SGP Marathi

SGP Marathi this is production house establish in 1989. this house maked and sucsied lot telifilm / tv serial and drama show also.

and establish new actor and actreses in marathi industri.

02/11/2022

test

01/11/2022
01/11/2022

test signal

06/04/2022

ठाणे चैत्र नवरात्रौत्सव

                 गुरूवार 04 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :–अचानक आज सकाळी उठल्यापासून शारिरीक शक्ती,  उत्साह कमी वा...
03/03/2022



गुरूवार 04 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :–अचानक आज सकाळी उठल्यापासून शारिरीक शक्ती, उत्साह कमी वाटेल. श्री दत्तगुरूंच्या उपासकांना अपेक्षित लाभ होईल.



वृषभ :–व्यवसायातील अडचणींवर अचानक ओळखीच्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. वकील मंडळीना आपली कामे योग्य दिशेने सुरू असल्याचे जाणवेल.



मिथुन :–वडिलांच्या प्रकृतीमध्ये अपेक्षेप्रमाणे चांगली सुधारणा होईल. पुरूष वर्गास सासुरवाडीकडून मानपान सन्मान होईल.



कर्क :–सरकारी अधिकारी वर्गाने आर्थिक व्यवहारापासून कटाक्षाने दूर रहावे. आवश्यक नसल्यास प्रवास करू नये.



सिंह :–व्यवसायातील महत्वाच्या बाबींवर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील छुप्या विचारांचा मानसिक ताण जाणवेल.



कन्या :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारी बाबत आज फक्त तोंडी चर्चा होईल. ज्येष्ठावरीष्ठांकडून मोलाची माहिती मिळेल.



तूळ :–संततीच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरवताना ज्येष्ठांचा सल्ला मिळेल. वकील मंडळीं अतिशय महत्वाच्या कामात बिझी राहतील.



वृश्र्चिक :–आई वडिलांबरोबर लवकरच शेतीच्या गावी जाण्याचे बेत ठरतील. घरातील पाळीव प्राण्याची प्रकृतीची काळजी निर्माण होईल.



धनु :–दळणवळण खात्यातील कर्मचार्‍यांना अतिशय दगदगीचे काम करावे लागणार आहे. तुमच्या बोलक्या स्वभावामुळे अडचणीतून मार्ग निघेल.



मकर :–नोकरीतील पगारातील मोठी रक्कम नातेवाईकांच्या अडचणीसाठी द्यावी लागेल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना आनंदाची बातमी कळेल.



कुंभ :–तुमच्या स्वभावातील आदर्शवादाने तुमचे सहकारी अचंबित होतील. महिलांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवेल.



मीन :–आज तुमच्या आत्मविश्वासात अचानक वाढ झाल्याचे जाणवेल. त्याचबरोबर शारिरीक व मानसिक उत्साह वाढेल.

|| शुभं-भवतु ||

                 गुरूवार 03 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :– श्री सद्गुरूंच्या कृपेने बर्याचशा बाबतीत पूर्वसुचना  मि...
03/03/2022



गुरूवार 03 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :– श्री सद्गुरूंच्या कृपेने बर्याचशा बाबतीत पूर्वसुचना मिळतील. अध्यात्मिक क्षेत्राच्या अभ्यासकांना श्री गुरूमाऊलीकडून मार्गदर्शन मिळेल.



वृषभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल व आत्मविश्वासात वाढ होईल. तरूणांनी मनात उगाच शंका आणू नयेत.



मिथुन :–कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून तरूणांना अध्यात्मिक विषयावर माहिती मिळेल. पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले जाईल.



कर्क :–तुमचे योग्य नियोजन व कौशल्य यांमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात नावाजले जाल. आईवडीलांच्या प्रेस्टीजमुळे मार्केटमधील तुमचा रूबाब वाढेल.



सिंह :–कुटुंबातील सर्वात लहान मुलाच्या प्रकृतीची काळजी निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून आत्मचिंतन करावे.



कन्या :–कागदपत्रे वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रावर सही करू नये. मंत्रतंत्रांच्या अभ्यासकांनी कोणाचेही ऐकून आपली अभ्यासाची दिशा बदलू नये.



