Sakal Kolhapur Events

Sakal Kolhapur Events Sakal Kolhapur Events is a special page created for Sakal Kolhapur Events and it is a division of S

 #सकाळ महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक ए बी सी ची आकडेवारी जाहीर …
11/09/2025

#सकाळ महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक
ए बी सी ची आकडेवारी जाहीर …

Tickets Available on Book My Show
10/08/2025

Tickets Available on Book My Show

29/06/2025

सकाळ नाट्यमहोत्सव

प्रिया बापट व उमेश कामत यांची सुपरहिट जोडी... भेटायला येत आहे..

जर तर ची गोष्ट.. सुप्रसिद्ध नाटक

4 जुलै 2025.

आनंद भवन सायबर कॉलेज कोल्हापूर..

सायंकाळी सात वाजता

MSME Conclave 2025
27/06/2025

MSME Conclave 2025

Sakal media group Kolhapur & Dr. D. Y. Patil college of engineering & technology, Kolhapur Presents..Engineering admissi...
15/06/2025

Sakal media group Kolhapur & Dr. D. Y. Patil college of engineering & technology, Kolhapur

Presents..

Engineering admission process Seminar at kacchi Jain, bhavan sangli..

Housefull Response..

Thanks students & parents

11/06/2025

Registration Link :
https://forms.gle/33E4r3YSdAYPpuby7

नमस्कार,
पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,

नुकताच तुम्ही तुमच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा विना अडथळा पार केला आहे तो म्हणजे १२ वी बोर्ड परिक्षेचा, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

*आता 12 वी झाली.. पुढे काय ?*

*अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2025-26*
*मार्गदर्शन सेमिनार (प्रवेश विनामूल्य)*
➖➖➖➖➖➖➖➖
🎙️ *प्रमुख वक्ते: डॉ. ए. के. गुप्ता कार्यकारी संचालक, डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर.*
➖➖➖➖➖➖➖➖
📍 *स्थळ: आनंद भवन, कोल्हापूर*
🗓️ *दिनांकः शनिवार, 14 जुन 2025*
🕐 *वेळ: सकाळी 10.00वा*
➖➖➖➖➖➖➖➖
*सेमिनारसाठी उपस्थिती का महत्वाची..*

👉 यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सध्यस्थिती.

👉 अभियांत्रिकीमधील भविष्यातील ट्रेंड.

👉 अभियांत्रिकीनंतरच्या विविध करिअरच्या संधी.

👉 आरक्षण व जागा वाटप, सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप.

👉 एमएचटी-सीईटी 2025 च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर.

👉 राज्यातील टॉप कॉलेजीसचा कट ऑफ.

👉 केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे.

👉 अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मधील महत्वाचे बदल.

👉 कॉलेजला महत्व द्यावे कि
शाखेला.
➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी संपर्क
9823655577
9158142252
8237604862
9766167240

09/06/2025

🎓✨ Gear Up for Your Engineering Dream! ✨🎓
Confused about Engineering Admissions?
Let’s simplify it for you – from experts who know it best! 💡

🔍 Join the Seminar on ENGINEERING ADMISSION PROCESS 2025-26
🗣️ By renowned speaker Dr. A. K. Gupta, Executive Director, DYP Group, Kolhapur

📍 SEMINAR VENUES & DATES
📌 GADHINGLAJ – Shahu Sabhagrah
📆 13th June 2025 | 🕐 01:00 PM

📌 KOLHAPUR – Anand Bhavan, CSIBER Vidyanagar
📆 14th June 2025 | 🕙 10:00 AM

📌 SANGLI – Kachhi Jain Bhavan
📆 15th June 2025 | 🕙 10:00 AM

🎯 What You’ll Learn: ✅ Admission Process 2025-26
✅ CAP Rounds & Documentation
✅ Expert Tips to Choose the Right College & Branch
✅ Live Q&A with Parents & Students

🎁 FREE ENTRY | Limited Seats | Spot Counseling Available!
📞 Call to Register:
9158915999 | 9158615999 | 9960518701 | 9890029004

📷 Follow for updates:
📸 |
🌐 coek.dypgroup.edu.in

🔖 Presented by Sakal Media Group, Kolhapur & D Y Patil College of Engineering & Technology, Kolhapur.

🚀 Don’t just dream it. Plan it. Attend it. Become an Engineer! 👨‍💻👩‍💻

31/05/2025

🎓 सकाळ एज्युकेशन महायात्रा 2025 🚀
दहावी, बारावी नंतर "काय पुढे?" हा प्रश्न सतावतोय? 🤔
तर काळजी करू नका... कारण सकाळ घेऊन येत आहे एक अनोखा शैक्षणिक मेळावा –
सकाळ एज्युकेशन महायात्रा 2025!

