Channel B

Channel B प्रतिबिंब जनमानाचं ! Channel B Is Leading News Channel In Kolhapur District

*बी न्यूज बातमीपत्र दि. ०९-०७-२०२६*  ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. ०९-०७-२०२६*https://youtu.be/Np306NHbpeY🔵...
09/07/2026

*बी न्यूज बातमीपत्र दि. ०९-०७-२०२६*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. ०९-०७-२०२६*

https://youtu.be/Np306NHbpeY

🔵 *दिवसभरात लख्ख ऊन आणि पावसाच्या तुरळक सरी, कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी आली ३६ फूट ७ इंचावर, मात्र इचलकरंजीत नदीच्या पाणी पातळीत वाढ*

https://youtu.be/Ge9V_jaRNX8

🔵 *इचलकरंजीत पावसाची काहीशी उसंत, पण पंचगंगेच्या पाणी पातळी वाढ, नदीकाठावरील स्मशानभूमीला पाण्याचा वेढा पडल्यानं आता शहापूरमधील स्मशानभूमीचा वापर सुरू*

https://youtu.be/dnTdx7Jjfzo

🔵 *समान नागरी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी ७ सदस्यांची समिती, पुढील सहा महिन्यात दोन्ही सभागृहात प्रस्ताव मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा*

https://youtu.be/KtiU0sgBJH4

🔵 *टीईटी आणि बीएलओच्या कामाच्या सक्ती विरोधात शिक्षक संघटनांचं राज्यव्यापी आंदोलन, शाळांना मिळाली अघोषित सुट्टी, शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली निघाला शिक्षकांचा भव्य मोर्चा*

https://youtu.be/l6Qutp5FE9k

🔵 *कागल शहरातील जुन्या घराची भिंत कोसळून ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू, सुदैवानं १४ वर्षीय मुलगा बचावला*

https://youtu.be/fJfvAhlGvZw

🔵 *फुलेवाडी रिंग रोडवरुन मीनाताई ठाकरे शाळा आणि अल्फान्सो स्कूलकडं जाणारे रस्ते बनले डर्ट ट्रॅक, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त*

https://youtu.be/trspJF4ir2o

🔵 *तामगावमधील फार्महाऊसवर सुरू असलेल्या डान्स पार्टीवर एलसीबीचा छापा, ९ जण पोलिसांच्या ताब्यात, सहा महिलांची सुटका*

https://youtu.be/TvsMidRL5tU

🔵 *रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेकडून अनेक गाडया रद्द, आजपासून १७ जुलैपर्यंत कोल्हापुरातून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द, तर शुक्रवारपासून मुंबईतून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द*

https://youtu.be/tVbGTOBQXGA

🔵 *जनावरं आणि कृषी साहित्य खरेदीसाठी अनुदान देण्याचं आमिष दाखवून, एम बी एस पशुसंवर्धन इंडिया लिमिटेडच्या निलेश गायकवाडकडून अनेक शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक*

https://youtu.be/W6MPqoqJFgk

🔵 *२०११ पूर्वी सरकारी जमिनीवरील घर किंवा झोपडीत राहणार्‍या कुटुंबियांना मोठा दिलासा, ३ महिन्यात सर्वेक्षण आणि पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार करणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा*

https://youtu.be/pUImp4niaTo

🔵 *अल्पवयीन शाळकरी मुलीची विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव, पिडीत मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु*

https://youtu.be/4YTNZpOTvGA

🔵 *कोल्हापुरातील वारे वसाहत समोरील नंगीवली दर्गा परिसरात दगडानं हल्ला केल्यानं आशिष जाधव हा तरुण गंभीर, संशयित जुना राजवाडा पोलिसात हजर*

https://youtu.be/IpoWtD_NY2A

🔵 *रोटरी लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचा ५२ वा पदग्रहण सोहळा रेसिडेन्सी लबमध्ये संपन्न*

https://youtu.be/n3yJuBNb3XA

🔵 *मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचारी वसाहतीवर दरडीचं संकट, रुग्णांच्या जीवाला धोका, कर्मचार्‍यांचं स्थलांतर सुरू*

https://youtu.be/0Y6KhZjVvYA

🔵 *के स्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

https://youtu.be/2KlaBbPtypc

🔵 *पीपीपी तत्वावर राज्यातील शासकीय रूग्णालयात एमआरआयच्या तपासणी दरात ३५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानपरिषदेत माहिती*

https://youtu.be/bB-V4xsDX-8

🔵 *जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांकडून ८९ कारवायांमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा लाखो रुपये किमतीचा ५१५ किलो ४७२ ग्रॅमचा साठा न्यायालयाच्या आदेशानं पोलिसांनी केला नष्ट*