तूळ :–तुम्हाला तुमच्या उद्धीष्टापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आज तुमचे अंदाज चुकीचे ठरल्याने मनस्ताप होईल.



वृश्र्चिक :–पूर्वी घडलेल्या प्रसंगाच्या अनुभवावर आज तुमचा निर्णय अवलंबून राहील. नव्याने गुंतवणूकीचे व्यवहार मनाने करू नका.



धनु :– आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य असलेले काम करून दाखवाल. प्रवासात नवीन ओळखी होतील.



मकर :–कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा होऊ लागेल. नोकरीतील तुमची काम करण्याची तळमळ वरीष्ठांचा लक्षांत येईल.



कुंभ :–नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वाद न वाढतील याची काळजी घ्यावी. शब्दाने शब्द न वाढवता संयम राखण्याचा प्रयत्न करा.



मीन :–आज प्रत्येक गोष्टीला महत्व देऊन विचार करावा लागेल. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.



|| शुभं-भवतु ||

                 बुधवार 02 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :– मनाच्या अचानकपणे बदलणार्‍या वृत्तीवर संयम घालावा लागेल. ...
01/03/2022


बुधवार 02 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :– मनाच्या अचानकपणे बदलणार्‍या वृत्तीवर संयम घालावा लागेल. प्रेमसंबंधातील व्यक्तींनी एकमेकातील दुरावा घालवण्याकरता बसून चर्चा करावी व मन मोकळे करावे.



वृषभ :- मनाची चलबिचलता वाढल्याने हातातील कामाकडे लक्ष लागणार नाही. अनुभव हाच गुरू याचा अनुभव येईल.



मिथुन :–कोणतेही व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून वेळ द्यावा लागेल. कोर्टाच्या कामाबाबत घाई करू नका.



कर्क :–विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी मान-अपमान सोडून तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. कणखरपणाने वागल्यास आज मानसिक त्रास होणार नाही.



सिंह :–आईकडील नात्यातील मंडळींच्या मदतीने एखाद्या गूढ गोष्टींचा उलगडा होईल. शिक्षणातील यशाच्या दृष्टीने मेहनत वाढवावी लागेल.



कन्या :–तरूणांनी शांत विचाराने आपल्या अडचणी वरीष्ठांना सांगाव्यात तरच त्यातून मार्ग निघेल. मनावरील दडपण दूर करण्याकरीता वरीष्ठांची मदत घ्या.



तूळ :–आज प्रमाणापेक्षा जास्त कामांची जबाबदारी अंगावर येईल. नोकरीतील अडचणींवर तुमच्याकडून मार्ग सापडेल.



वृश्र्चिक :–आज तुमच्या बाबतीत आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. राजकीय मंडळीनी विरोधकांना न जुमानता कामे करावीत.



धनु :–नात्यातील कोणतीही गुंतागुंत सहविचाराने सुटेल व मनावरील ताणही कमी होईल. स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावली जातील.



मकर :–आज कोणतीही जबाबदारी घेण्यापूर्वी बारकाईने विचार करा. आनंदी वृत्तीने आजचा दिवस यशस्वी कराल.



कुंभ :– आजचा दिवस लहान मुलांच्या अडचणी सोडवण्याकरीता वापराल. सरकारी परवानग्या च्या कामातील घोळ आज निस्तरता येणार नाही.



मीन :–डाँक्टरांकडून खाण्यापिण्यावर निर्बंध घातले जातील. विद्यार्थ्यांकडून नवीन प्रोजेक्टवरील माहितीची विचारणा होईल व सर्व स्पष्ट करावे लागेल.



|| शुभं-भवतु ||

                 मंगळवार 01 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :– मनाच्या अचानकपणे बदलणार्‍या वृत्तीवर संयम घालावा लागेल....
28/02/2022



मंगळवार 01 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :– मनाच्या अचानकपणे बदलणार्‍या वृत्तीवर संयम घालावा लागेल. प्रेमसंबंधातील व्यक्तींनी एकमेकातील दुरावा घालवण्याकरता बसून चर्चा करावी व मन मोकळे करावे.