✅ करिअरचे असंख्य पर्याय
✅ शिक्षण संस्था थेट तुमच्यासमोर
✅ मार्गदर्शन, सल्ला आणि माहिती—all in one place!

📍कोल्हापूर – ७ व ८ जून
डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी

📍गडहिंग्लज – ११ व १२ जून
मोहिते फूड कोर्ट हॉल, आजरा रोड

🎯 तुमचं करिअर इथेच ठरेल स्पष्ट!

🎓 विद्यार्थ्यांसाठी, 👨‍👩‍👧 पालकांसाठी, आणि 📘 भविष्यातील स्वप्नांसाठी –
ही संधी चुकवू नका!








15/04/2025

Tickets available at book my show and tickitalay

व्यावसायिक संबंध सुदृढ करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता (ईआय) असणे जरुरीचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) भविष्यातील अंदाज ...
05/04/2025

व्यावसायिक संबंध सुदृढ करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता (ईआय) असणे जरुरीचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) भविष्यातील अंदाज वर्तवण्यासाठी महत्त्वाची असली तरी ती व्यवसायाचा पाया नाही. त्यामुळे माझ्या नोकरीचे काय होणार, हे डोक्यातून काढून टाका. स्वत:ला ओळखा, स्वत:साठी निवडा व स्वत:ला द्यायला शिकत नवनवीन कौशल्ये आत्मसात करा, असा कानमंत्र विविध वक्त्यांनी आज येथे दिला.

‘सकाळ’तर्फे एचआर कॉन्क्लेव्ह मार्केट यार्ड परिसरातील हॉटेल फर्नमध्ये झाली. ‘बॅलन्सिंग इआय ॲंड एआय फॉर एचआर एक्सलन्स’ मध्यवर्ती संकल्पनेवर ती आधारीत होती. सिनर्जिक सेफ्टी शूज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजक, तर जेनेरिक कार्ट मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड, ऑप्टिमा जॉब्स, आरएनएस सहप्रायोजक होते.

आयसीएफ प्रमाणित प्रशिक्षक जयश्री कीर्तने म्हणाल्या, ‘‘भावनिक बुद्धिमत्ता अंमलात आणण्यासाठी आयुष्यभराची साधना लागते. ते कोणते साधन नाही. स्वत:ला समजून घेत आपल्या भावनांचा इतरांवर काय परिणाम होईल, हे समजायला हवे आणि ते समजून घेत व्यवस्थापन करणे व काय करायला पाहिजे, हे कळणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. तिच्यात ऊर्जा भरलेली असून तिचा उपयोग कसा करावा, हे महत्त्वाचे आहे. कार्यात्मक व धोरणात्मक दृष्टीने तिची उपयोगिता कळायला हवी. धैर्य व करुणेद्वारे तिची अंमलबजावणी करता यायला हवी. काम करताना भावनिक बुद्धीमत्तेबरोबर कामात उत्कृष्टता असायला हवी.’’

सकाळ माध्यम समूहाच्या पीपल ॲंड कल्चरल विभागाचे संचालक, प्रसिद्ध व्याख्याते व ग्लोबल एचआर लीडर डॉ. विनोद बिडवाईक म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आव्हानांची साखळी निर्माण झाली असून, उद्योजक संभ्रमात आहेत. ही बुद्धिमत्ता अनेकांच्या नोकरी हिरावणार, अशी भीती तयार झाली आहे. मात्र, तशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. व्यावसायिक संबंध सुदृढ करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता आवश्‍यक ठरते. ती व्यवसायासाठी मूलभूत असून पाया आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात नोकरी टिकवून ठेवायची झाल्यास स्वत:कडील कौशल्ये वाढविणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.’’

माईंड वर्क्स पीपल सोल्युशन्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह पवार म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेची एक कोटी साधने उपलब्ध झाली असताना लोकांना चॅटजीपीटीसह अन्य दोन-तीन माहीत आहेत. प्रत्येक सेकंदाला डेटा तयार होत आहे. त्याची एक रचना तयार झाली, की पुढे त्याचे माहितीत रुपांतर होते. व्यवसायात चांगला डेटा ठेवला तर त्याचा परिणाम चांगला मिळतो. स्वत: विषयीची जाणीव, नियमन, प्रेरणा, सहानुभूतीसह कौशल्ये वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करते. त्यामुळे उद्याचे जग पूर्णत: बदलले जाणार आहे.’’ जेनेरिक कार्ट मेडिसिनचे संचालक सिद्धार्थ साळुंखे व ऑप्टिमा जॉब्सचे संचालक अमित मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. सिनर्जिक सेफ्टी शूज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष संजय पाटील, किर्लोस्कर ऑईल इंजिन प्रायव्हेट लिमिटेडचे सहायक सर व्यवस्थापक संजय बेनके उपस्थित होते. ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा यांनी प्रास्ताविक केले. सहायक सर व्यवस्थापक (सेल्स) आनंद शेळके यांनी आभार मानले.

