग्रामस्थांच्या पसरली आहे,त्यामुळे प्रशासनाने इतर भूस्खलनग्रस्त गावांप्रमाणे टेकवाडी गावाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे बनले आहे,त्याचप्रमाणे टेकवाडी गावच्या रखडलेल्या पूनर्वसनाच्या प्रश्नाबरोबर भुस्खलन होण्याऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून टेकवाडीला कायमचे संरक्षण देण्याची मागणी होत आहे.
............................................................................

प्रतिक्रिया
आमच्या पूरग्रस्त व भूस्खलनग्रस्त टेकवाडी गावच्या पूनर्वसनाच्या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात टेकवाडी गावचे पूनर्वसन करावे.

रमेश खाडे,ग्रामस्थ.........................................................................

निवेदने,आंदोलने या लोकशाही मार्गाने टेकवाडी गावचे पूनर्वसन व्हावे यासाठी आमचा सातत्याने पाठपूरावा सुरु आहे, शासनाने आमच्याटेकवाडी गावचे लवकरात लवकर पूनर्वसन व्हावे, पूर व भूस्खलन या संकटातून आमची कायमची सुटका करावी.

विनायक खाडे, ग्रामस्थ..........................................................................

पिढयां पिढया महापूराचा सामना आमच्या अनेक पिढ्यांनी केला आहे,आमच्या काळात आम्ही केलेल्या पूनर्वसनाच्या मागणीच्या लढयाला यश येण्यासाठी शासनाने आता तरी प्रयत्न करावे,आमची घरकुलासह पूनर्वसनाची मागणी पूर्ण करावी.

शंकर गिरजाप्पा खाडे,ग्रामस्थ............................................................................

टेकवाडी पूनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी मांडून आम्ही त्यासाठी सांविधानिक मार्गाने लढत आहोत,तरी शासनाने टेकवाडी गावच्या संघर्षाला साथ शाश्वत पूनर्वसनाची मागणी पूर्ण करावी.

सरदार खाडे, स्थानिक प्रतिनिधी...........................................................................

' टेकवाडी गावची इर्शाळवाडी होण्याची प्रशासन वाट पाहते का?'टेकवाडीला पूराचा वेढा पडूनही प्रशासनाचे दूर्लक्ष '' भूस्खलनाचा...
23/07/2023

' टेकवाडी गावची इर्शाळवाडी होण्याची प्रशासन वाट पाहते का?
'टेकवाडीला पूराचा वेढा पडूनही प्रशासनाचे दूर्लक्ष '
' भूस्खलनाचा धोका आजही कायम '

गगनबावडा/प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हयामधील विशेष आपत्तीग्रस्त गाव म्हणून गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गावाला ओळखले जाते,
दरवर्षी पावसाळ्यात टेकवाडी गावाला पूराचा वेढा पडून बेटाचे स्वरुप प्राप्त होते,त्यामुळे टेकवाडी गावचा इतरांशी संपर्क तुटतो, त्यामुळे टेकवाडी गाव अडचणीत सापडते,महापूरामुळे अनेक पिढ्यांपासून त्रस्त असणाऱ्या टेकवाडी गावाला महापूराबरोबर भूस्खलन या समस्येचा सामना करावा लागत आहे.
गेल्या चार दिवसापासून टेकवाडी गावाला पूराचा वेढा पडून व मागील आठवड्यात टेकवाडी गावच्या दक्षिण बाजूला झाड कोसळून भूस्खलन होऊनही तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील घटनेनंतर जिल्हाअधिकारी राहूलवार रेखावार यांनी प्रशासनाला भुस्खलनग्रस्त गावांकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश देऊन गगनबावडा तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
कुंभी सरस्वती नदीच्या संगमापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर कुंभी नदीच्या तीरावर वसलेल्या टेकवाडी गावाला दरवर्षी पावसाळ्यात पूराचा वेढा पडून बेटाचे स्वरूप प्राप्त होते. त्याचबरोबर मागील काही वर्षापासून टेकवाडी गावाला भूस्खलनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून गावच्या पश्चीम व दक्षिण बाजूचे भूस्खलन आजही सुरु आहे, त्यामुळे पूणे जिल्ह्यातील माळीण दुघर्टनेनंतर टेकवाडी ग्रामस्थांची टेकवाडीचे शाश्वात पूनर्वसन व्हावे ही मागणी जोर धरत आहे,पूनर्वसनाच्या मागणीसाठी टेकवाडी गावचे प्रतिनिधी सर्जेराव खाडे ग्रामस्थांच्या मदतीने सातत्याने पाठपूरावा करत आहेत,मागील महिन्यात टेकवाडी ग्रामस्थांनी आपल्या पूनर्वसनाच्या मागणीसाठी मंत्रालयात धाव घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनता दरबारामध्येही पूनर्वसनाच्या मागणीसाठी टेकवाडी गावकऱ्यांची बाजू मांडली.मात्र आज टेकवाडी गावाला पूराचा वेढा पडूनही व गावच्या दक्षिण व पश्चिम बाजूला हळूहळू सुरु असणारे भूस्खलन या गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे टेकवाडी गावची इर्शाळवाडी झाल्यावर प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न टेकवाडी ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
जिल्हाअधिकारी अधिकारी राहूल रेखवार यांनी टेकवाडी गावच्या पूनर्वसनाच्या मागणी बरोवर सद्यस्थितीत महापूरामुळे टेकवाडी गावासमोर निर्माण झालेल्या समस्येवकडे विशेष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
.............................................................................
महत्वपूर्ण

