23/06/2024
साहित्य हा राष्ट्राचा एक अमोल सांस्कृतिक ठेवा असतो. त्याचे जतन करणे हे अर्थातच त्या राष्ट्राचे एक आद्य कर्तव्य ठरते. छपाईची कला अस्तित्वात आल्यानंतर साहित्य पुस्तकात साठवून ठेवता येऊ लागले. पण त्याच्यापूर्वी जे साहित्य पिढ्याआणि पिढ्या केवळ मुखोद्गत होत आले त्याची गणतीच करता येणार नाही. हा फार मोठा वारसा आहे.
या वाड्मयचे वैशिष्ट्य हे की, ते अपौरुषेय आहे. म्हणजे त्याचा कर्ता सांगता येत नाही.आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची मालकी एका व्यक्तीची नाही, सबंध समाजाची ती आहे.म्हणूनच ते खर्याखुर्या अर्थाने लोकसाहित्य आहे. ते सामान्य लोकांच्या जीवनातून उपजले,त्यांच्याच तोंडी खेळले, वंशपरंपरा पाठांतरातून चालत आले आणि त्यांच्या जीवनाशी एकरूप झाले. कोणतेही साहित्य जेव्हा जीवनाशी एकरूप होते तेव्हा ते जिवंत ठरते.म्हणूनच लोकगीते ही जिवंत वाटतात. हे समाजाचे धन असते ,राष्ट्रात्ती संपत्ती असते.
मराठी लोकगीतांतून व लोककथांतून मराठी भाषेचे सौष्ठव, सौंदर्य आणि झेप यांचा फार चांगला साक्षात्कार घडून होतो. मराठी भाषेचा अस्सल गोडवा, अस्सल कणखरपणा आणि अस्सल रसाळपणा लोकगीतांइतका इतरत्र क्वचितच सापडेल. मराठी भाषेचे हे रूप सतत डोळ्यांपुढे रहाणे आवश्यक आहे.
डॉ. सरोजिनी बाबर यांनी आजपर्यंत लोकसाहित्याचा शोध घेऊन ते प्रकाशात आणण्याच्या बाबतीत फार मोलाची मेहनत केली आहे. लोकगीते व लोककथा वेचून आणण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले आहे. हे एक फार मोठे व व्यापक असे कार्य आहे.
मराठी भाषेतील लोकसाहित्य हा एक अतिशय समृद्ध असा वारसा आहे. या साहित्याची आजच्या व भावी पिढ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने डॉ. सरोजिनी बाबर यांनी ‘मराठीतील स्त्रीधन’ हा ग्रंथ समाजाला अर्पण केला.
सदर ग्रंथामध्ये सद्याची पिढी व भावी पिढी यांना अपरिचीत असलेली सांस्कृतीक माहिती सदर ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ...कुळाचार, खेळ आणि गाणी, भोंडला (हातगा), नागपंचमी, गौरीपूजन, लग्नातील गाणी, मंगळागौर, डोहाळे, पाळणा (अंगाई गीत), उखाणा (आहाणा), माजघरातील गाणी, कौटुंबिक जीवन, देवादिकांची गाणी, लोककथा. आदी अशा प्रकारे उपयुक्त माहितीचा खजिना समाविष्ठ आहे.
~~~~~~~~~~~~~~~~
ग्रंथाची मूळ एकूण किंमत:रू. ६००/-
सवलत रू. ४५०/-
(पोस्टेज सह/घरपोच )
~~~~~~~~~~~~~~~~
ग्रंथ आरक्षित करण्यासाठी व घरपोच मागवण्यासाठी गुगल पे अथवा फोन पे द्वारे ९३७३७६५५११ या क्रमांकावर पैसे पाठवा तसेच व्हाट्सअप द्वारे आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सह व मोबाईल नंबर सह द्यावा ही विनंती.
~~~~~~~~~~~~~~~~
पार्श्व पब्लिकेशन्स
राहुल मेहता
कोल्हापूर.
९३७३७६५५११
९६८९८९५२८९