25/09/2025
न्यूजसेवा कोपरगाव -(नानासाहेब जवरे) कोपरगाव शहरात रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन त्यात सुंबे व भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.यातील सोळा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरू होती.मात्र यात आरोपी विरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मात्र पोलिसांनी दाखल केला असल्याचे दिसत नाही हे विशेष !...
न्यूजसेवा कोपरगाव -(नानासाहेब जवरे) कोपरगाव शहरात रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळ....