25/07/2025
#माणुसकी #अजून #जिवंत #आहे
काल दुपारी 2 वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनंच्या दादऱ्यावर एक 20/22 वर्षाची तरुणी एकटीच बसली होती,
एकांतात बसून काही तरी विचार करत होती,
तोंडाला कापडं गुंडाळलेली मुलगी म्ह्णून बघणाऱ्यांची दृष्टी बदलत होती,
काही जण येणा जाणारे तिला पायाने धक्का मारून जातं होती,
आडमुठ रिक्षावाले,प्ल्याटफॉम वर फालतू फिरणारे,
असे अनेक जण तिला चल तुला सोडतो कुठं जायचं म्ह्णून विचारत होती पण ती कुणाशीच काय न बोलता निशब्द बसून होती,
तासभर बघत राहिलो न राहवता मी पण तिच्या जवळ जाऊन तिला मराठीत बोललो,
काही कळतं न्हवतं ति काहीच बोलली नाही,
कन्नड मध्ये बोललो तरीही तिला कळेना,
तेलगूत बोलून बघितलो तरी ति बोलेना,
इंग्लिश तर मला पण येत नाही त्यामुळं त्याचा विषयच नाही,
शेवटी हिंदीत बोलून बघितलो तिला हिंदी कळाल,
त्यावर ति काय बोलली ते माझ्या कानाच्या वरूनच पळाल,
ती बंगाली भाषेत बोलत होती तिला हिंदी फक्त कळतं होत,
हिंदीत बोलायला मात्र येत न्हवतं,
कस बस तिला बोलत तिच्या हातवाऱ्यावरून समजून घेत तिला त्या पायरीवरून माझ्या गाडीपर्यंत आणलो,
बाहेर येऊन तिला पोटाला नाष्टा आधी खाऊ घातलो,
नको नको म्हणत ती पोटाला थोडं आधार घेतली,
पाण्याची बाटली देऊन तिला परत स्टेशनं मध्ये घेऊन आलो,
काय बोलाव कस बोलाव सगळ्यात मोठा प्रश्न होत,
तरीही तिच्याकडून तिच्या घरचा नंबर वधवून घेतलो,
तिच्या घरी फोन लावून तिला बोलायला फोन दिलो,
स्पीकर ऑन असलं तरी ते काय बोलत होते मला काहीच कळलं नाही,
अर्धा तास तीने फोन काय कट केली नाय रडत रडत बोलण अजिबात सोडली नाय,
तिच्या घरचे ती मुलगी सोलापूर मध्ये आहे हे समजल्यावरव सोलापूरच्या जवळ असणाऱ्या नळदुर्ग मध्ये त्यांचे नातेवाईक कामाला होते त्यांना ते कळवले,.
लवकर सोलापूरला जावा आणि ती रेल्वे स्टेशन जवळ आहे तिला तुमच्या घरी घेऊन जावा म्ह्णून पाठवले,
संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ते गाववाले सोलापुरात आले,
मला फोन करून त्या मुलीला विचारू लागले,
पण मी मुलीला थोडं लांबच बसवलो होतो,
येणारे कोण आहेत याची चौकशी केल्याशिवाय तिला त्यांच्या हातात देणारच न्हवतो,
त्यांच्याशी बोललो त्यांचं आधार कार्ड बघितलो त्यांच्या फोन मध्ये मी लावलेला त्या मुलीच्या घरच्यांचा नंबर आहे का चेक केलो,
आणि मगच तिला त्या लोकांच्या हातात दिलो,
जाताना ती गाडीत बसली आणि ओल्या डोळ्यांनी रडताना दिसली,
समाजसेवेची व्याख्या काय,
निःस्वार्थ मदत आणि निराधाराला आधार द्यावं अजून काय,
एक सुखद अनुभव घेत कालची घटना जगलो,
मनात पाप आलं तरी त्याला काडी लावून पेटवलो,
माझ्याकडून जेवढ होईल तेवढं काम प्रामाणिकपणे केलो,..
✍️ bhau solapurvala,...