वृषभ :- मनाची चलबिचलता वाढल्याने हातातील कामाकडे लक्ष लागणार नाही. अनुभव हाच गुरू याचा अनुभव येईल.



मिथुन :–कोणतेही व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून वेळ द्यावा लागेल. कोर्टाच्या कामाबाबत घाई करू नका.



कर्क :–विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी मान-अपमान सोडून तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. कणखरपणाने वागल्यास आज मानसिक त्रास होणार नाही.



सिंह :–आईकडील नात्यातील मंडळींच्या मदतीने एखाद्या गूढ गोष्टींचा उलगडा होईल. शिक्षणातील यशाच्या दृष्टीने मेहनत वाढवावी लागेल.



कन्या :–तरूणांनी शांत विचाराने आपल्या अडचणी वरीष्ठांना सांगाव्यात तरच त्यातून मार्ग निघेल. मनावरील दडपण दूर करण्याकरीता वरीष्ठांची मदत घ्या.



तूळ :–आज प्रमाणापेक्षा जास्त कामांची जबाबदारी अंगावर येईल. नोकरीतील अडचणींवर तुमच्याकडून मार्ग सापडेल.



वृश्र्चिक :–आज तुमच्या बाबतीत आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. राजकीय मंडळीनी विरोधकांना न जुमानता कामे करावीत.



धनु :–नात्यातील कोणतीही गुंतागुंत सहविचाराने सुटेल व मनावरील ताणही कमी होईल. स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावली जातील.



मकर :–आज कोणतीही जबाबदारी घेण्यापूर्वी बारकाईने विचार करा. आनंदी वृत्तीने आजचा दिवस यशस्वी कराल.



कुंभ :– आजचा दिवस लहान मुलांच्या अडचणी सोडवण्याकरीता वापराल. सरकारी परवानग्या च्या कामातील घोळ आज निस्तरता येणार नाही.



मीन :–डाँक्टरांकडून खाण्यापिण्यावर निर्बंध घातले जातील. विद्यार्थ्यांकडून नवीन प्रोजेक्टवरील माहितीची विचारणा होईल व सर्व स्पष्ट करावे लागेल.



|| शुभं-भवतु ||

                 सोमवार 28 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :– पाळीव प्राण्यांपासून त्रास संभवतो. वयस्कर मंडळींनी ...
27/02/2022



सोमवार 28 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :– पाळीव प्राण्यांपासून त्रास संभवतो. वयस्कर मंडळींनी रस्त्यावरून चालताना कुत्र्यांपासून सुद्धा सावध राहावे. विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करावा.



वृषभ:– नव्याने ओळख झालेल्या व्यक्तींच्या सल्ल्याचा अति विचार करू नका. परिस्थितीचे भान ठेवून काय व कसे वागावे याचा विचार करा.



मिथुन:– इतरांच्या प्रभावामुळे एखादे धाडस किंवा साहस करण्याचा प्रयत्न करू नये. बोलण्यातील चातुर्याचा इतरांवर प्रभाव पडेल.



कर्क :– परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. मित्रमंडळींच्या बरोबर अचानक कोणतीही कोणतीही कामे ठरवू नका. तुमच्या बोलण्याने दुखावले जाणार नाहीत याची खात्री करा.



सिंह:– आज मोठेपणाच्या खोट्या विचारांच्या मागे धावण्याची वेळ येईल. समोर आलेल्या परिस्थितीमुळे हात पाय गाळून चालणार नाही. खात्रीशीर विचार मदत करणाऱ्यांचीच मदत घ्या.



कन्या:– नुकत्याच घडलेल्या घटनेवर कोणतेही भाष्य केल्यास ते तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. स्वतःच्या मनावर संयम ठेवून वागावे लागेल. भावनेच्या आहारी जाऊ नका.



तूळ:– योग्य नियोजन केल्यास अवघड वाटणाऱ्या कामाला मार्गी लावता येईल. जमीन व घर यातील व्यवहार कायद्याच्या चौकटीत अडकून पडतील.



वृश्चिक:– कुटुंबात एकमेकांच्या विचाराने वागल्यास संघर्ष कळेल. घरातील प्रश्न सोडवताना भावनेला अती महत्त्व देऊ नका.