" टेकवाडी ग्रामस्थांनी नाकारली यांत्रिक बोट "

दरवर्षी पावसाळ्यात टेकवार्ड गावच्या भोवतीने पूराचा वेढा पडून बेटाचे स्वरुप प्राप्त होते,त्यामुळे ग्रामस्थांना आपत्तीच्या वेळी गावाबाहेर पडता यावे,यासाठी प्रशासनाकडून यांत्रिक बोटीची सोय केली जाते, यावर्षी आपत्तजन परिस्थितीत ग्रामस्थांच्या सोयी प्रशासनाने टेकवाडी ग्रामस्थांसाठी नवीन यांत्रिक बोटीची सोय केली होती,मात्र प्रशासनाचे टेकवाडी गावच्या पूनर्वसनाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तसेच प्रशासन हे महापूराच्या काळातच जागे होत असल्याच्या कारणामुळे जिल्हा प्रशासनाने टेकवाडी गावाला देऊ केलेली यांत्रिक बोट ग्रामस्थांनी नाकारली........................................................................

"निवडे साळवण बाजारपेठेत उध्दभवतेय वाहतुक ठप्पची समस्या," ' गगनबावडा पोलिसांचे या समस्येकडे दुर्लक्ष 'साळवण / प्रतिनिधीको...
25/05/2023

"निवडे साळवण बाजारपेठेत उध्दभवतेय वाहतुक ठप्पची समस्या," ' गगनबावडा पोलिसांचे या समस्येकडे दुर्लक्ष '

साळवण / प्रतिनिधी

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वसलेली गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवण बाजारपेठ ही गगनबावडा तालुक्याचे मध्यवर्ती व प्रमुख व्यापाराचे केंद्र आहे,साळवण बाजारपेठ चौकामध्ये अस्ताव्यस्त वाहन पार्कींग मुळे या ठिकाणी वाहतुक ठप्प होण्याची समस्या रोजच उद्भवत असल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.हाकेच्या अंतरावर असलेल्या साळवण पोलिस चौकीतील पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे,लोकसंख्येच्या दृष्टीने छोटा असलेल्या गगनबावडा तालुका हा दुर्गम खोऱ्यामध्ये वसला आहे.
निवडे-साळवण बाजारपेठ ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे या बाजारपेठेमध्ये खरेदी विक्री साठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.निवडे बाजार पेठेतील मुख्य चौकात नेहमीच अस्ताव्यस्त वाहन पार्कींगमुळे वाहतुक ठप्प होत आहे.या ठिकाणी वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुक नियंत्रकाची आवश्यकता आहे,गगनबावडा पोलिस ठाण्यातील वाहतुक नियंत्रक म्हणून जबाबदारी असणारे पोलिस कर्मचारी आठवड्यातून एकच दिवस या ठिकाणी फक्त एक-दोन तासांपूरतीच हजेरी लावतात.इतर वेळी या ठिकाणी वाहतुक व्यवस्था नियंत्रीत ठेवण्यासाठी वाहतुक नियंत्रक हजर राहत नसल्यामुळे दिवसभरात अनेक वेळा वाहतुक ठप्प होण्याची समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे वाहनधारक,नागरिक व व्यापारी वर्गाला या समस्येचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे गगनबावडा पोलिसांनी निवडे साळवण बाजारपेठेत निर्माण होणाऱ्या वाहतुक ठप्प या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