https://youtu.be/TIG1x0uZwxo

🔵 *करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या खजिन्यात मे आणि जून या दोन महिन्यातील सलग सुट्टया आणि अधिक मासामुळं भाविकांकडून अडीच कोटींवर दान*

https://youtu.be/klF0OFMnzf4

🔵 *गोकुळची प्रतिष्ठा आणि हित अबाधित रहावं, यासाठी आत्मक्लेश आंदोलन, दूध उत्पादक आणि महिला आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा*

https://youtu.be/_8HysAeY1Xw

🔵 *फास्ट न्यूज - ०९-०७-२०२६*

https://youtu.be/45UGEWGJiF4

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻

फास्ट न्यूज - ०९-०७-२०२६Channel B Facebook - https://www.faceboo...

09/07/2026

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. ०९-०७-२०२६

🟪  *७ / १२ बातमीपत्र - ०९-०७-२०२६*https://youtu.be/2qwbNdVuEls🔵 *राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द पुलावरी...
09/07/2026

🟪 *७ / १२ बातमीपत्र - ०९-०७-२०२६*

https://youtu.be/2qwbNdVuEls

🔵 *राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द पुलावरील खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त, दहा वाड्या-वस्त्यांचा संपर्क पूर्ववत*

https://youtu.be/HfQc58YGlLE

🔵 *गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडीतील अंगणवाडी शाळेवर वीजखांब कोसळला, सुदैवानं जीवितहानी टळली*

https://youtu.be/KJIBoGovOVQ

🔵 *पन्हाळा तालुक्यातील माजगाव-पोर्ले पुलावरून शेतकरी दुचाकीसह पडला पाण्यात, सुदैवानं शेतकरी बचावला, तर दुचाकी गेली वाहून*

https://youtu.be/N_pVx3khqw8

🔵 *डोंबिवलीतील डॉक्टर, परिचारिकांवरील हल्ल्याचा इचलकरंजीतील डॉक्टरांकडुन निषेध, हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी*

https://youtu.be/pfsRdgKOYb8

🔵 *करवीर तालुक्यातील पासार्डे इथल्या मराठी शाळेची सुरक्षा भिंत अतिवृष्टीमुळं कोसळली, निकृष्ट कामामुळं भिंत पडल्याचा ग्रामस्थांचा आरोप*

https://youtu.be/xlDWC3qhpFQ

🔵 *शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळांवर ३१ जुलैपर्यंत बंदी, धबधबे, धरणं आणि पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई, महसूल विभागाचं आवाहन*

https://youtu.be/Kq4l5238Q34

🔵 *बळीराजाच्या सोबतीनं शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला चिखलातील आनंद, राधानगरी तालुक्यातील कोते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं शिवार शिक्षण उपक्रम*

https://youtu.be/hvbs56owZwg

🔵 *लव्ह जिहाद विरोधी कायदा लागु करण्याच्या मागणीसाठी इचलकरंजी प्रांतकार्यालयासमोर निदर्शनं*

https://youtu.be/eHFgoLcGVms

🔵 *पन्हाळा तालुक्यातील पाटीलवाडीत वादळी वार्‍यासह अतिवृष्टीनं जनावरांच्या शेडवर कोसळलं निलगिरीचं झाड, सुमारे ६० हजारांचं नुकसान*

https://youtu.be/pI-NMlU7xpM

🔵 *हुपरी शहरातील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासह पाणीपुरवठा योजना, सिटी सर्व्हे यासह अनेक विकासकामं लवकरच मार्गी लावणार, नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची माहिती*

https://youtu.be/a7uFqS6mvp0

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻

हुपरी शहरातील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासह पाणीपुरवठा योजना, सिटी ...

09/07/2026

कागल शहरातील लोहार गल्ली येथे राहत्या घराची भिंत कोसळून ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्मिला उदय कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे.

बुधवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घराची भिंत अंगावर पडल्याने उर्मिला कुलकर्णी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

08/07/2026

*बी न्यूज बातमीपत्र दि. ०८-०७-२०२६*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. ०८-०७-२०२६*

https://youtu.be/dezeVrPX_sQ

🔵 *कौटुंबिक वादातून पत्नीची कोयत्यानं निर्घृण हत्या, पती फरार, पेठवडगावातील घटनेनं परिसरात खळबळ*

https://youtu.be/hlEZ_UEdux8

🔵 *पावसाचा जोर अंशतः कमी, जिल्हयात गेल्या २४ तासात सरासरी ३१.६२ मिलिमीटर पावसाची नोंद, राजाराम बंधार्‍यावर पाणी पातळी ३७ फुटापर्यंत, ६० बंधारे पाण्याखाली, गुरूवारी यलो अलर्ट*

https://youtu.be/zJsf4Bk4MA0

🔵 *कोल्हापूर शहरातील धोकादायक झाडं आणि फांद्या तोडणार्‍या ठेकेदारांचं काम समाधानकारक नसल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन ब्लॅक लिस्ट करण्याचा स्थायी समितीत निर्णय*

https://youtu.be/AhiinHsDoSA

🔵 *आंतरराष्ट्रीय पातळीवर नकारात्मक वृत्तानंतर शेअर बाजार आपटला, सेन्सेक्स १ हजार ६७७ अंकांनी आणि निफ्टी ५१६ अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचं तब्बल ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान*

https://youtu.be/tDsxl_nrUfc

🔵 *प्रचंड खड्डे, ड्रेनेजचं पाणी, चिखल आणि दोन्ही बाजूला पार्किंग अशा स्थितीतील सिध्दाळा गार्डन ते फिरंगाई तालीम या मार्गाची अवस्था पाहूया, रस्ता नव्हे-नागरिकांच्या खस्ता मालिकेत*

https://youtu.be/meZUCuRMefk

🔵 *नकाशाला विलंब झाल्यामुळं करवीर तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम साडेचार महिन्यांपासून ठप्प*

https://youtu.be/evZlYr8w-nQ

🔵 *माजी खासदार किरीट सोमय्या हे शासकीय अधिकारी आणि खातेप्रमुखांच्या घेत असलेल्या बैठकीमुळं नव्या वादाला निमंत्रण*

https://youtu.be/Xtw4lvz_6X4

🔵 *विविध ठिकाणी चोर्‍या करणार्‍या ४ संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक, दुचाकी, केबल आणि सोलर पॅनेल चोरीचे १० गुन्हे उघडकीस, सव्वा पाच लाखांचं साहित्य जप्त*

https://youtu.be/qigWZWO0cMM

🔵 *ज्या गावांना स्मशानभूमी नाही, त्यांना विकासकामांसाठी निधी दिला जाणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत माहिती*

https://youtu.be/siytlXlZJZ4

🔵 *पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभूमीतील लाकूड चोरीप्रकरणी निरमा कन्स्ट्रक्शनचे सुशांत पोवार आणि उद्यान अधिक्षक समीर व्याघ्रांबरे यांची मिलीभगत, नगरसेवक आदिल फरास यांचा आरोप*

https://youtu.be/Bz2o3T1nLN0

🔵 *स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची बनावट नियुक्तीपत्रं तयार करुन पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाची फसवणूक, ५ जणांवर गुन्हा दाखल, उमेश शिंगेला अटक*

https://youtu.be/sHvcveoplis

🔵 *इचलकरंजीतील गावभाग पोलिस ठाणे ते महासत्ता चौकपर्यंतचा रस्ता चिखलमय, वाहनधारकांची होतीय कसरत*

https://youtu.be/Bq51V7P-s8Y

🔵 *राज्य शासनाच्या अमृत संस्थेची चौकशी व्हावी, तिसर्‍या आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेत ठराव मंजुर*

https://youtu.be/tY47J-ps5iQ

🔵 *कोल्हापूर पोलीस दलाकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाला प्रारंभ, कोल्हापूर पोलिसांच्या पुढाकारातून, विविध शाळांच्या सहभागातून जनजागृती रॅली संपन्न*

https://youtu.be/fXsaa_c-wpw

🔵 *बंधुभाव, समता, ममता, एकता, सामाजिक न्याय आणि करूणेचा संतांनी दिलेला संदेश सध्याच्या माध्यमांनी देणं गरजेचं, हरी भक्त परायण डॉ. श्रीरंग गायकवाड यांचं मत*

https://youtu.be/Six3okbV6JA

🔵 *स्वमान सामाजिक मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी पूनम तोडकर यांची निवड*

https://youtu.be/cUjB2o2J_mM

🔵 *दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील दानपेटीतील रक्कमेची मोजणी सुरु*

https://youtu.be/P7yQrd_PUQY

🔵 *खासगी माध्यमिक शाळांमध्ये लवकरच १५ ते १८ हजार कला, क्रीडा, संगीत आणि हस्तकला शिक्षकांची होणार भरती*

https://youtu.be/4Egxy02iPSo

🔵 *अंकशास्त्राच्या माध्यमातून श्वेता जुमानी यांच्याकडून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार, ९ ते १३ जुलै या कालावधीत ठिकठिकाणी होणार आंदोलन*

https://youtu.be/3cNZrTaASaQ

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻

08/07/2026

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. ०८-०७-२०२६

🟪  *७ / १२ बातमीपत्र - ०८-०७-२०२६*https://youtu.be/44993Y_Cji0🔵 *महावितरणच्या बेजबाबदार यंत्रणेमुळं भुदरगड तालुक्यातील क...
08/07/2026