धनु:– मनातील ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. महत्त्वाच्या असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना अडचणींचा डोंगर समोर उभा राहील.



मकर:– सरकारी अधिकारी वर्गास समाजासमोर उभे राहताना राहून आपल्या योजना व्यवस्थितपणे इतरांना पटवून देता येतील. नाते संबंधाबाबत कोणत्याही गोष्टी अती ताणू नका.



कुंभ:– आज खरेदी करावयाची यादी अचानक वाढतच जाणार आहे. आर्थिक बाबींचा विचार करून मगच मुलांना शब्द द्या. स्वतःच्या गोष्टींना महत्त्व द्यावे लागेल.



मीन:–मनावरील दडपण कमी करण्याकरता जोडीदाराची किंवा जवळच्या मित्राची मदत घ्यावी लागेल. अतिशय दक्षतेने व व्यवहारीकपणे वागल्यास प्रश्नातील गोंधळ सुटेल.



||शुभं-भवतु ||

                 रविवार 27 फेब्रुवारी 2022 ते 05 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.मेष :-संशोधनात्मक कार्य करणार...
26/02/2022



रविवार 27 फेब्रुवारी 2022 ते 05 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

मेष :-संशोधनात्मक कार्य करणार्यांना समोरील कामाचे आव्हान स्विकारावे लागणार आहे. ईश्र्वर सेवा, दैवी शक्ती, वेदशास्त्र यांच्या अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल व इतरांसमोर मांडण्याची संधी मिळेल. मोठ्या प्रमाणातील जाहिराती, होर्डींग्ज या बाबतचे अधिकार असलेल्या मंडळीना त्यांच्या कामात गुंतागुंत निर्माण झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना नवीन वर्षासाठीच्या केलेल्या नियोजनात कांही महत्वाच्या सुधारणा करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. कोर्टामधील कांही भावकीतील दाव्यामध्ये विचार विनिमय करून कोर्टाबाहेर केस संपवण्याचे प्रयत्न तुमच्या पुढाकाराने करता येणार आहेत.



वृषभ :–कुटुंबातील सहविचाराने देवघरातील मूर्तींसंबंधी एकवाक्यता होईल. कुळाचार, कुळधर्म याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट होऊन गुरूजींकडून विधी करून घेण्याचे ठरेल. राजकीय क्षेत्रातील मंडळीनी आपण करत असलेल्या कार्याबद्दल अती जाहिरातबाजी किंवा गवगवा कपू नये. बर्याचशा गोष्टी अंगलट येण्याचा धोका आहे. नोकरीतील उच्च पदावरील अधिकारी वर्गाला एखाद्या चौकशी सत्राचे नियोजन करावे लागेल. मोठ्या भावंडाकडून तुम्हाला आवश्यक ती मदत मिळणार आहे. चोरीला गेलेल्या वस्तूचा अजूनही पाठपुरावा करावयास लागेल.



मिथुन :–सामाजिक स्तरावर कार्य करणार्यांना समाजाकडून प्रशंसा मिळेल व गौरव केला जाईल. नोकरीतील उच्चाधिकार समिती मधे तुमचा नंबर लागेल व आयुष्यातील एक मोठे पद मिळाल्याचा आनंद होईल. खूप जवळच्या व्यक्तीकडून तुमच्या बाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल व त्याला प्रसिद्धी मिळेल. महिलांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास जाणवणार आहे. कामाच्या योग्य नियोजनाने कामे खूपच सोपी करता येण्याचा अनुभव मिळेल. संततीबरोबरची आजची चर्चा अतिशय आनंददायी व अपेक्षित रिझल्ट देणारी ठरेल.



कर्क :– चौकशी समितीमधील तुमचे पद व अधिकार यामुळे तुमच्या नावाला एक वेगळेच वलय प्राप्त होईल. सरकारी रखडलेल्या कामाना गती देण्याकरता तुम्हाला ओळखींचा उपयोग करावा लागेल. आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नका. फँक्टरी, वर्कशाँप येथे या सप्ताहात तुम्हाला हुकमत गाजवता येणार आहे. कुटुंबात वाढदिवसाच्या निमीत्ताने गायन व संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन होईल. नवीन गाडी खरेदी करण्याच्या इच्छेला सध्या आवर घाला. स्वभावात व आचरणात शांतता आणावी लागेल.