" पूलाच्या बांधकामासाठी स्मशानशेड केले गायब,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जपली ठेवेदारांविषयीची लागेबंधी "'ग...
12/03/2023

" पूलाच्या बांधकामासाठी स्मशानशेड केले गायब,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जपली ठेवेदारांविषयीची लागेबंधी "

'गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील प्रकार,ग्रामपंचायत प्रशासनाचा अधिकार डावलून सुरू केले पूलाचे बांधकाम'

गगनबावडा/प्रतिनिधी (सर्जेराव खाडे)

गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील डोंगर वाटेतील पूलाच्या बांधकामासाठी स्मशानशेड पाडल्याची चर्चा जोरात असून ग्रामस्थांचा विरोध डावलून पूलाचे बांधकाम सुरु केल्यामुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे,गावातील स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचने असंडोली ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच ठेकेदाराने पूलाचे बांधकाम सुरु केले असून सध्या ते पूर्णत्वाकडे आले आहे.
गावातील जुने झालेले व वापर नसलेले स्मशानशेड गावकऱ्यांना विचारात न घेता पाडल्यामुळे गावातील अनेक नागरिकांच्यात नाराजी पसरली आहे,गावात स्मशानशेड बांधकामासाठी सध्या पूलाचे बांधकाम सुरू असलेली जागा सोडल्यास ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने नवीन स्मशानशेड बांधकामासाठीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगितले जात आहे.
स्वतंत्र्य स्मशानशेड बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यास गावकऱ्यांची अडचण सोडविण्यासाठी गावातील एका प्रतिष्ठ नागरिकांने स्वतःच्या मालकीची जागा स्मशानशेड साठी बक्षीसपत्र करुन देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती असंडोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमित पाटील यांनी दिली.
असंडोली येथील डोंगर वाटेतील शेतीक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम सुरु असणारा पूल हा काही शेतीकरी वर्गाच्या सोयीसाठी असला तरी ग्रामपंचायतीची पूलाचे बांधकाम सुरु करण्याविषयीची परवानगी व ग्रामस्थांना विश्वासात न घेता सुरु केलेल्या कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची ठेकेदाराशी असलेली लागेबंधी उघड झाली आहे.
गावपातळीवरची प्रमुख प्रशासन व्यवस्था असणारी ग्रामपंचायत व या ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्यांच्या अधिकार,प्रतिष्ठेला तीळमात्रही विचारात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांशी असल्याले हीत संबध जपण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जावून काम करत असल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविषयी शंकेची झोळ उठली आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारवर अकुंश ठेवण्याबरोबर स्थानिक प्रशासन व्यवस्थेचा अवमान करण्याऱ्या अधिकारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे..............................................................................

प्रतिक्रिया

गावात वाढीव विकास काम होत असल्याचा आनंद आहे,मात्र ग्रामपंचायत व गावगाडा चालविण्याऱ्या गावच्या प्रमुख मंडळींना विश्वास न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या बांधकामाबाबत शंका असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांने मनमानी करत ग्रामपंचायत व सरपंच,सदस्य मंडळाच्या अधिकाराचा अवमान केला आहे,त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने या कामाची चौकशी करुन ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता काम सुरू केले कसे ? या प्रकरणाची चौकशी करून संबधीतांवर कारवाई करावी.

चंद्रकांत सुतार,उपसरपंच,ग्रा.प.असंडोली..............................................................................
असंडोली येथील स्मशानशेड पाडून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीची परवानगी न घेता सुरू केले पूलाचे बांधकाम

"समाजाला नवी दिशा देणारे लोकचं यशस्वी होतात", गगनबावड्याचे तहसिलदार डॉ.संगमेश कोडे यांचे प्रतिपादन,'गुरुवर्य यशवंतराव पा...
17/09/2022

"समाजाला नवी दिशा देणारे लोकचं यशस्वी होतात", गगनबावड्याचे तहसिलदार डॉ.संगमेश कोडे यांचे प्रतिपादन,

'गुरुवर्य यशवंतराव पाध्ये गुरुवर्य सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न'