कोल्हापूरकरांसाठी खास हाॅलीडे कार्निव्हल.."आयुष्य लहान आहे आणि जग खूप विस्तृत आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत जितक...
11/03/2025

कोल्हापूरकरांसाठी खास हाॅलीडे कार्निव्हल..

"आयुष्य लहान आहे आणि जग खूप विस्तृत आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत जितक्या लवकर ते एक्सप्लोर करायला सुरुवात कराल तितके चांगले." हेच एकत्र व्यतीत केलेले क्षण तुम्हाला आयुष्यभर आनंद देतील.

सकाळ आणि थाॅमस कुक संयुक्त घेऊन आले आहेत एक भव्य हॉलिडे कार्निव्हल. तेव्हा तुमच्या स्वप्नातील सहलींसाठी सज्ज व्हा. ही एक अत्यंत उत्तम संधी आहे ज्यामध्ये विविध पर्यायी सहलींचा अनुभव घेता येईल, ज्या आपल्या इच्छांनुसार परफेक्ट असू शकतात.

आपण महाराष्ट्रीयन लोक भरपूर प्रवास करतो. आपल्याला देशातील आणि देशा बाहेरील सुद्धा, नवीन ठिकाणे बघायला खूप आवडतात. मार्च- एप्रिल आला की लहान मुलांना वेध लागतात ते शाळा कॉलेजेस च्या सुट्यांचे आणि त्याचबरोबर उन्हाळी सहलीचे. ह्यावर्षी कुठे जायचे यावर परिवारा मध्ये जोरदार चर्चा होते. मित्र आणि नातेवाईकांनी सुचविलेली, ट्रॅव्हल ब्लॉग वर दाखविलेली ठिकाणे, काश्मिर की अंदमान, युरोप कि स्वित्झर्लंड आपल्यालाच कन्फ्युजन होते.

पण चिंता करू नका. थॉमस कुकचे तज्ञ ट्रॅव्हल एक्सपर्ट्स, आपल्या सुट्ट्या, आपले बजेट यांचा विचार करून आपल्या सहलीसाठी सर्वोत्तम पॅकेज निवडायला मदत करू शकतात.

थॉमस कुक (ईंडिया) लि. ही एक विश्वासार्ह ट्रॅव्हल एजन्सी आहे जी भारतीय पर्यटकांसाठी उत्तम सेवा पुरवते.

यामध्ये विविध स्थानिक खासियत असलेले भारतीय जेवण, आरामदायक प्रवास व्यवस्था, आणि विविध डिस्काउंट्स यांचा समावेश असतो.

त्यांच्या हॉलिडे पॅकेजेसमध्ये, विविध प्रकारच्या सहलींचे पर्याय असतील – चारधाम यात्रा, जागतिक दौरे, कुटुंबासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी खास कार्यक्रम. आपण आपली ट्रीप आमच्या होॅलीडे कार्निवल मध्ये बुक केल्यावर आपल्याला मिळू कतात या छान offers :
हॉलिडे पॅकेजेस वर सूट, फॅमिली आणी ग्रुप डिस्काउंट, ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल माहिती, ईएमआय ऑप्शन्स आणि आयसीआयसीआय बँकेडून स्पेशल ऑफर

आमचं तज्ञ आणि सुज्ञ ट्रॅव्हल एक्सपर्ट्स आपल्याला सगळी महिती द्यायला आणि परफेक्ट हॉलिडे पॅकेज ची निवड करायला तयार असतील.

कधी : रविवार दिनांक 16 मार्च 2025
केव्हा : सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत
कुठे : हाॅटेल सयाजी, शाहूपुरी, कोल्हापूर

चला तर मग आम्हाला 9552581918 या नंबरवर काॅल करा आणि तुमचे नाव रजिस्टर करा.

सकाळ माध्यम समूहाच्या कोल्हापूर विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा..
06/02/2025

सकाळ माध्यम समूहाच्या कोल्हापूर विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा..

Address

Shivaji Udyam Nagar
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakal Kolhapur Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sakal Kolhapur Events:

Share

Sakal Kolhapur Events

Established in 1932; Sakal is one of the leading Media group in Maharashtra, Karnataka, and Goa. Sakaal Media group comprise of all media solutions at one stop. Beginning from Print, i.e. Daily. Sakaal steadily, we entered in Digital Media platforms. Sakaal Media Group is committed to the society and its development in every way possible. It has perpetual relations with the different social issues of its readers. The reader is our focal point and our heart, too. Keeping this in mind Sakaal has been chalking out a variety of programs very often which focus on the issues relating to the child, youth, ladies, artists,players, farmers, senior citizens.