सिंह :–नव्याने दाखल झालेल्या नोकरीतील तुमच्या सर्व प्रश्र्नांना वरिष्ठांकडून उत्तरे व मार्गदर्शन मिळणार आहे पण कोणत्याही प्रकारची घाई करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तुमच्या मताला महत्व मिळणार असल्याने पूर्ण विचाराने व अभ्यासाने निर्णय द्या. महिलांना उजवा पाय पोटर्या दुखण्याचे प्रमाण अचानक वाढेल तरी हाडांच्या डाँक्टरांची मदत घ्या. राजकीय मंडळीना आपल्या कार्यक्षेत्रात टिकाव लागण्यासाठी विचारपूर्वक डावपेचांचा आखणी करावी लागेल.



कन्या :–नोकरीच्या ठिकाणी शांत मनाने काम करून तेथील परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारच्या देण्याघेण्याच्या प्रकारात अतिशय सावध राहण्याची गरज आहे. इतरांच्या मताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केल्यास स्वत:ची मुल्ये हरवून बसाल तरी स्वविचारानेच निर्णय घ्या व कामे करा. अंगावर आलेली जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही व ती पार पाडण्यासाठी झोकून देऊन काम करावे लागेल. सामाजिक कार्यात सहकार्यांकडून चांगली मदत होईल.



तूळ :–भिडस्त स्वभावाला चिकटून बसल्याने होणी कोंडी त्रासदायक ठरेल. व्यवहारात स्पष्टपणे बोलण्याने कोणताही गैरसमज वा गोंधळ होणार नाही. बँकेचे व्यवहार इतरांकडून करून घेण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मताने चालल्या पुढील अडचणी टाळता येतील. वैयक्तिक जीवनात सांभाळून वागल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही. शेअर मार्केटमधील व्यवहारात अधिक लालसेने काम करण्याचा मोह आवरावा लागेल. स्वत:मधे बदल केल्यास आजुबाजुचे वातावरणही बदलते याचा रोकडा अनुभव येईल.



वृश्र्चिक :–या सप्ताहात नोकरी व्यवसायात प्रत्येक पातळीवर अडकलेल्या कामात इतरांची मदत मिळेल. महिलांना आपल्या क्षमतेचा अंदाज आल्यामुळे पुढील कामाची आखणी करणे सोपे जाईल. कलाकार मंडळीना आपल्या कला सादर करण्यासाठी गुरूजनांचा आशिर्वाद मिळणार आहे. एखाद्या मोठ्या प्रमाणात ठरवलेल्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. लहान मुलांच्या संगोपनाचे कार्य करणार्या महिलांना शांत राहून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.



धनु :–राजकीय मंडळीनी विरोधकांना सामान्य समजून मोडीत काढू नये. पाठबळ पक्के असल्याशिवाय कोणत्याही मोठ्या कार्याचे नियोजन करू नका. कुटुंबातील शेत, जमीन यांच्या वादात पडल्याने तुमची इमेज खराब होईल. सरकारी स्तरावर मिळणार्‍या परवानगीसाठी चे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मैदानी खेळाडूना आपली शक्ती व युक्ती दाखवण्याची संधी मिळेल. स्वभावात नम्रता आणल्यास सामाजिक स्तरावर काम करताना वाद किंवा मतभेद विकोपाला जाणार नाहीत.



मकर :–हितचिंतकांच्या सल्ल्याने घेतलेल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. वैयक्तिक जीवनातील विषयावर अती मोकळेपणाने चर्चा करत बसू नका.राजकीय क्षेत्रातील मंडळीनी फुशारकीने आपले व्यवहार चव्हाट्यावर मांडू नयेत समोरील व्यक्ती तुमच्याच बातम्यांचा गैरवापर करण्याचा धोका आहे. सामाजिक कार्यात सर्वच कामे शांततेने करावी लागतील. मित्रमंडळीमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता सखोल विचार करूनच घ्या. समोरील व्यक्ती दुखावणार नाही याची दखल घ्यावी लागेल.

कुंभ :–स्वत:च्या पूर्ण क्षमतेचा विचार करून मगच आश्वासने द्या. मनातील बर्याच अनुत्तरीत प्रश्नांना व्यवहारी गुरूकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. लहान वयाच्या मुलांकडून मोठ्या अपेक्षा करू नका. विद्यार्थी वर्गाला परिक्षेच्या दृष्टीने नेमके काय करायचे याचा योग्य अंदाज येईल. इतरांच्या तुलनेने तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवावा लागेल. स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी तुमची व्यवहारीक गणिते तुम्हालाच सोडावी लागतील. कोणत्याही विषयात डायरेक्ट हात घालू नका प्रथम त्यातील खाचाखोचा समजून घ्या. प्रवासात बर्याच अडचणी निर्माण होणार आहेत तरी या सप्ताहात प्रवास टाळावा हेच चांगले.



मीन :–कोणत्याही आवडत्या गोष्टीचा आनंद घेताना त्याचा अती एक करू नका. कुटुंबातील सर्वानीच एकत्र बसून सहविचाराने चर्चा करून निर्णयावर यावे लागेल. त्रासदायक व नकारात्मक विचारांच्या व्यक्तीपासून दूर व सावध रहा. आईकडील नात्यांच्या मंडळींकडून विशेष सल्ला मिळेल. नोकरी व्यवसायात अचानक कायदेशीर कटकटी निर्माण होणार आहेत. भूतकाळातील अनुभवांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या लहरी व हट्टी स्वभावाला मुरड घातल्यास बर्याच गोष्टी सुलभ होतील व व्यवहारात गुंतागुंत निर्माण होणार नाहीत.



|| शुभं-भवतु ||

                 शनिवार 26 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :– प्रौढ नोकरदारांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याचे वेध ला...
25/02/2022



शनिवार 26 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :– प्रौढ नोकरदारांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याचे वेध लागतील. सिनियर अधिकार्यांना त्यांच्या हातातील अधिकारात कपात केल्याचे कळवले जाईल.



वृषभ :–उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पहायला हरकत नाही तरी त्या दृष्टीने प्रयत्न करा. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.



मिथुन. :–महिलांना ओटीपोट दुखण्याचा त्रास संभवतो. लहान मुलांना तसेच गर्भवती महिलांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो. आजच्या दिवशी सर्वानीच पाणी भरपूर प्यावे.



कर्क :–द्वितीय संततीकडून अत्युच्च आनंदाची बातमी कळेल. नोकरीतील कामकाजाचा आढावा घेऊन आपल्या कामाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल.



सिंह :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की त्यांवर कोणताही उपाय चालणार नाही.



कन्या :–महिलांकडून घरातील फर्निचर बदलण्याचे विचार सुरू होतील. पतीपत्नीमधे द्वितीय संततीबाबत विचार सुरू होईल.



तूळ :–उच्च बौद्धिक पातळी असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या विषयात चांगली प्रगती झाल्याचे जाणवेल व महत्वाकांक्षेतही वाढ होईल.



वृश्र्चिक :–बातमीदार, संपादक यांच्याकडून कांही विषयावर अँग्रेसिव्हनेस दिसून येईल. नोकरीतील अधिकारी वर्गाला स्पेशल व्हिझीट करण्याचे अधिकार दिले जातील.



धनु :–जागेच्या, शेतजमिनीच्या, प्लँटस् च्या व्यवहारात मध्यस्थी तसेच दलाल यांचेकडून चांगली मदत होईल. घरापासून चार दिवस विश्रांतीसाठी दूर जावेसे वाटेल.



मकर :–लहान भावंडाच्या अडचणीसाठी मदत करण्यास धावून जाल. कोणत्याही प्रकारची केलेली पूर्वीची गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल.



कुंभ :–(संततीच्या) तुमच्या व्यवसायातील गरजेपोटी आईवडिलांकडून चांगली आर्थिक मदत मिळेल. पत्नीकडून ही मोठी आर्थिक मदत मिळेल.



मीन :–बँकेचे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड याविषयी आज तुम्हाला अतिशय जागरूक रहावे लागेल. आज फक्त स्वत:वरच विश्वास ठेवा इतरांवर नको.



|| शुभं-भवतु ||

                 शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :– पूर्वजांच्या कृपेने आज मोठ्या अडचणीच्या प्रसंगात ...
24/02/2022



शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :– पूर्वजांच्या कृपेने आज मोठ्या अडचणीच्या प्रसंगात कोणतरी देवासारखे धावून येईल व मदत होईल. महिलांना मासिक पाळीचा त्रास संभवतो.



वृषभ :–पुरूषांना सासुरवाडीकडून अचानक धनलाभाचा योग आहे. निवृत्त कर्मचार्‍यांना आपले पी. एफ. चे पैसे लवकरच मिळणार असल्याचे कळेल.



मिथुन :–नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित पगाराची इच्छा पूर्ण होथ असल्याचे कळेल. व्यवसायात नोकरवर्गाचे सहकार्य चांगले मिळेल.



कर्क :–पाळणाघरे, बालसंगोपन केंद्र येथील सेवाभावी मावशींना अचानक पगारवाढ मिळेल. संततीच्या आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतील.



सिंह :–शेती, बागायती असलेल्या ंना सरकारी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे कळेल. वाहन घेऊ इच्छिणार्यांच्या कर्जाची सोय होईल.



कन्या :–जाहिरात यंत्रणेमध्ये काम करणारे, माहिती प्रसारण खात्यात काम करणारे यांना गुंतागुंतीच्या कामासाठी निवडले जाईल. सरकारी कामे पूर्ण करून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल.



तूळ :–नेहमीच्या वातावरणापासून बदल अनुभवण्यासाठी दूर जाण्याचे नियोजन कराल. बँकेकडे मागितलेले कर्ज मात्र सध्या मंजूर होत नसल्याचे कळेल.



वृश्र्चिक :–कौटुंबिक सुखात कांही गैरसमजूती मुळे वाद निर्माण होतील व त्यामुळे मनस्ताप होईल. मुलांचे वडिलांबरोबर मतभेद संभवतात.



धनु :–तुमच्या व्यक्तिमत्त्वाची इतरांवर छाप पडल्याने सर्वांचे कुतुहल वाढेल. संततीबाबतच्या कोणत्याही तक्रारी वर मार्ग सापडेल.



मकर :–आज अचानक तुम्हाला कांही गुढ गोष्टींविषयी ची भिती निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून ज्येष्ठांचा सल्ला मानावा.



कुंभ :–पूर्वी हरवलेल्या महत्वाच्या वस्तू विषयी सुगावा लागेल. वयस्कर मंडळीना व आजार्यांना आज बरे वाटू लागेल.



मीन :–शासकीय कागदपत्रांची पूर्तता करताना होणार्या ओळखी टिकवण्याचे काम करा. नोकरीत नव्याने विशेष जबाबदारी सोपवली जाईल.



|| शुभं-भवतु ||

                 गुरूवार 24 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :–नात्यातील मुलांच्या शुभकार्यासाठी आर्थिक मदत द्याल....
23/02/2022



गुरूवार 24 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :–नात्यातील मुलांच्या शुभकार्यासाठी आर्थिक मदत द्याल. तुमच्या आवडत्या वस्तूची चोरी होण्याची शक्यता आहे.



वृषभ :–ज्यांचा विवाह ठरला आहे त्यांची रजिस्टर विवाह करण्याची चर्चा होईल. परदेशात असलेल्या मुलामुलींना आपल्या व्हिसाबाबतची चिंता सतावेल.



मिथुन :–फुलझाडे, नर्सरीची आवड असणार्‍यांना व्यवसाय करण्याची इच्छा होईल. दुसर्‍यांच्या सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेऊ नका.



कर्क :–लहान मुलांच्या संस्कारावरून त्यांच्या आईवडिलांचे कौतुक होईल. भाड्याने घर घ्यावयाचे असल्यास आज अनेक अडचणी निर्माण होतील.