गगनबावडा/प्रतिनिधी
समाजाला नव्या संकल्पना देऊन त्या कृती आणणारे लोकचं समाजाला नवी दिशा देतात व यशस्वी जीवनाची वाटचाल करतात असे प्रतिपादन,तहसिलदार डॉ.संगमेश कोडे यांनी केले.
ते गगनबावडा येथील यशवंतराव पाध्ये शैक्षणिक सांस्कृतिक धर्मादाय संस्थेच्या वतीने आयोजित आदर्श गुरुवर्य पूरस्कार सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थांनी सरपंच मानसी कांबळे उपस्थित होत्या.
डॉ संगमेश कोडे पुढे म्हणाले की,शैक्षणिक क्षेत्रात नवीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी व समाजाला प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याची यशवंतराव पाध्ये धर्मादाय संस्थेची १७ वर्षाची परंपरा ही समाजाला दिशादर्शन करणारी आहे.
स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील २५ टक्के हिस्सा हा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी व स्वतःच्या वडिलांच्या नावाने पूरस्कार देऊन आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याची गगनबावड्यातील पाध्ये कुटूंबाची परंपरा समाजासमोर आदर्शवत असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष नंदकुमार पोवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून गूणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य करणारे प्राथमिक शिक्षक विश्वास भोसले व माध्यमिक शिक्षक संभाजी लव्हटे यांना तहसिलदार डॉ.संगमेश कोडे यांच्या हस्ते आदर्श गुरुवर्य पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर वैशाली निंबाळकर यांना प्रेरणा पूरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून पूरस्कार प्राप्त झाले बद्दल तहसिलदार डॉ.संगमेश कोडे यांचा यशवंतराव पाध्ये धर्मादाय संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्रीकृष्ण पाध्ये यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक माजी गटशिक्षण अधिकारी ए.बी.पाटील यांनी केले.
रामचंद्र साधले,वैदेही पाध्ये,विश्वास भोसले,संभाजी लव्हटे,वैशाली निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यशवंतराव पाध्ये आदर्श गुरुवर्य पूरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी तहसिलदार संगमेश कोडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण ) नंदकुमार पोवार, सरपंच मानसी कांबळे,माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक संघाचे संचालक एस.आर.चौकेकर, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक पी.जी.वरेकर,तंटामूक्त समिती अध्यक्ष भगवान सावंत,रामचंद्र कुपले,माजी सरपंच विश्वनाथ पोतदार,यशवंतराव पाध्ये धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाध्ये,सचिव वृंदा पाध्ये,वैष्णवी पाध्ये,अरुणा पोतदार,प्रणाली सावंत,सरिता सुर्यवंशी,वृषाली नागावकर आदीसह शिक्षक,विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.
सुत्रसंचलन सिंधू तांदळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक दिपक घाटगे यांनी मानले.

"ग्राहकांनीही आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी,"निवृत्त न्यायाधीश ॲड.शशिकला पाटील यांचे प्रतिपादनकोल्हापूर / प्र...
05/06/2022

"ग्राहकांनीही आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी,"
निवृत्त न्यायाधीश ॲड.शशिकला पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर / प्रतिनिधी

ग्राहकांची फसवणूक झाल्यास अथवा त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्यास ग्राहकांना वेळेत आणि योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे. ग्राहकांनीही आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी ग्राहकांनी डोळस असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्राहक न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश ॲड.शशिकला पाटील यांनी केले.
ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत ॲड. पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विश्वनाथ पोतदार होते.
ग्राहक संरक्षण कायदा मोठा आहे. याबाबत ग्राहकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे काम सर्वसामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच सुरू आहे. हे स्पष्ट करून ॲड पाटील पुढे म्हणाल्या ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक कोठेही पुराव्यासह तक्रार दाखल करू शकतो. जर तक्रारदार अनेक असतील तर कमिशनरची परवानगी आवश्यक असते. ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू खराब लागल्यास दोन वर्षाच्या आत करावी लागते. तसेच वस्तूची गॅरंटी वॉरंटी याबाबतची माहिती घ्यावी. ग्राहक न्यायालयात तक्रारदाराने आपली केस स्वतः दाखल करावी. हाच ग्राहक संरक्षण कायद्याचा उद्देश आहे. मात्र टेक्निकली प्रश्ना संबंधित तक्रार असेल तर वकील द्यावा लागतो.ग्राहकांना वेळेत आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे. यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशनने दक्ष रहावे. यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन ला मी नेहमीच सहकार्य करेन. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांची होणारी फसवणूक, याबाबत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल कशी करावी, आणि ग्राहकांना न्याय मिळेपर्यंत ग्रहक न्यायालया ची प्रक्रिया कशी चालते याबाबत ॲड पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्राहक कल्याण फाउंडेशन ताकतीने उभा राहिले असून सर्व कार्यकर्ते संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करत आहेत. ही कौतुकास्पद बाबा आहे.

