03/05/2023
महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट कल्याणनगरीत दि.२८ एप्रिल,२०२३ ते दि.१ मे,२०२३ या चार दिवशी दररोज संध्याकाळी ५.०० ते रात्री १०.०० यावेळेत केडीएमसी ग्राऊंड,मुंबई विद्यापीठ उपकेंद्राशेजारी, वसंत व्हँली,कल्याण(प) येथे अत्यंत दिमाखदार व दैदिप्यमान स्वरुपात संपन्न होत आहे.दि.२८ एप्रिल,२०२३ रोजी महोत्सवाचं उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कलामंचवर खान्देशी कलाकारांचं सुरेल व सुरेख गायन,बहारदार नृत्य व दमदार परफॉर्मन्सेसचा जणू कहरच होता.स्टेजवरील चित्ताकर्षक व मनोवेधक डिजीटल स्क्रीन,भव्यदिव्य स्टेज व्यवस्था, मान्यवरांची मार्गदर्शनपर मनोगते,छत्रपतींचा आकर्षक पुतळा,ऐतिहासिक किल्ल्याचं दर्शन घडविणारी स्वागत कमान,जमीनीवरील रेड व ग्रीन कार्पेट,मनोरंजनासाठीचे झुले,पाळणे,कारंजे,संगीमय कार्यक्रमांची जणू रेलचेल होती त्याचप्रमाणे वेज,नॉनवेज खाद्यानाची स्टॉल,गरमागरम जिलेबी,तळलेली व भाजलेली पापड,कंदी पेढे,पुरणपोळी, कळण्याची भाकरी,थालीपीठ, मिसळ पाव,झुणका भाकर,ठेचा,चटणी,मसाल्याचे पदार्थ,अन्नधान्य व कडधान्य यांची शंभराहून अधिक स्टॉल खवैय्यासाठी मेजवानीच होती...विनोद शेलकर,सौ.वर्षा पाटील व कु.वैदेही पाटील यांचं बहारदार,दमदार व कसदार सूत्रसंचालन कार्यक्रमाची उंची वाढविणारं व मंत्रमुग्ध करणारं होतं...!...
महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्.....