🟪 *७ / १२ बातमीपत्र - ०८-०७-२०२६*

https://youtu.be/44993Y_Cji0

🔵 *महावितरणच्या बेजबाबदार यंत्रणेमुळं भुदरगड तालुक्यातील कडगांव परिसरातील गावं चार दिवसापासून अंधारात, ग्रामस्थांमध्ये संताप*

https://youtu.be/E8Ey_ngWw40

🔵 *राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शहाजी बरगे यांची बिनविरोध निवड, नुतन सरपंचांनी केला गावाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार*

https://youtu.be/ByhkRI5h9ZI

🔵 *लव्ह जिहादला लगाम घालण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृतीचं निष्ठेनं पालन करणं आवश्यक, सनातन संस्थेच्या प्रचारक स्वाती खाडये यांचं प्रतिपादन*

https://youtu.be/VcqfCGfLDZY

🔵 *कोल्हापूर आणि सांगली जिल्हाला जोडणार्‍या मांगले बंधार्‍याचा भराव गेला वाहून, बंधार्‍याचे बरगे न काढल्याचा परिणाम*

https://youtu.be/NsUczQQCrgo

🔵 *पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या जलपर्णीचा शिरोळ तालुक्यातील शिरढोण - कुरुंदवाड पुलाला विळखा, पाण्याचा दाब वाढल्यामुळं पुलाला धोका*

https://youtu.be/X39DwPWKKfY

🔵 *विजेचं स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिल रद्द करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी*

https://youtu.be/pUMlCLGACSs

🔵 *करवीर तालुक्यातील वसगडे ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार, संतप्त महिलांनी गटारीची घाण ग्रामपंचायत कार्यालयात टाकली*

https://youtu.be/bSgWuEbSNKU

🔵 *इचलकरंजीत बेटींग प्रकरणी आणखी एकाला अटक, आत्तापर्यंत १७ पैकी १२ जणांना अटक*

https://youtu.be/41sOnis1-WU

🔵 *कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भला मोठा वृक्ष कोसळला,एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला*

https://youtu.be/kUserTd-nUo

🔵 *पूर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांची गगनबावडा तालुक्याला भेट, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे तालुका प्रशासनाला आदेश*

https://youtu.be/wqbMNa6Qe7I

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻

पूर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांची गगनबावडा तालुक्...

08/07/2026

गोकुळ ही गोरगरीब शेतकरी कुटुंबांसाठी केवळ दुधाचा ब्रँड नसून लाखो दूध उत्पादकांचा विश्वास, स्वाभिमान आणि सहकार चळवळीचं प्रतीक आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि परस्पर बदनामीमुळे गोकुळची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत आज गोकुळ चौकात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं.

माध्यमांशी बोलताना डॉ. युवराज येडूरे यांनी, “गोकुळ ही कोण्या व्यक्ती, गट अथवा राजकीय पक्षाची मालमत्ता नाही. गोकुळची प्रतिष्ठा आणि हित अबाधित राहावं यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे,” असं सांगितलं.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ चौकात झालेल्या या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी, गोकुळचे हितचिंतक आणि महिलांनी सहभाग घेतल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

08/07/2026

अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन शहरवासीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने आज अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध शाळांतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर जनप्रबोधन उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर पोलीस दलाने हे विशेष अभियान आयोजित केले. राजर्षी शाहू स्मारक येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले.

प्रायव्हेट हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, साई हायस्कूल, नेहरू हायस्कूल, वेध अकॅडमीसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी “नशेकडे पाऊल टाकू नका, स्वतःचे जीवन संपवू नका”, “अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे मृत्यूचे आमंत्रण” अशा संदेशांचे फलक हातात घेऊन बिंदू चौक ते दसरा चौक मार्गावर पदयात्रा काढली.

यानंतर विद्यार्थ्यांना नशामुक्ती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. संतोष प्रभू आणि नाना पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची सामूहिक शपथही देण्यात आली.

08/07/2026

कोल्हापुरातील शाहू मिल परिसरातील संरक्षक भिंत अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

भिंत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मुसळधार पाऊस, जुनी झालेली रचना किंवा देखभालीअभावी ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली असून संबंधित यंत्रणांकडून पंचनामा आणि पाहणीचे काम सुरू आहे.

Address

CTS No. 446 3rd Floor, Kailash Tower, Assembly Road, Station Road Corner, Assembly Rd, New Shahupuri
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Channel B posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share