25/08/2024
आता मुलं मोठी झाली आहेत
बिछ्यान्या वरच्या चादरी आता, विस्कटलेल्या नसतात
अस्ताव्यस्त फेकलेले आता, कपडे कुठे नसतात.
TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही
खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही
कारण-
आता मुलं मोठी झाली आहेत आणि आम्ही एकटे झाले आहोत.
वर्तमानपत्रसाठी रोज सकाळीची मारामारी नसते
घर मात्र खुप मोठ अन निटनेटके दिसते.
प्रत्येक खोली आता कशी अनोळखी वाटते.
रिकामी शांतता अन वेळ,दोन्ही आता खायला उठतात
लहानपणीच्या आठवणी फक्त,फोटोमध्ये दिसतात.
कारण-
मुलं मोठी झाली आहेत अन आम्ही एकटे झालो आहोत.
येउन कोणी आता कधी , गळ्यात नाही पडत
नाही कोणी कश्यासाठी ,हट्ट आता करत.
घास भरवितना आता चिमणी नाही उडत
घास भरविल्याच्ं सुद्धा,समाधान नाही मिळत
रोजच्या चर्चा अन वादविवादाला, मिळाला पूर्णविराम
भांडण मिटविल्याचे देखील, आता नाही समाधान.
येता जाता कोणी आता "पप्पी" घेत नाही.
पैशाची आता कधी,चणचण भासत नाही.
कारण-
मुलं मोठी झाली आहेत अन आम्ही एकटे झालो आहोत.
आयुष्याचा सुवर्णकाळ संपला,पापण्या लवता लवता
सुंदरशी अनुभूती संपली,कळत न कळता.
बोबड्या बोबड्या बोलामध्ये,उत्साहाच उधाण होतं
होतं क्षणात रडणं तर दुसर्या क्षणी हसणं होतं.
निष्पाप निरागस
चेह-यावर,ओथंबुन प्रेम होतं.
आता नाही राहिलं ते खांद्यावर घेऊन थोपटण
आणि थोपटता थोपटता मांडीवर निजवण.
नाही आता बाळाचे ते,पांघरुण भिरकावण दुर
दुर कुठे विरले आता,अंगाईचे सुर.
बिछान्याचे रुप आता,झाले आहे मोठं
मुलाचं बालपण त्यात,झाले आहे लुप्त.
कोणी आता पायमोजे,फेकत नाही इकड तिकडं
घराप्रमाणे फ्रिज देखील,असतं रिकाम टेकड
स्वयंपाकघर आहे उदास अन बाथरुम असतं कोरडं.
दारावरची घंटी वाजताच,उगाच होतं आशेचे जागण
दार उघडताच कोणी गळ्यात पडून,करेल काही मागणं.
पण-
सकाळ संध्याकाळ फोनवर होते,चौकशी तब्येतीची
सुचना असते त्यात,सक्त आराम करण्याची.
कधी काळी त्यांची भांडण,आम्ही असू मिटवत
तेच आता आम्हाला,आहेत समजाऊन सांगत.
खरच जणु आम्ही आता लहान झालो आहोत.
मुलं झाली मोठी अन आम्ही एकटे झाले आहोत. 😌😞