सिंह :–दळणवळण खात्यात काम करणार्यांना अचानक कामाचा खूपच ताण जाणवेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतींचे बोलावणे येईल.



कन्या :–गायन केलेली आवड असणार्‍यांना लोकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. लेखक व कवी यांचे त्यांच्या साहित्याबद्दल कौतुक होईल.



तूळ :–अचानक तुम्हाला तुमच्या स्वभावात कशा प्रकारचा बदल करावयाचा आहे याची कल्पना येईल

आज अचानक डोळेदुखीचा त्रास जाणवेल.



वृश्र्चिक :–तुमच्या हातातील सुरू असलेल्या प्असलेल्यामध्ये अचानक अडचणी निर्माण होतील. स्वत:च्या व्यवसायात आज नुकसान संभवते.



धनु :–मित्रमैत्रिणींना आलेल्या अडचणींवर तुमच्याकडून सल्ला दिला जाईल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे लाभ होणार आहे.



मकर :–अचानक दोन दिवसापासून होणारा प्रकृतीचा त्रास वाढेल व आज आजारपण आल्याचे जाणवेल.. तळपायाची आग होईल व पाऊले दुखतील.



कुंभ :–मोठ्या भावंडाच्या मित्रपरिवाराबरोबर सहभोजन करण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या आईवडीलांचाही सहभाग असेल.



मीन :–जे काम करण्याची तुमची नेहमी इच्छा असते आज त्याच कामाचा कंटाळा येईल. तुमच्या हातात असलेल्या अधिकाराचा वापर करणे अडचणीचे ठरेल.



|| शुभं-भवतु ||

                 बुधवार 23 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्यमेष :–तुम्ही करत असलेल्या व्यवसायाच्या विकासाबाबत योग्य नि...
22/02/2022



बुधवार 23 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मेष :–तुम्ही करत असलेल्या व्यवसायाच्या विकासाबाबत योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. आज हिशोबीपणाने वागून त्याचा अनुभव घ्. ा.



वृषभ :–मानसिक सकारात्मकता सर्वच आघाड्यांवर मोलाची ठरेल. स्पर्धात्मक गोष्टीत मनातील इच्छेच्या बळावर बाजी माराल.



मिथुन :–कौटुंबिक संघर्ष टाळून वाद वाढवू नका. तुमच्या सल्ला देण्याच्या सवयीमुळे आज अचानक एखाद्याला अडचणीतून बाहेर काढाल.



कर्क :–आजच्या दिवसात तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तोंड देताना अडचणी निर्माण होतील. वाहन चालवताना वाहनात बिघाड होण्याचा धोका आहे.



सिंह :–: आपल्या नोकरीतील जबाबदार्या सांभाळून कौटुंबिक जबाबदारीही फार पाडावी लागेल. विनाकारण प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.



कन्या :–अशक्तपणा जाणवत असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. शाळकरी विद्यार्थ्यांना आज मानसिक आनंद मिळणार माही.



तूळ :--़आज प्रत्येक कामामधे कांही ना कांही अडचणी निर्माण होतील. कोणत्याही कामात निर्णयापर्यंत येऊ नका.



वृश्र्चिक :– वृद्धांना आज विस्मरणाचा त्रास जाणवेल. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.



धनु :– तरूण वयाच्या मुलामुलींना आपल्या अपेक्षा पालकांकडून पूर्ण होणार असल्याची खात्री मिळेल. समोरील व्यक्तीवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.



मकर :–स्वत:ला आलेल्या अनुभवांचे धडे इतरांना द्याल. आईला सामाजिक स्तरावर मान सन्मान मिळेल.



कुंभ :–जुन्या मागिल गुंतवणूकीवर आज चांगला लाभ होईल. वाहन चालवताना वाहनाच्या गतीवर नियंत्रण आवश्यक आहे.



मीन :–आज बँकेची कामे स्वत:ची स्वत: करा. इतरांवर अवलंबून राहू नका. लहान मुलांना पडण्या धडपडण्यापासून सांभाळणे अवघड जाईल.

|| शुभं-भवतु ||

Address

Kurla

Telephone

9967024009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SGP Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SGP Marathi:

Share