यावेळी पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विषय पटलावरील विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
बैठकीस ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाउपाध्यक्ष भास्कर चंदनशिवे, दीपक बंडगर, कार्यवाह सर्जेराव खाडे, सचिव तानाजी पाटील, उमेश विभुते, सुषमा पाटील, अरुणा पोतदार, दिपाली पाटील, मारुती देवाळकर, बंडा मांगोरे, मानसिंग पाटील, यांच्यासह सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, कार्यवाह सचिव उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्राहक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड. शशिकला पाटील, दिपाली पाटील, अरुण पोतदार, संयोगिता देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

"गगनबावडा तालुक्यातील निवडे येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'...
15/09/2020

"गगनबावडा तालुक्यातील निवडे येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ"

साळवण /प्रतिनिधी
जनतेच्या सहभागातून कोवीड मूक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेली 'माझे कुटूंब माझी जबाबदारी ' ही मोहिम गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.
ते निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या करण्यात आला.
या मोहिमे अंतर्गत १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत मोबाईल अॅपद्वारे आरोग्य पथकामार्फत प्रत्येक नागरिकाची माहीती घेतली जाणार असून ही मोहिम दोन टप्यात राबविली जाणारे आहे.गगनबावडा तालुक्याच्या ३८८७७ लोकसंख्येसाठी ७७७५ कुटुंबे असून यासाठी एकूण ३० पथके तयार केली आहेत, या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व सरपंच कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अजयकुमार गवळी यांनी दिली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, गगनबावडा पंचायत समिती सभापती संगिता पाटील,तालुका आरोग्य अधिकारी अजयकुमार गवळी,सामाजिक कार्यकर्ते दादू पाटील, माजी सरपंच सहदेव कांबळे,आरोग्य विस्तार अधिकारी विजय सावंत,अर्जुन इंगळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक अरुण मेथे,आनंद काळे,परचारिका आय.व्ही.पुजारी आदीसह आरोग्य सेवक,आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
.............................................................

"निवडेत इम्युनिटी बूस्टरचे वाटप,जोतिर्लिंग तरुण मंडळाचे आयोजन"साळवण/प्रतिनिधी    निवडे(ता.गगनबावडा) येथील बाजारपेठ नवीन ...
29/08/2020

"निवडेत इम्युनिटी बूस्टरचे वाटप,जोतिर्लिंग तरुण मंडळाचे आयोजन"

साळवण/प्रतिनिधी

निवडे(ता.गगनबावडा) येथील बाजारपेठ नवीन वसाहत येथे सिद्धगिरी मठ कणेरी व जोतिर्लिंग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर ग्रामस्थांना इम्युनिटी बूस्टर डोसचे वाटप करण्यात आले.
झम्यूनिटी बूस्टरच्या माध्यमातून ग्रामस्थांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी व कोरोना मरामारी संकटाचा सामना करता यावा,या उद्देशाने तरुण मंडळाच्या वतीने इम्युनिटी बूस्टर डोसचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माजी जि.प.सदस्य बबनराव खुटाले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी दोनशेच्यावर ग्रामस्थांना इम्यूनिटी बूस्टर डोसचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सिद्धगिरी मठाचे प्रतिनिधी अनिल पडवळ यांनी सद्यपरिस्थितीमध्ये इम्यूनिटी बूस्टर डोसचे असणारे महत्व उपस्थित ग्रामस्थांना विशद करून सांगितले.
इम्यूनिटी बूस्टर डोस वाटप कार्यक्रमप्रसंगी माजी जि.प.सदस्य बबनराव खुटाले,उपसरपंच बाबासाहेब तरटे,ग्रा.प.सदस्य महादेव लोखंडे,संगिता पोवार,यूवा नेते शिवाजी राऊत,शहाजी सूतार,तरुण मंडळाचे अध्यक्ष अमर जाधव,उपाध्यक्ष संग्राम देशामाने,सचिव श्रीकांत पाटील,खजानिस ओंकार बोडके,भाजपा तालुकाध्यक्ष संदिप पाटील,सरचिटणीस शशांक पारगांवकर,पांडूरंग कोलके,अमर कांबळे,अजित राऊत,यासिन शेख आदीसह ग्रामस्थ,तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

"माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर यूवक काँग्रेसच्या वतीने असळज परिसरात वृक्ष लागवड"साळवण /...
21/08/2020

"माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर यूवक काँग्रेसच्या वतीने असळज परिसरात वृक्ष लागवड"

साळवण / प्रतिनिधी
देशात विज्ञान तंत्राचा वापर करत संगणीकरणाची ओळख करुन देणारे भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी आधुनिक भारताच्या विकासाचा पाया रचला असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बयाजी शेळके यांनी व्यक्त केले.
ते असळज (ता.गगनबावडा) येथे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड व वृक्ष वाटप कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री सतेज पाटील व यूवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवड व वृक्ष वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे,या वृक्षारोपण मोहिमेच्या निमित्ताने कोल्हापूर यूवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बयाजी शेळके व कार्यकर्त्यांच्या हस्ते असळज,वेसरफ,पळसंबे परिसरात वृक्ष लागवड करुन ग्रामस्थांना वृक्षाचे वाटप करण्यात आले.
या वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूर यूवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बयाजी शेळके,संतोष पाटील,नंदकुमार पाटील,काशिनाथ कांबळे,गुरुनाथ पाटील,यश पाटील,महेश धावडे,अमोल पाटील,सचिन पाटील,दिलीप पाटील,चेतन कांबळे,विवेक जाधव, पुष्पक पाटील,विकास पाटील व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

"पोहाळेच्या नवनाथ हायस्कूलने आरोग्य सेविकेच्या हस्ते ध्वजारोहन करून केला कोरोना योद्धांचा सन्मान"                 कोल्हा...
15/08/2020

"पोहाळेच्या नवनाथ हायस्कूलने आरोग्य सेविकेच्या हस्ते ध्वजारोहन करून केला कोरोना योद्धांचा सन्मान"


कोल्हापूर/प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य सेवेत जीवाची बाजी लावून कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविकेच्या हस्ते ७४ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहन करून पोहाळे (ता.पन्हाळा) येथील नवनाथ हायस्कूल ने खऱ्या अर्थाने कोरोना योध्दांचा सन्मान केला आहे.
पोहाळे आरोग्य उपकेद्रामध्ये आरोग्यसेविका म्हणून सेवा बजाविणाऱ्या डी.बी.पाटील यांच्या हस्ते नवनाथ हायस्कूल विद्यालयाचे ध्वजारोहन तर आशा स्वयंसेविका उषाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करुन ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच आरोग्यसेविकेला राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन करण्याचा मान देऊन पोहाळेच्या नवनाथ हायस्कूलने कोरोना योध्दांचा सन्मान करण्याचा मान मिळविलेला आहे.
ध्वजारोहन समारंभ प्रसंगी कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी दक्षता बाळगून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य सेविका डी.बी.पाटील यांनी केले.
ध्वजारोहन समारंभास उपस्थित मान्यवरांना विद्यालयाच्या वतीने भैरवनाथ शिक्षण संस्थचे संस्थापक संभाजी पाटील व अध्यक्ष बाळू जाधव यांच्या हस्ते पूस्तके भेट म्हणून देण्यात आलीत.
ध्वजारोहन समारंभास श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक संभाजी पाटील मोहरेकर,अध्यक्ष बाळू जाधव,उपाध्यक्ष विश्वास काटकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल चौगुले,उपाध्यक्ष बाळकृष्ण पोवार,मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे,सहाय्यक शिक्षक संजय नवाळे,सावंत,मगदुम,दिपक क्षीरसागर,संगिता बने,अस्मिता पाटील,प्रविण वसावे,सामाजिक कार्यकर्ते अंबादास दळवी,सई निकाडे,आशा स्वंयसेविका प्रेमला मोरे,मनिषा मोरे,रत्नाबाई मोरे आदीसह आरोग्य सेविका,आशा स्वंयसेविका,विद्यालयाचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
सुत्रसंचलन परशराम आंबी यांनी केले तर आभार
मारुती गोडसे यांनी मानले.

Address

Kolhapur
MAHARASHTRA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indradhanu news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share